या दिवशी केस कापलात तर घरात येईल कायमची गरिबी; कायमचे व्हाल कंगाल..?
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. असं म्हटलं जातं कि शनिवारी नखे किंवा केस कापू नये. असे केल्याने शनीचा कोप होतो आणि आपले नशीब वाईट होते, पण हे खरं आहे का..? तर आज आपण हेच जाणून घेणार आहोत कि शनिवारी केस कापल्याने खरंच शनिदेव कोपतो का? कि हि फक्त एक अंधश्रद्धा आहे.
शनिवारी केस कापल्याने शनिदेव कोपतो त्यामुळे शनिवारी केस कापू नये असा अंधविश्वास आपल्या हिंदुधर्मामध्ये खूप प्रचलित आहे. आणि या कलियुगात देखील बरेच लोकं हे पाळतात आणि त्याच प्रमाणे वागतात. पण खरंच हे सत्य आहे का? चला तर जाणून घेऊया यामागचा इतिहास.
जुन्या काळात गावांमध्ये एक किंवा जास्तीत जास्त २ न्हावी असायचे. अशावेळी या नाव्ह्यांना एकही सुट्टी मिळायची नाही. म्हणून त्या काळी या नाव्ह्यांनी असा गैरसमज पसरवला कि जर तुम्ही शनिवारी केस कपात असाल तर शनिदेव तुमच्यावर कोपेल आणि तुमचं काहीही चांगला होणार नाही. यामागचा त्यांचा हेतू एकाच जेणेकरून त्यांना एकदिवस सुट्टी घेता येईल.
आणि हि अफवा गावांमधून शहरांमध्ये सुद्धा पसरू लागली. त्यामुळे आजही कित्येक सलून शनिवारी बंद ठेवले जातात, म्हणून आमच्या मते हि एक अफवा आहे. तुम्ही कोणत्याही दिवशी केस कापू शकता. अशाने कोणताही कोप तुमच्यावर होणार नाही. उलट शनिवारी केस कापायचा विचार करत असाल तर त्याचे कोणते फायदे आहेत हे जाणून घेऊया.
पहिला फायदा म्हणजे शनिवारी सलून मध्ये जास्त गर्दी नसते. त्यामुळे तुम्ही पटकन तुमचे केस कापून आपल्या कामाला जाऊ शकता. दुसरा फायदा म्हणजे शनिवारी गर्दी कमी असल्याने न्हावी फ्रेश असतो. आणि तो कंटाळून जास्त घाई करत नाही त्यामुळे तुमचे केस चांगले कापले जातात.
तिसरा फायदा म्हणजे न्हावी हा असा व्यक्ती असतो ज्याला आजूबाजूला घडणाऱ्या सगळ्या गोष्टी माहित असतात. कारण त्याकडे कित्येक लोक येऊन केस कापता कापता गप्पा मारून जातात. त्यामुळे तुम्हाला हवी असलेली माहिती अगदी सहज त्याच्याकडून काढून घेऊ शकता.
तर मित्रांनो शनिवारी केस कापल्याने कोप होतो हि फक्त एक अफवा आहे. अशा जुन्या अंधश्रद्धांना बळी पडू नका. आम्हाला आशा आहे तुम्हाला हि माहिती नक्कीच आवडली असणार, आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणी व नातेवाईकांना शेअर करायला नक्की विसरू नका.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.