फक्त हे १ काम करणे सोडा; आयुष्यात गरिबी आणि दारिद्र्य कधीच येणार नाही.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण पैसा मिळविण्यासाठी अपार कष्ट मेहनत करत असतो व पैसा मिळवतो परंतु तो पैसा घरामध्ये टिकतच नाही.काही ना काही अडचणी येत राहतात व संकटे येत असतात त्यामुळे आपण आपल्या मेहनतीने कमावलेला पैसा क्षणांमध्ये नष्ट होऊन जातो. बरेचदा आपल्याला कळत नाही की नेमकी हे कशामुळे होत आहे आणि आपण निराश होत राहतो आणि आपल्या मनामध्ये वाईट विचार येऊ लागतात.
आपण तर प्रामाणिक पणे मेहनत करत असतो तरीसुद्धा आपल्या नशिबी हे सगळे भोग का येतात. असे प्रश्न अनेकदा स्वतःला विचारत असतो. आपल्या हातातील पैसा का टिकत नाही खरे तर याचे महत्त्वाचे कारण आपल्या चुकीच्या सवयी मध्ये असते. सकाळी उशिरापर्यंत झोपून राहणे, हे दारिद्र्याला निमंत्रण देणारे आहे. उशिरा स्नान करणे ही पशूचे जीवन आहे.
कमीत कमी सकाळी आठ वाजेपर्यंत स्नान व्हायलाच हवे. आठ वाजल्यानंतर स्नान करणे हे मनुष्य स्नान नाही.ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लहान वाटत असतात परंतु याच लहान गोष्टी आपल्या जीवनावर मोठा प्रभाव निर्माण करत असतात.स्नान करणे ही किती लहानशी गोष्ट आहे परंतु ही गोष्ट करण्यासाठी सुद्धा आपण टाळाटाळ करत असतो आणि जो पर्यंत आपण स्नान करत नाही तोपर्यंत आपल्या मध्ये आळस भरलेला असतो.
रात्रीचे पाप आपल्या डोक्यावर तसेच राहते. म्हणून भगवांता बरोबरच आपल्याला भरपूर धन प्राप्त करायचे असल्यास सकाळी सूर्योदयापूर्वी उठावे व जास्तीत जास्त आठ वाजायच्या आत आंघोळ करावी, यामुळे तुमच्या जीवनामध्ये सुखसमृद्धी येईल. त्याचबरोबर तुम्हाला कितीतरी पापा मधून मुक्तता मिळेल.सूर्योदयापर्यंत चे व्यक्ती झोपून राहतात त्यांचे आयुष्य सुद्धा कालांतराने कमी कमी होत जाते. काही व्यक्ती म्हणतात की सकाळी आमचे डोळे उघडत नाही त्याला आम्ही काय करावे.
त्याची सर्वात सोपे उपाय म्हणजे रात्री लवकर झोपावे. रात्री लवकर झोपाल तर सकाळी लवकर उठाल. यात काही संशयच नाही. आपण अर्ध्यापेक्षा जास्त जीवन हे घुबडा प्रमाणे जगत आहोत. रात्री ही झोपण्यासाठी आहे परंतु आपण रात्री जागरण करत असतो व दिवस हा जागे राहण्याकरिता आहे तर आपण दिवसा झोपत असतो.
सध्याची नवटक्के तरुण पिढी रात्री दोन किंवा तीन वाजेपर्यंत मोबाईल मध्ये काही ना काही गोष्टी हाताळत असतात व जागे राहतात या सगळ्या गोष्टींमुळे त्यांची झोप पूर्ण होत नाही, परिणामी त्यांच्या जीवनावर वाईट परिणाम होत असतो आणि म्हणूनच तरुण वयामध्ये त्यांना अनेक समस्या निर्माण होऊ लागतात व त्याचबरोबर झोप पूर्ण न झाल्यामुळे कामामध्ये सुद्धा लक्ष लागत नाही.
अनेकदा कार्यालयांमध्ये या सर्व गोष्टींचा चुकीचा परिणाम होत असतो म्हणून अनेकदा नोकरीसुद्धा गमवावी लागते. या सर्वांचा अर्थ म्हणजे तुमच्या जीवनातून धन,पैसा हळूहळू कमी होत जाते,परिणामी दारिद्र येत राहते तरी या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी तुमच्या जीवनामध्ये एक विशिष्ट वेळापत्रक तयार करून घ्या व त्या पद्धतीने त्याचे आचरण करा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.