तुळशीला स्पर्श करून गुपचूप बोला हा मंत्र; जे काही मागाल ते सर्व होईल पूर्ण.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हिंदू धर्म शास्त्रामध्ये तुळशीला अनन्य साधारण असे महत्व आहे. आपण तुळशीची पूजा नेहमी करतो. तुळशी माता ही माता महालक्ष्मी चे प्रतीक मानले जाते आणि ज्या घरांमध्ये तुळशीची पूजा नियमितपणे केली जाते अशा घरांमध्ये माता महालक्ष्मी नेहमी वास करत राहते. तुळशीचे अनेक औषधी गुणधर्म तर आहेच पण त्याचबरोबर अध्यात्मिक दृष्ट्या सुद्धा तुळशीचे अनेक लाभ व तोटके सुद्धा सांगण्यात आलेले आहेत त्याचबरोबर ज्योतिषशास्त्र ,वास्तूशास्त्र यामध्येसुद्धा तुळशी चे खूप सारे उपाय सांगण्यात आले आहेत.
त्याचबरोबर तुळशीची निमित्ताने पूजा केल्याने आपल्याला मोक्ष गती सुद्धा प्राप्त होते. असे म्हटले जाते की ज्या घरामध्ये माता तुळशीची पूजा केली जाते त्या घरामध्ये माता महालक्ष्मी सदैव वास करते त्याचबरोबर अन्य देवी-देवता सुद्धा तिथे राहतात. घराच्या अंगणसमोर तुळशी असते त्या घरांमध्ये नकारात्मक ऊर्जा कधीच प्रवेश करत नाही त्याचबरोबर घरातील वातावरण सुद्धा सकारात्मक राहतील.
पौरानिक शास्त्रानुसार माता महालक्ष्मीची नियमितपणे पूजा केल्याने आपल्या घरामध्ये सुख, शांती ,वैभव, धन नांदू लागते व त्याचबरोबर आपली नेहमी प्रगती होत राहते. पद्मा पुराणानुसार याठिकाणी तुळशी असते अशा ठिकाणी ब्रह्म विष्णू महेश या तीन देवतांचा वास असतो त्याच बरोबर तुळशीची नियमितपणे पूजा केल्याने जे पातक असते ते सुद्धा पूर्णपणे नष्ट होऊन जाते.
तुमच्या घरामध्ये नियमित भांडण होत असेल, नेहमी क्लेश असेल त्याचबरोबर जीवनामध्ये प्रगती होत नसेल तर या सर्व समस्या थांबवण्यासाठी व समस्या दूर करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला एक महत्त्वाचा मंत्र सांगणार आहोत. तुळशी पूजन केल्यानंतर आपण या मंत्राचा जप केल्याने आपल्या घरामध्ये माता महालक्ष्मीचा वास नेहमी राहील व आपल्या जीवनामध्ये ज्या समस्या आहेत त्या समस्या पूर्णपणे नष्ट होऊन जातील.
सोबतच घरामध्ये नेहमी आनंदी राहील त्याचबरोबर घरामध्ये कधीच वाईट शक्तीचा शिरकाव होणार नाही. घरातील सदस्य नेहमी आनंदी समाधानी व सुखी राहतील. चला तर मग जाणून घेऊया या विशेष अशा मंत्र बद्दल…
सर्वात आधी आपल्याला आपल्या इष्ट देवतांची पूजा करायचे आहे त्यानंतर तुळशी जवळ गेल्यानंतर आपल्याला मनोभावे प्रार्थना करायची आहे. तुपाचा दिवा पेटवायचा आहे त्यानंतर तुळशीला पवित्र जल अर्पण करायचे आहे जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर तुम्ही ते सुद्धा तुळशीला अर्पण करू शकता. त्यानंतर तुळशीला हळद कुंकू वाहा.
तुळशीला शुंगार अर्पण करणार आहे ते सुद्धा तुम्ही वाहू शकता. त्यानंतर आपल्याला तुळशीला सात परिक्रमा करायचे आहेत व तुळशी समोर बसून आपल्याला या मंत्र जपा चा उच्चार करायचा आहे. मंत्र पुढीलप्रमाणे आहे. “महाप्रसाद जननी सर्व सौभाग्य वर्धनी आदी व्याधी हरा नित्यम तुलसी त्वं नमोस्तुते..”
हा म्हणजे आपल्याला नियमितपणे जपायचा आहे. हा मंत्र जप केल्याने आपल्या जीवनातील सर्व दुःख समस्या पूर्णपणे नष्ट होऊन जाणार आहेत आणि आपल्याला हा मंत्र जप करताना मन भावे तुळशीला शरण जायचे आहे आणि आपल्या ज्या काही समस्या आहेत त्या तुळशी मातेला सांगायचं आहे असे केल्यामुळे तुमच्या सर्व समस्या तर होणारच आहे त्याच बरोबर तुळशी ही देवाला अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्हाला विष्णू देव यांचासुद्धा आशीर्वाद प्राप्त होणार आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.