मोड आलेली मटकी खाण्याचे फायदे ऐकून तुम्ही चकितच व्हाल; शुगर दूर करून रोगप्रतिकारक शक्तीही वाढेल.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मटकी हा भारतीय आहारामध्ये प्रामुख्याने वापरला जाणारा पदार्थ आहे. ही मटकी भिजवून तसेच वाफवून सुद्धा जेवणामध्ये खाल्ली जाते.अनेकदा मटकीला मोड आणून सॅलड म्हणून सुद्धा याचा वापर केला जातो.मटकीला मोड आल्यामुळे त्याच्यामध्ये असणारे गुणधर्मांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ होते तसेच बॉडी बिल्डिंग साठी मोड आलेले मटकी खाण्याचे अनेक जण सल्ले देत असतात. मटकी मध्ये नेमके कोणते गुणधर्म आहेत.? मटकी नेमकी कशी उपयुक्त ठरते.? हे आज आपण आपल्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.
मोड आलेली मटकी प्रोटीन चा सर्वात मोठा स्रोत मानला जातो. मटकी मुळे आपले स्नायू मजबूत व बळकट होतात. जर तुम्ही शाकाहारी असाल अशावेळी डॉक्टर सुद्धा मांसाहार न करणाऱ्या व्यक्तींना मटकी खाण्याचे सल्ले देत असतात कारण शरीराला आवश्यक असणारे प्रोटीन मटकी मध्ये उपलब्ध असतात त्याचबरोबर मटकी मध्ये उपलब्ध असणारे प्रोटीन हे अमिनो एसिड युक्त असते. हे तुमची त्वचा सुंदर ठेवण्यासाठी मदत करत असते.
त्वचेची जखम बरी करण्यासाठी तसेच जखम भरून काढण्यासाठी सुद्धा हे ऍमिनो ऍसिड मदत करते तसेच नख व केस जर आपल्याला मजबूत ठेवायचे असतील तर आपल्या आहारामध्ये नियमित पणे मोड आलेली मटकी असणे आवश्यक आहे. अनेक जणांना पोट साफ न होणे मलावरोध याचा त्रास असतो. हा त्रास दूर करण्यासाठी आपल्या आहारामध्ये मटकीचा समावेश नेहमी करायला हवा याचबरोबर थोडासा द्रवपदार्थ व नियमितपणे व्यायाम केल्यामुळे आपल्याला होणारा त्रास आहे तो कमी होतो.
फायबरयुक्त मटकीमुळे आपल्या शरीरातील रक्तामधील साखरेचे प्रमाण वर सुद्धा नियंत्रण ठेवता येते. आपल्या रक्ता मध्ये किती प्रमाणात साखर असावी हे ठरविण्याचे कार्य फायबर करत असते म्हणूनच मधुमेह असणाऱ्या रुग्णांना मटकी तसेच फायबर अधिक प्रमाणात असणारे पदार्थ खाणे फायद्याचे ठरते.
म्हणूनच मोड आलेल्या मटकीची मुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते याच्या सोबत मटकितील फायबर शरीरातील क्लोरेस्टॉल कमी करण्याचे कार्य करते तसेच मटकी मध्ये असणारी पोटॅशियम रक्तवाहिन्या तील काम सुरळीतपणे करते म्हणून आपल्या रक्तदाब नियंत्रणात राहतो त्याचबरोबर मासिक पाळी व गर्भारपणा मध्ये जर अधिक रक्तस्त्राव होत असेल तर अनेकदा महिलांमध्ये ॲनिमियाचा त्रास उद्भवू शकतो.
हा त्रास टाळण्यासाठी नियमितपणे आपल्या जीवनामध्ये मटकीचा समावेश करावा कारण की मोड आलेल्या मटकीची मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोह असल्यामुळे रक्ताची कमतरता भरून निघते तसेच रक्त मटकी मध्ये झिंकचे प्रमाण भरपूर असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते. ताणतणावामुळे होणाऱ्या समस्या पासून वाचण्याचे कार्य सुद्धा मटकी करत असते.जर तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ताण तणाव असेल तसेच रोगप्रतिकारक क्षमता कमी असण्याचा धोका टाळायचा असेल तर नियमित पणे आपल्या जेवणामध्ये मटकीचा समावेश अवश्य करा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.