करोडपती बनवते पांढऱ्या रुईचे झाड; गरिबी दूर करण्यासाठी असे घरी आणा याचे मूळ.!

करोडपती बनवते पांढऱ्या रुईचे झाड; गरिबी दूर करण्यासाठी असे घरी आणा याचे मूळ.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो आपल्या परिसरात अनेक झाडे आणि वृक्ष आहेत ज्यांचे काही दैवी फायदे आहेत. असेच एक झाड आहे रुईचे त्याचे अनेक दैवी फायदे आहे हे जाणून तुम्ही थक्क व्हाल. चला तर या लेखात जाणून घेऊया रुईचे झाड व त्याचे फायदे. रुईच्या झाडाची पाने व फुले यांची माळ आपण भगवान हनुमान बजरंगबली यांना वाहतो, बऱ्यापैकी रुईच्या झाडाचा हा उपाय सर्वाना माहीत आहे, परंतु याशिवाय हे रुईचे झाड किती महत्वाचे आहे हे फार लोकांना माहिती नाही.

यामुळे तुम्हाला तुमची गरिबी घालवण्यासाठी मदत होईल, धन खेचण्यासाठी अनेक धनाचे स्रोत निर्माण होतील. असे हे रुईचे झाड आपल्यासाठी बरेच लाभदायी, धनप्राप्तीचे योग निर्माण करणारे आहे. हे रुईचे झाड मंदार ,आर्क अशा विविध नावांनी महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतात ओळखलं जात. आपल्या घराच्या आसपास हे झाड तुम्हाला नक्की दिसेल.

या झाडाच्या मुळांचा वापर करून अनेक तांत्रिक क्रिया केल्या जातात. हिंदू ध-र्मशास्त्रानुसार हे रुईचे झाड भगवान शिवशंकरांना अतिप्रिय आहे. सोबतच या झाडात भगवान श्री गणेश वास करतात अशीही मान्यता आहे . या रुईच्या झाडाचे मुख्यतः दोन प्रकार असतात , शाम हुई आणि श्वेत रुई , शाम रुईची फुले थोडीशी निळसर असतात , श्वेत रुई म्हणजे पांढर्‍या रंगाची फुले येतात आणि तांत्रिक क्रियांमध्ये श्याम आणि श्वेत यांपैकी श्वेत रुई चा वापर हा जास्त केला जातो.

आपण जो प्रयोग करणार आहोत, गरिबी दूर करण्यासाठी आपल्याला श्‍वेत मंदार म्हणजेच या पांढऱ्या रुईच्या फुलांचा वापर करायचा आहे. आपल्या घराच्या जवळपास कोठेही किंवा माळरानावर तुम्हाला मिळेल. असं एक श्वेत म्हणजे पांढऱ्या रुईचे झाड बघायचं आहे , यासाठी जे खूप जुनं असेल , कमीत कमी अकरा ते बारा वर्ष अशा झाडाचे खोड , फांद्या असतात आणि अशी मान्यता आहे की अकरा वर्षांनंतर या श्वेत रुईच्या मुळामध्ये भगवान श्रीगणेशांचा वास असतो, गणेशाची प्रतिमा आपोआप त्या ठिकाणी निर्मित होते.

बाजारात सुद्धा तुम्हाला अशा प्रकारे श्वेतार्क म्हणजेच पांढऱ्या रुईच्या मुळांपासून निर्मित श्वेतार्क गणेशप्रतिमा नक्की मिळतील. पण त्या ओरिजिनल आहेत की नाहीत खरोखर त्या श्वेतार्क म्हणजे या पांढ-या रुईच्या मुळापासूनच निर्मिल्या आहेत याची खात्री करा आणि जर गणेश प्रतिमा असेल तर ही प्रतिमा आपण खरेदी करून चांगल्या मुहूर्तावर ती आपण गणपतींची आपल्या घरामध्ये स्थापना करतो त्यावेळी जरी आपण हा उपाय केला तर अत्यंत शुभ परिणाम होतात.

घरात सुख समृद्धी नांदू लागते. घरात ऐश्वर्य येतं. आपल्या जवळपासच्या पांढऱ्या रुईच्या झाडाचा शोध घ्या आणि जर रविवारच्या दिवशी पुष्य नक्षत्र जेव्हा येईल, अशा शुभप्रसंगी एक दिवस आधी आपण या झाडाजवळ जायच आहे, मनोभावे हात जोडायचे आहेत , प्रार्थना करायची आहे , त्या ठिकाणी जाताना आपल्या घरातील तांब्याभर पाणी घेऊन जायचं आहे, सोबत हळदीकुंकू , अक्षता या पूजेच्या वस्तू घेऊन जा.

थोडं पाणी त्या ठिकाणी अर्पण करा, हळदीकुंकू वहा , त्या अक्षता अर्पण करा . फुले वाहायची आहेत आणि मनोभावे हात जोडून प्रार्थना करा की हे मंदार वृक्ष आम्ही आपल्याला आमच्या घरी आमच्या वास्तूमध्ये घेऊन जात आहोत , आमच्या जीवनात आपण प्रवेश करावा आणि आमच्या घरात जी काही दरिद्रता आहे , गरिबी आहे, ती दूर करण्यासाठी आम्हाला सहाय्य करावे . आपल्या कृपेने आमच्या घरी लक्ष्मीचा वास रहावा.

या नंतर पुन्हा एकदा मनोभावे नमस्कार करावा. आपल्या घरी घेऊन आल्यानंतर तर घरात गंगाजल असेल तर त्या गंगाजलाने हा तुकडा व्यवस्थित स्वच्छ करून घ्या. गंगाजल नसेल तर अगदी साध्या पाण्याने जरी हा तुकडा स्वच्छ केला तरीही चालेल. आपण त्या लाल रंगाच्या कपड्यात व्यवस्थित गुंडाळा. गुंडाळ्ण्यापूर्वी त्याला धूपदीप दाखवा.

एक दिवा प्रज्वलित करा ,दोन अगरबत्ती लावा किंवा धूप लावा. मनोभावे प्रार्थना करा की आपण आमच्या घरात प्रवेश केला आहे , आपल्या कृपेने आमचं घर धनधान्याने परिपूर्ण व्हावं. लाल रंगाच्या कपड्यात गुंडाळून आपण आपल्या तिजोरीत ठेवू शकता. तिजोरीमध्ये ठेवण्याऐवजी आपण ताबीज मध्ये तो तुकडा ठेवून हा ताबीज आपल्या उजव्या दंडावरती धारण करावा. महिला किंवा पुरुष जे कुणी असतील त्यांनी उजव्या दंडावरती धारण करावा. असा हा प्रभावशाली करोडपती बनवणारा उपाय नक्कीच खूप लाभदायी आहे. हा उपाय जर तुम्ही केलात तर माता लक्ष्मीची कृपा सदैव राहील व तुम्ही कधीच गरीब होणार नाही.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *