दिखावा करणे गरजेचे आहे का.? पहा काय म्हणतात आचार्य चाणक्य याबद्दल.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अनेकदा आपण असे म्हणत असतो की देखावा करण्याची काय गरज आहे. आपल्या काही जण असे असतात की जे घरात त्यांना खायला नसते पण देखावा तर असा असतो ते विचारा नको, असे अनेकदा आपण म्हणत असतो. एक म्हण सर्वांना माहितीच आहे की हत्तीचे दाखवायचे दात वेगळे असतात आणि खायचे दात वेगळे असतात.
कारण हत्तीचे दात आपल्याला दिसतात त्याचा खाण्यासाठी काहीच उपयोग होत नाही. म्हणूनच देखावा करू नये. जे इतरांसाठी उपयोगी नाही त्याचा देखावा करण्यात काय गरजेचा आहे. परंतु आचार्य चाणक्य असे म्हणतात की हत्तीच्या दाता सारखेच पण राहा. आचार्य चाणक्य म्हणतात की जर तुमच्या घरी खाण्यापिण्याचे वांदे असेल, तुमच्या घरी सुख सुविधा नसतील तर त्याच बरोबर तुम्ही अज्ञानी असाल तरी बाहेरच्या जगामध्ये अजिबात दाखवू नका. तुम्ही अज्ञान असाल तर अज्ञान दाखवू नका.तुम्ही गरीब असाल कधी गरिबी दाखवू नका.
जर आपल्याकडे नसलेल्या वस्तू आपण लोकांना दाखवल्या तर लोक आपल्याला मानसन्मान देणार नाही त्याच बरोबर जर आपल्याकडे नसलेल्या गोष्टी आपण दाखविण्याचा प्रयत्न केला जर आपल्याकडे ज्ञान असेल तरी आपण आपल्याला खूप समजत आहे असे जरी दर्शवली तरी लोक आपली हाजी हाजी करतील.
हल्ली देखावा चा जमाना आहे. प्रत्येक जण स्वतः काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करत असतो म्हणूनच जर तुमच्याकडे काही नसेल तरी लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून लोक तुम्हाला मानसन्मान देतील. तुमच्या मागे पुढे फिरतील. आपण अनेकदा पाहिले असेल की साधी घरकाम करणारी सुद्धा बाहेर जाताना अगदी टापटीप इस्त्री केलेले कपडे , परफ्यूम , रुमाल एवढ्या सगळ्या गोष्टी मिरवत असतात जणू काही ते अधिकारी आहेत म्हणूनच आचार्य चाणक्य म्हणतात की तुम्ही बाहेर जाताना तुमच्याकडे जरी काही गोष्टी नसतील तरी ते तुम्ही लोकांना दाखवायला पाहिजे.
त्याचप्रमाणे जरी हत्ती चे खायचे दात वेगळे असतात आणि दाखवायचे दात वेगळे असतात हे जरी खरे असले तरी यावरून हत्तीच्या दातांचे महत्त्व आपल्याला कळते तो किती बलाढ्य आहे किती रुबाबदार आहे तसेच माणसाचे सुद्धा आहे जर तुमच्याकडे कोणत्या गोष्टीची कमतरता असेल तर लाजू नका उलट ते दाखवण्याचा प्रयत्न करा कारण की तुमचा रुबाब तुमचा दर्जा हेच सगळं काही सांगून जाणारा करतो म्हणूनच नेहमी ताठ मानेने जगण्यासाठी देखावा करणे गरजेचे आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.