विसरभोळेपणामुळे तुम्ही खूपच अस्वस्थ आहात का.? तर करा हा एक अद्भुत उपाय.!

विसरभोळेपणामुळे तुम्ही खूपच अस्वस्थ आहात का.? तर करा हा एक अद्भुत उपाय.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या पृथ्वीतलावर विविध प्रकारची माणसे राहतात आणि त्यांची स्मरणशक्ती ही एकमेकांपेक्षा भिन्न आहे आणि त्यात असेही काही असतात ज्यांना गोष्टी विसरण्याची सवय असते. आजच्या या जलद युगामध्ये प्रत्येक जण आपल्या कामात व्यस्त असतो. यामध्येच आपल्या डोक्यात अनेक गोष्टी चालू असतात पण त्या सर्व गोष्टी लक्षात ठेवण थोडसं कठीणच आहे.

त्याचबरोबर असे ही लोक असतात ज्यांच संवाद करता- करताच ध्यान विचलित होते आणि ते मूळ मुद्दाच विसरुन जातात.तसेच काही लोक तर रोजच्या दिनचर्येतील कामे सुद्धा विसरुन जातात व हळुहळू गोष्टी विसरण्याची सवय होते आणि मग पुढे जाऊन ही सवय आजाराच रुप घेते. स्मरणशक्ती कमी असणे आणि स्मृती कायमची जाणे यामध्ये खूप मोठा फरक आहे.

ही समस्या वय-वर्ष साठ नंतर सुरु लागते पण युवांमध्ये ही समस्या असण्याची खूप कारणे असू शकतात अधिकतणाव किंवा मध्यपान त्यासोबत धुम्रपान अशी अनेक कारणे असू शकतात. डोक्याला जर जबर मा’र बसला तरी ही स्मृती जाण्याची दाट शक्यता असते. नियमित दिनचर्येतील गोष्टी जर तुम्ही विसरत असाल तर त्या तुम्ही योगा अथवा ध्यान-साधना अशा काही पद्धतीने ठिक करू शकता.

मित्रांनो हा आजार कमी करण्यासाठी काही सोपे उपाय आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो जर तुम्ही ही विसरण्याच्या आजाराने त्रासला असाल तर नक्की करुन बघा. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी गहू अथवा ज्वारीचा रस साखर आणि बदाम मिसळून महिनाभर प्यायल्याने तुमची स्मरणशक्ती वाढू लागेल. त्याचबरोबर अक्रूड हे फळ जीवनसत्व इ ने भरलेला आहे हे नियमित खाल्याने तुम्ही विसरण्याची सवयच विसरुन जाल.

तसेच सफरचंद व ब्लूबेरी या फळांमुळे ही स्मरणशक्ती वाढते. शिवाय भाज्यांंमधे वांगी आणि कांदा यांमध्ये जीवनसत्व इ समाविष्ट आहे यामुळे ही स्मरणशक्ती मध्ये नक्कीच वाढ होईल. मित्रांनो झोपण्याआधी दिवसभरात केलेल्या सर्व गोष्टी रोज आठवण्याचा प्रयत्न करा त्यामुळे ही स्मरणशक्ती तंदुरुस्त होईल. शिवाय कामाची नोंद ठेवा आणि चीत्त नेहमी एकाग्र ठेवा ही समस्या नक्कीच दूर होईल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *