कच्चा कांदा खाणाऱ्यांनी हि माहिती एकदा अवश्य वाचा; जाणून घ्या त्याचे फायदे व तोटे.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो आपल्यापैकी अनेकांना भाजी खाताना सोबत कांदा तोंडी लावण्याची सवय असते. किंवा सलाड मध्ये कच्चा कांदा खाल्ला जातो. मित्रांनो जर तुम्हीही कांद्याचं नियमित सेवन करत असाल किंवा कांदा हा वारंवार कच्चा खात असाल तर आजची माहिती आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आहे.
मित्रांनो कच्चा कांदा खाण्याचे काही फायदे आहेत आणि सोबतच काही तोटे सुद्धा आहेत. मित्रांनो जे लोक नियमितपणे कच्चा कांदा खातात त्यांना कँ सर होण्याची शक्यता फार कमी असते. कारण कच्या कांद्यामध्ये क्यूरसीटी नावाचा महत्वाचा अँटिऑक्सिडेंट आढळतो. जो कॅ न्सर रोखण्यामध्ये मोठी मदत करू शकतो. आणि म्हणून जर भविष्यात कॅ न्सर होऊ नये असं वाटत असेल तर कच्च्या कांद्याचं सेवन अवश्य करत चला.
मित्रांनो कच्च्या कांद्याचा दुसरा मोठा फायदा हा आपल्या हृदयासाठी आहे. नियमितपणे कच्च्या कांद्याचं सेवन करणाऱ्या लोकांना हार्ट अ टॅक येण्याचं प्रमाण अत्यंत कमी असतं. कारण कच्चा कांदा खाल्ल्याने आपल्या शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल असत त्याच प्रमाण कमी होत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये लाल रक्तपेशी एकत्रित येत नाहीत व त्यांची गाठ बनत नाही. हे एक खूप मोठा फायदा आहे कच्चा कांदा खाण्याऱ्यांसाठी. कच्चा कांदा खाल्ल्याने शरीरात रक्ताच्या गाठी बनत नाहीत परिणामी नसा ब्लॉक न होता हार्ट अटॅक येण्याचा धोका कमी होतो.
कच्चा कांदा खाण्याचा तिसरा मोठा फायदा आहे तो म्हणजे मधुमेहाच्या रोग्यांसाठी. ग्रामीण भागामध्ये याला साखऱ्या रोग म्हणतात. मित्रांनो या कच्च्या कांद्यामध्ये क्रोमियम हा महत्वाचा घटक आढळतो कि जो रक्तातील साखरेची लेव्हल कंट्रोलमध्ये ठेवतो. परिणामी आपल्याला डायबिटीज होत नाही. ज्यांना डायबिटीज आहे अशा लोकांनी सुद्धा या कच्च्या कांद्याचं सेवन अवश्य करा.
मित्रांनो आपली सध्या जीवनशैली बदललेली आहे. यामुळे अनेकांचं पोट खराब होत आणि कब्ज, ऍसिडिटी होते. अशावेळी मित्रांनो आपलं पोट जर साफ करायचं असेल तर आपण रोजच्या आहारामध्ये कच्च्या कांद्याचा समावेश अवश्य करा कारण या कांद्यात असणार फायबर पोट साफ करत आणि कब्ज, ऍसिडिटी यांपासून आपला बचाव करत.
मित्रांनो सध्याच्या काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यामध्ये सर्व लोक लागलेली आहेत. रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढेल यासाठी सर्वजण प्रयत्न करत असताना हा कच्चा कांदा आपल्याला मोठी मदत करू शकतो. या कच्च्या कांद्यामध्ये आपल्याला काही फायटो केमिकल्स आढळतात कि जे आपल्या शरीरात व्हिटॅमिन सी ची लेव्हल वाढवतात आणि परिणामी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
मित्रांनो कधी तुमच्या तोंडामध्ये इन्फेक्शन झालं किंवा तुम्हाला दातांची एखादी समस्या असेल तर कच्चा कांदा २-३ मिनिटे चावून चावून खा, आपल्या तोंडातील इन्फेक्शन याने बरं होत आणि दातांच्या अनेक समस्या सुद्धा याने नामशेष होतात. तोंडाच्या आरोग्याबरोबरच ज्यांना खोकला येतो अशा लोकांनी कच्च्या कांद्याच्या रसात तितकाच मध मिसळा. आणि ते मिश्रण आपण पिया, मित्रांनो खोकल्यामध्ये तात्काळ आराम देणारा असा हा घरगुती उपाय आहे.
मित्रांनो आजकाल मोबाईलचा वापर वाढलाय, तसेच कॉम्पुटर असेल, लॅपटॉप, टीव्ही यांचा वापर प्रमाणापेक्षा जास्त होतो तेव्हा आपल्याला डोळ्यांच्या अनेक समस्या जाणवतात. आणि मग कालांतराने चष्मा लागतो, चष्म्याचा नंबर वाढतो. अशावेळी आपण नियमित जर कांदा खात असाल तर मित्रांनो वयानुसार डोळ्यांचे जे आजार निर्माण होतात ते आजार कमी होतात. डोळ्यांची जी दृष्टी आहे ती अबाधित राहते, दृष्टी सुधारते.
जे लोक नियमित कच्चा कांदा खातात त्यांना अजून एक मोठा फायदा म्हणजे या कांद्यात असणार मिथाईल सल्फाइड आणि एमूनिओ ऍसिड हे घटक आपल्या शरीरात साठलेल्या खराब कोलेस्ट्रॉलला कमी करतात. आणि चांगला कोलेस्ट्रॉल वाढवण्यात मदत करतात. परिणामी आपल्या धमन्या, रक्तवाहिन्या, नसा तसेच आपले हृदय निरोगी राहते.
तर मित्रांनो कच्चा कांदा खाण्याचे आहेत हे सगळे फायदे. मात्र सोबतच काही तोटे सुद्धा आहेत. पहिला तोटा म्हणजे ग’र्भ’वती महिलांनी कच्च्या कांद्याचं सेवन प्रमाणात करावं. कारण हे प्रमाण जास्त वाढलं तर ग’र्भ’वती महिलांना छातीमध्ये जळजळ होणे यांसारख्या समस्या जाणवू शकतात.
कच्च्या कांद्याच अधिक प्रमाणात सेवन केल्यास पोटामध्ये गॅसेस होणे किंवा पोटात जळजळ होणे, उलटी होणे यांसारख्या समस्या सुद्धा निर्माण होऊ शकतात. काही लोकांना कांद्याचा रस त्वचेवर लावल्याने त्वचेला खाज उठणे किंवा त्वचेला रॅशेस उठणे यासारख्या समस्या जाणवू शकतात.
ज्यांना डायबिटीज आहे अशा लोकांनी कच्च्या कांद्याचं सेवन अवश्य करावं मात्र ते प्रमाणात करा कारण डायबिटीज च्या रोग्यांनी अतिप्रमाणात जर कच्च्या कांद्याचं सेवन केलं तर त्यांच्या रक्तातील साखर हि खूप कमी होऊ शकते. आणि सर्वात मोठा तोटा म्हणजे कच्चा कांदा खाल्ल्याने तोंडाचा वास येतो ज्याने तुमचा पार्टनर तुमच्यावर रंगवण्याची शक्यता असते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.