घरात या ठिकाणी ठेवा तुरटी; घरामध्ये कायम धन व सुखशांती टिकून राहील.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो आजच्या लेखात आपण एक तुरटीचा उपाय बघणार आहोत. तुरटी एक खूप गुणकारी वस्तू आहे, तुरटीचा वापर आपण कितीतरी तो टके आणि तंत्रांमध्ये करतो. आज आपण असाच धनलाभासाठी तुरटीचा एक उपाय बघणार आहोत. काही व्यक्ती या उपायांचा अवलंब करून आपले जीवन सुखी व समृद्ध करतात. तर काही व्यक्तींना या सर्व अंधश्रद्धा वाटतात. आता ज्याचे त्याचे विचार आणि ज्याचे त्याचे मत आपण यात काहीही करू शकत नाही. ज्यांना मानायचे ते मानतील व ज्यांना नाही मानायचे ते न मानोत.
हा ज्याचा त्याचा प्रश्न, कोणताही उपाय करताना त्यात विश्वास हवा. विश्वासपूर्वक केलेले कोणतेही काम पूर्णच होते व उपायांचा निश्चितच आपल्याला फायदाही मिळतो. तुरटीचा वापर आपण फार पूर्वीपासून करत आलेलो आहोत. तुरटीचा वापर आपण अँटिसेप्टिक म्हणून करतो.
जखम झाली, भाजले, कापले किंवा मार लागला त्या ठिकाणी तुरटीची पावडर लावली जाते. किंवा तुरटीची पाणी लावून ती जखम धुतली जाते. परंतू तुरटीची काही असे उपाय आहेत जे करून आपण आपली दशा व दिशा दोन्हीही बदलू शकतो. जर आपण एखादे काम करीत असलो परंतु त्यात काही न काही अडथळे येत असतील आपल्या कष्टाचे म्हणावे तसे फळ मिळत नसेल व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल तर तुरटीचा हा उपाय नक्कीच करून पहा. आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी, नोकरीच्या ठिकाणी तसेच घरातील प्रत्येक खोलीत एक-एक तुरटीचा तुकडा ठेवावा.
याचा सर्वात मोठा फायदा हा आहे कि तुरटी ज्या ठिकाणी ठेवलेली असते त्या ठिकाणचा वास्तुदोष निघून जातो. यामुळे तुमच्या कामातील अडथळे दूर होतील. तुमची प्रगती होईल व तुमचे प्रत्येक कार्य पूर्ण होईल. जर तुम्ही भरपूर कष्ट करीत आहात परंतु तुमच्या कष्टाचे म्हणावे तसे फळ मिळत नसेल तर एका काळ्या कापडात एक तुरटीचा तुकडा बांधून घ्यावा.
हे कापड आपल्या घराच्या पुढे मुख्य दाराच्या वरच्या बाजूला लावून द्यावे. असे केल्याने वास्तुदोष दूर होतो. आपल्या आसपासची नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. तसेच आपल्या घरात बरकत येते. आणि तुमच्या व्यवसायातही वृद्धी व्हायला सुरवात होते.
जर तुमच्यावर खूप कर्ज झाले असेल काही केल्या ते फिटतंच नसेल, कर्जाचा डोंगर वाढतच चालला असेल तर एक नागलीचे पान वा विड्याचे पण घ्यावे. त्यामध्ये थोडेसे कुंकू टाकावे व त्यात एक छोटासा तुरटीचा तुकडा टाकून ते पण लाल रंगाच्या दोऱ्याने बांधून घ्यावे. नंतर हे पण पिंपळाच्या झाडाखाली खड्डा करून त्यात मातीखाली दाबून द्यावे.
या उपायामुळे थोड्याच दिवसात तुम्हाला कर्जातून मुक्तता मिळेल. थोडे-थोडे करता करता तुमचे संपूर्ण कर्ज फिटेल व तुम्ही कर्जमुक्त व्हाल. मित्रांनो तुरटीच्या या उपायांचा अवलंब करून तुम्ही तुमच्या आर्थिक समस्येपासून सुटका मिळवू शकता. तसेच देवी लक्ष्मीला प्रसन्न करून धनवान होऊ शकता.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.