मूठभर मीठ आणि लवंग नेहमी ठेवा या ठिकाणी; आयुष्यभर पैशाची गरजच भासणार नाही.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत या उपायामुळे तुम्हाला दहा ते पंधरा दिवसांमध्ये धन लाभ होईल.जर तुमच्या जीवनामध्ये पैसा येत नसेल तर आजच्या लेखामध्ये सांगितलेला उपाय आणि त्या उपायाला आवश्यक असणारे दोन घटक या तिघांच्या संयुक्त मिश्रणाने तुम्ही लवकरच धनवान व्हाल.
हा अतिशय सोपा उपाय आहे परंतु या उपायांना मेहनतीची जोड असणे गरजेचे आहे.अनेकदा असे होते की आपण जीवापाड मेहनत करत असतो परंतु त्याचे हवे असलेले फळ आपल्याला काही मिळत नाही म्हणून अनेकदा आपल्या पदरी निराशा येत असते. आपल्याला आपल्या मेहनतीचे फळ नक्की देईल. जेवढे तुम्ही मेहनत कराल त्याच्यापेक्षा जास्त धनवर्षाव तुमच्या आयुष्यात होईल.
त्याचबरोबर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचे भाग्य. तुमचे भाग्य हे पूर्वनिर्धारित असते ,तुमच्या नशिबा मध्ये काय घडणार आहे ते आधीच लिहिलेले असते परंतु आपले भविष्य जरी आधी लिहलेले असेल तरी ते घडविण्याचे सामर्थ्य आपल्या हातांमध्ये असते.आपल्या आयुष्यामध्ये अनेक समस्या अडचणी निर्माण होत असतात, त्यामुळे आपलेही भाग्य दुर्भाग्य मध्ये बदलून जाते.
आपल्या हातून काही पापकर्म घडत असतात ,काही चुकीच्या गोष्टी असतात घडत असतात. भाग्य कसे बदलणार याबद्दल सुद्धा मार्गदर्शन करणार आहोत.आपले भाग्य बलवान करण्यासाठी आपल्या इष्ट देवतेचे ध्यान व त्याची आराधना करणे गरजेचे असते.हा उपाय करण्यासाठी आपल्याला काही वस्तूंची गरज भासणार आहे आणि या वस्तू आपल्या घरात सहज उपलब्ध होत असतात. त्यासाठी आपल्याला काळ्या रंगाचा कपडा लागणार आहे.
सोबत काळ्या रंगाचा दोरा घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला खडे मीठ लागणार आहे. हे खडे मीठ बाजारामध्ये व किराणा दुकानांमध्ये सहज उपलब्ध होत असते. या उपायासाठी बारीक आयोडीनयुक्त मीठ घेऊ नका.व्यवस्थित व नीट काळजीपूर्वक आचरणामध्ये आणा तसेच आपल्याला काळीमिरी सुद्धा लागणार आहे काळीमिरी हा एक मसाल्यातील पदार्थ आहे.
या काळी मिरीची चार दाणे आपल्याला घ्यायचे आहेत त्याचबरोबर चार अखंड असलेले लवंग आपल्याला घ्यायचे आहेत हे लवंग कुठेच तुटलेली नसावे.हा उपाय तुम्ही दिवसभर व रात्री कधीही करू शकतात. या उपायासाठी अशी विशिष्ट अशी वेळ नाही म्हणजे कुलदेवतेचे नामस्मरण ध्यान करायचे आहे.
जर तुम्हाला तुमचे कुलदैवत माहिती नसतील तर अशा वेळी तुम्ही श्री विष्णु भगवान यांना कुलदैवत मानू शकता आणि त्यांच्या मंत्राचा जप करत हा उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी घरातील एखाद्या स्वच्छ ठिकाणी काळ्या रंगाचा कपडा अंथरायचा आहे.
ओम नमो भगवते वासुदेवाय नम: हा श्री हरी भगवान विष्णू यांचा मंत्र आहे, तो सातत्याने जपायचा आहे.
त्यानंतर काळ्या रंगाच्या कापडावर दोन चमचे खडे मीठ टाकायचे आहे. त्यानंतर चार काळया मिरी ठेवायचे आहेत मग त्यावर चार अखंड लवंग सुद्धा ठेवायचे आहे. तंत्र-मंत्र शास्त्रात या तिन्ही पदार्थाचे खूप मोठे महत्त्व आहे.म्हणून आपल्याला शीघ्र परिणाम मिळत असतो त्याचबरोबर काळ्या रंगाचा कपडा हा घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेणारा असतो.
आपल्या घरांमध्ये ज्या ज्या नकारात्मक गोष्टी आहेत,आपल्याला कोणाची नजर लागलेली आहे,कुणाच्या वाईट शक्तीमुळे आपल्यावर परिणाम झालेला आहे त्यांना हे खडे मीठ लवंग व काळीमिरी मध्ये समाविष्ट करण्याचे कार्य हा उपाय करत असतो. तर अशाप्रकारे या वस्तू ठेवायचा आहे.
हा उपाय करत असताना नामस्मरण जप सातत्याने चालू ठेवायचा आहे.या उपायांमध्ये मंत्र ज्या खूपच महत्त्वाचा आहे जर तुम्ही या उपाय करत असताना मंत्रजप केला नाही तर हा उपाय अपूर्ण राहू शकतो.त्यानंतर आपल्याला काळ्या रंगाच्या कपड्यावर जे काही सामग्री ठेवलेली आहे ती नीट काळ्या रंगाच्या दोऱ्याने बांधायची आहे.
त्यानंतर एकदा पोटली बांधल्यावर ही पोटली आपल्या हातामध्ये धरून संपूर्ण घरांमध्ये फिरवायची आहे.एकदा काही पोटली पूर्ण घरांमध्ये फिरून झाल्यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वारात आतल्या बाजूने प्रवेशद्वाराजवळ हि पोटली बांधयची आहे. म्हणूनच तुमचे भाग्य तुमची मेहनत आणि हा उपाय या तिघांचा त्रिवेणी संगम मुळे तुमच्या आयुष्यामध्ये लवकरच धन येईल.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.