केसातील कोंड्याच्या समस्येमुळे हैराण आहेत..? तर हे ५ घरगुती उपाय एकदा नक्की पहा..
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजकालच्या दैनंदिन जीवनात सर्वांना स्वतःकडे लक्ष देण्याकडॆ मुळीच टाइम नसतो. त्यात हल्ली प्रत्येक व्यक्तींचे व अगदी लहान मुलांचे देखील केस पिकण्याची समस्या वाढलेली आहे. केस पिकणे किंवा गळणे याचे मुख्य कारण म्हणजे केसांवर असलेला कोंडा. होय, आपल्या केसांवर कोंडा असल्याने आपल्याला केस पिकणे आणि गळण्याची समस्या उदभवते. म्हणून आज आपण जाणून घेणार आहोत कोंडा घालवण्याचे काही उपाय जे करून तुम्ही तुमचे केस स्वच्छ ठेऊ शकता.
१. दही
दह्यामधील ऍसिटिक गुणधर्मामुळे तो कोंड्यासाठी चांगला उपाय ठरतो. दही २ दिवस आंबट होण्यासाठी ठेवा त्यानंतर हे दही डोक्यावर लावून किमान १ तास ठेवावे आणि त्यानंतर शाम्पूने केस धुवावेत. हि प्रक्रिया आपल्याला कमीतकमी ३ दिवस करायची आहे. ३ दिवस हि प्रक्रिया केल्याने केसातील कोंडा कमी झालेला आपल्याला दिसून येईल.
२. कोरफड
कोरफडीमध्ये अनेक गुणधर्म आहेत. कोंड्याचे प्रमाण जास्त असेल तर ताजा कोरफडीचा गर काढून केसांच्या मुळाला लावावा. त्यानंतर १ तासाने केस धुवावेत. मित्रांनो असे ३ दिवस केल्याने केसातील कोंडा कमी झालेला आपल्याला दिसून येईल.
३. कडुलिंब
कडुलिंबाच्या पानांमध्ये अनेक आयुर्वेदिक गुणधर्म आहेत. कडुलिंबाची पाने पाण्यात उकळून त्या पाण्याने केस धुवावेत. कडुलिंब अँटीफंगल आहे, त्यामुळे कोंड्यासह एलर्जी देखील दूर होण्यास मदत होते.
४. लिंबू
लिंबाचा रस कोंड्यासाठी एक रामबाण उपाय मानला जातो. लिंबाचा रस पाण्यामध्ये घालून त्याने केस धावून काढा. असे किमान २ दिवस केल्याने तुमच्या केसातील कोंडा कमी झालेला दिसून येईल.
५. तुळस व आवळा
आवळ्याचे केसांना असणारे फायदे तुम्हाला माहिती असतीलच. तुळशीची पाने व आवळा पावडर पाण्यात एकत्र करून त्याची पेस्ट केसांना लावावी. त्यानंतर १ तासाने केस धुवून टाकावे. यामुळे अवघ्या २ दिवसात तुम्हाला कोंडा पूर्णपणे नाहीसा झालेला दिसेल.
तर मित्रांनो हे होते ५ घरगुती उपाय ज्याने तुम्ही आपल्या केसातील कोंडा घालवू शकता. आम्हाला आशा आहे तुम्हाला हि माहिती नक्कीच आवडली असणार. आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.