पहा हॅन्ड सॅनिटायजरचा अतिवापर शरीरासाठी कशाप्रकारे होऊ शकतो धोकादायक…!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हॅन्ड सॅनिटायजर चा अतिवापर करणे होऊ शकते धोक्याचे असा इशारा आरोग्य विभागाने दिला आहे. मित्रांनो भारतात कोरोना व्हायरस चा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सरकारने अनेक सूचना जाहीर केल्या आहेत. घराबाहेर पडताना तोंडाला मास्क आणि हातानं सॅनिटायजर वापरण्या व्यतिरिक्त सोशल डिस्टन्सिंग करण्यास सांगितले आहे.

मात्र आरोग्य मंत्रालयाने हॅन्ड सॅनिटायजर चा जास्त वापर करणे देखील हानिकारक ठरू शकते असं म्हटलं आहे. आरोग्य विभागाचे अतिरिक्त संचालक डॉक्टर आर के वर्मा यांनी म्हटलं आहे की सध्याची भारताची स्थिती अभूतपूर्व आहे. कोणी यापूर्वी कल्पना केली नव्हती कि कोरोना व्हायरस इतका धोकादायक बनेल.

नागरिकांनी स्वरक्षणासाठी मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. गरम पाणी वारंवार प्यावं तसेच हात वारंवार धुवावेत. शक्यतो सॅनिटायजर चा जास्तीत जास्त वापर करणे टाळावे. याआधी आरोग्य मंत्रालयातील तज्ज्ञांनी सांगितलं होत कि सॅनिटायजर चा अतिवापर त्वचेसाठी हानिकारक आहे. हॅन्ड सॅनिटायजर च्या जास्त वापरामुळे त्वचेचा निगा राखणारा बॅक्टेरिया मारला जातो.

तज्ज्ञांच्या मते साबण आणि पाणी पर्याय असेल तर हॅन्ड सॅनिटायजर चा वापर टाळावा. गेल्या सहा महिन्यात सॅनिटायजर चा अति वापर होत असल्याचं समोर आलेलं आहे. त्यामुळे तुम्ही जर अती सॅनिटायजर जर वापरत असाल तर तो आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. आपल्या त्वचेला त्यापासून धोका निर्माण होऊ शकतो.

मित्रांनो तुम्हाला कळलंच असेल कि सॅनिटायजर जास्त प्रमाणात वापरणे किती हानिकारक आहे. म्हणून शक्यतो तो कमी वापरून हात साबण आणि पाण्यानेच धुवा. आम्हाला अशा आहे कि हि माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असणार, आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील जरूर शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा याबद्दल माहिती मिळेल. 

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *