पहा कशाप्रकारे आपली जीभ आपले आरोग्य कसे आहे ते सांगते.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो आपल्या जिभेचा रंग आपल्याला आपले आरोग्य कशाप्रकारे सांगतो ते आज आपण जाणून घेणार आहोत. जीभ आपल्याला फक्त चव सांगते असे नाही तर ती आपल्याला आपल्या आरोग्याचे संकेत सुद्धा देत असते. म्हणून आपण जेव्हा डॉक्टर कडे जातो तेव्हा डॉक्टर जीभ दाखवा असे म्हणतात. तर आपण आपल्या जिभेवरून आपलं आरोग्य कसं आहे हेच जाणून घेणार आहोत.
आपण आपल्या जिभेच्या रंगानुसार आपलं आरोग्य जाणून घेऊ शकतो किंवा आपल्याला आरोग्यविषयीची कोणती समस्या आहे हे देखील जाणून घेऊ शकतो. जर आपली जीभ गुलाबी आणि नरम असेल तर आपले आरोग्य चांगले आहे असे आपण समजावे.
जर आपल्या जिभेवर पांढरे डाग असतील तरी सुद्धा आपले आरोग्य चांगले आहे. जर आपली जीभ खूप लाल असेल तर आपल्या शरीरातील रक्तामध्ये खूप गरमी आहे. आपल्या शरीरात रक्त कमी आहे, कोलेस्ट्रॉल चे प्रमाण खूप वाढलेले आहे असे समजावे. शारीरिक जखम, किंवा ताप आहे असं आपण समजू शकतो.
जर आपली जीभ खूप सुकलेली असेल म्हणजेच तिला लाळ नसेल किंवा पाणी नसेल व थोडी पिवळ्या रंगाची दिसत असेल तर थकवा किंवा आतड्यांवर सुजण आहे तसेच झोप न लागण्याचे हे संकेत आहेत. आपल्याला कविलाही असू शकतो. जीभ जर सुजली असेल तर कॅन्सर असू शकतो. तसेच थायरॉईड, ल्युकेमिया, हे सुद्धा असू शकते, किंवा एलर्जी ने सुद्धा आपली जीभ सुजलेली असू शकते.
जीभ थोडी पिवळी असेल तर डिहायड्रेशन किंवा ताप, नाकाऐवजी तोंडाने श्वास घेणे किंवा जास्तीचे धूम्रपान करत असल्याचे ते संकेत असू शकतात. जिभेवर जर लाल रंगाचे ठिपके असतील व २ आठवड्यात ते नष्ट होत नसतील तर डॉक्टरांना ते जरूर दाखवा. ब्रश केल्यानंतर आपलीही जीभ जरूर तपासून घ्या. यापैकी कुठले लक्षण दिसतंय का आणि जर दिसत असेल तर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या आणि आपले आरोग्य सांभाळा.
तर मित्रांनो आपल्याला समजले असेलच कि आपली जीभ आपले स्वास्थ्य नेहमी सांगत असते. असे काही आढळ्यास डॉक्टरांकडे जाऊन तपासून घ्या व आपले आरोग्य चांगले ठेवा. तुम्हाला जर हि माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला नक्की विसरू नका.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.