जास्त विचार करत असाल तर हा लेख अवश्य वाचा; हे आहेत त्यामागील थक्क करणारे कारण.!

जास्त विचार करत असाल तर हा लेख अवश्य वाचा; हे आहेत त्यामागील थक्क करणारे कारण.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अनेकदा आपण सगळे जण जास्त विचार करत असतो तर त्याचा आपल्या आरोग्यावर तसेच आपल्या करिअर, व्यवसाय सर्व गोष्टीवर या करणामुळे परिणाम होताना दिसून येतो. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी की कमी विचार करायला हवा आपण अनेकदा अनेक गोष्टींचा जास्त विचार करतो तर ते विचार आपल्या डोके खात राहतात म्हणून अनेकदा जास्त विचार करणे माणसाला कमजोर बनवते आणि आपल्या आयुष्यात अश्याच अनेक गोष्टी घडत असतात.

अनेकदा आपल्या आजूबाजूला असणारे अनेक व्यक्ती, आपल्या बद्दल काही ना काही सांगत असतात किंवा एखाद्या घटनेबद्दल सांगत असतात अशा वेळी आपण सांगितलेल्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करतो आणि त्यावर विचार करू लागतो. बहुतेक वेळा आपण त्या परिस्थितीचा व त्या घटनेचे एवढा विचार करतो की त्या घटनेमुळे किंवा त्या विचारांमुळे आपले जीवन उद्ध्वस्त होऊन जाते म्हणूनच जर कोणी ही आपल्याला काही सांगितले तर त्या गोष्टीचा जास्त प्रमाणात विचार करायचा नाही.

आपण अनेकदा कोणतीही गोष्ट विचारपूर्वक करत असतो परंतु एखादी गोष्ट जर आपण विचाराने करायला लागलो तर त्या सर्व गोष्टींचा आपल्या मनावर व शरीरावर विपरीत परिणाम होतात त्यांना अनेकदा दिसून येतो. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला सांगते की आपण हे कार्य करू शकत नाही अशा वेळी आपण त्या गोष्टीवर जास्त लक्ष केंद्रित करतो आणि परिणामी कुठेतरी आपण नकारात्मक भावनेने पछाडून जातो आणि आपल्या संपूर्ण चुकीच्या दिशेने वाटचाल करू लागतो.

परंतु एखाद्या व्यक्तीने आपल्याला सांगितले कि तु हे कार्य करु शकतोस तेव्हा आपल्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो आणि आपण ती गोष्ट शंभर टक्के करण्याचा प्रयत्न करत असतो कारण की त्या व्यक्तीच्या प्रोत्साहनामुळे आपल्या मनामध्ये सकारात्मक वलय तयार होते आणि हे सकारात्मक वलय आपले काम करण्यासाठी मदत करू लागते.

वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर आपण विचार करायला घेतला तर मानवी मेंदूमध्ये एका दिवसांमध्ये 70 हजारापेक्षा जास्त विचार येत जात असतात. त्यातील अधिक तर विचार काहीच कामाचे नसतात. फक्त पाच टक्के विचारांवर आपण दिवसभरामध्ये काम करत असतो. हेच पाच टक्के विचार आपल्या आयुष्यात आपली प्रगती घडवत असतात. तुम्ही पण या 95% विचारांमध्ये जास्त गुंतत आणि विचार करत बसत असतो आणि आपल्या आयुष्यात आपण पुढील प्रमाणे अडकून राहतो.

कोणीतरी आपल्या कानात काहीतरी सांगतात की हे होऊ शकत नाही तुझ्याकडून आणि आपण जास्त विचार करायला लागतो. म्हणून जास्त विचार करण्यावर वेळ घालवण्यापेक्षा त्या विचारांवर कार्य करणे अत्यंत आवश्यक ठरते.

जर तुम्ही जास्त विचार करत असाल तर तुम्ही तुमचे जीवन नष्ट करत आहात. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आपण जास्त विचार करून सोपी गोष्टीला अवघड बनवत असतो म्हणून नेहमी जास्त विचार करण्यापेक्षा त्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा तुम्हाला काय करता येईल हे लक्षात ठेवा अनेकांनी फक्त विचार न करता कामाचा स्वीकार केला त्यांनी तात्काळ त्याच्यावर कार्य केले म्हणून ते यशस्वी झाले म्हणून जेव्हा तुम्ही जास्त विचार करत असाल अश्या वेळी पटकन निर्णय घ्या आणि त्यावर कार्य करा.

तुम्ही एखादे कार्य कराल तेव्हा सुरुवातीला अपयश प्राप्त होईल, पुन्हा अपयश मिळेल आणि म्हणूनच कोणतेही कार्य करताना नकारात्मक दृष्टिकोनातून न करता सकारात्मक दृष्टिकोनातून करा आणि आपले जीवन समृद्ध आणि सकारात्मक बनवा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *