चेहऱ्यावरील तीळ हटवण्याचे “8” घरगुती उपाय पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल..!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो चेहऱ्यावर असलेला एखादा तीळ ब्युटीमर्क असू शकतो. परंतु चेहऱ्यावर अधिक तीळ असल्यास किंवा त्याची जागा चुकीची असल्यास आपल्याला ते खटकतात. शरीरावरील तीळ काढून टाकण्यासाठी काही डरमेटोलोजीक ट्रेटमेंट आहेत. परंतु हे तीळ आपल्या घरगुती उपयांनीही निघून जाऊ शकतात हे तुम्हाला माहिती आहे का..? चला तर मग आज जाणून घेऊया असेच काही घरगुती उपाय.
कोथिंबिरीच्या पानाची पेस्ट तयार करून ती पेस्ट नको असलेल्या तीळ वर नियमितपणे लावा.
एरंडेल तेलाच्या मॉलिशमुळेदेखील तीळापासून सुटका मिळू शकते, यामुळे हळूहळू तीळ कमी होण्यास सुरुवात होईल.

मध आणि सुर्यफुलांच्या बियांच्या तेलाचे मिश्रण करा आणि या मिश्रणाचा तीळावर 5 मिनिट मसाज करा. यामुळे त्वचा तजेलदार होईल आणि सोबतच तीळ कमी होण्यास मदतही होईल.
कपभर अननसाचा रस आणि पाव कप सेंधव मीठ एकत्र करा, या मिश्रणाने स्क्रब केल्यास चेहऱ्यावरील तीळ कमी होण्यास मदत होईल.
लसणाची पेस्ट रात्री झोपण्यापूर्वी तीळावर लावा आणि त्यावर बँडेज लावा. सकाळी उठल्यावर त्वचा कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. हा प्रयोग नियमित केल्याने तिळाचा त्रास कमी होण्यास मदत होईल.

आल्याचे तुकडे ठेचून तिळाच्या जागी लावून त्यावर कपडा बांधून ठेवल्याने देखील तीळ कमी होण्यास मदत होते.
व्हिटॅमिन सी ची एक गोळीची पेस्ट करून ती तिळावर लावून त्यावर बँडेज लावून झोपा, यानेही काही प्रमाणात तीळ कमी होण्यास मदत होईल.
विन्हेगर चा वापर करून देखील तीळ हटवले जाऊ शकतात.सुरुवातीला चेहरा गरम पाण्याने धुवा त्यानंतर कापसाच्या बोळ्याने तिळावर विन्हेगर लावा.पुन्हा 10 मिनिटानंतर चेहरा गरम पाण्याने स्वच्छ धुवा.
मित्रांनो आम्हाला आशा आहे की हे उपाय तुम्हाला नक्कीच आवडले असतील. आवडल्यास या माहितीला सगळ्यांना शेअर करायला विसरू नका.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *