रविवारच्या दिवशी सूर्य देवाला जल अर्पण करते वेळी कलशामध्ये टाका ही एक वस्तू; सगळ्या इच्छा होतील लवकरच पूर्ण.!

रविवारच्या दिवशी सूर्य देवाला जल अर्पण करते वेळी कलशामध्ये टाका ही एक वस्तू; सगळ्या इच्छा होतील लवकरच पूर्ण.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हिंदू धर्मशास्त्रामध्ये सूर्यदेवाला अनन्य महत्त्व आहे तसेच सर्व नवग्रहांचे देवता सुद्धा सूर्यदेवाला मानण्यात आलेले आहे. ज्या व्यक्तीवर सुर्यदेवांची कृपादृष्टी असते त्या व्यक्तीला भविष्यात कोणत्याच गोष्टीची कमतरता लाभत नाही. आपल्या दिवसाची सुरुवात सूर्याच्या आशीर्वादाने होत असते. आपल्यापैकी अनेक जण सकाळी उठल्यावर सूर्य देवतांना जल अर्पण करत असतात. रविवारचा दिवस हा प्रामुख्याने सूर्य देवांचा मानला जातो. या दिवशी सूर्यदेवाची पूजा आराधना केल्याने आपल्यावर सुर्यदेवांची कृपादृष्टी होते आणि सूर्य देव सुद्धा मनोवांचीत फल प्रदान करत असतात.

अनेकदा आपल्याला ज्येष्ठ मंडळी कडून नेहमी एक सल्ला दिला जातो की सकाळी लवकर उठायला हवे आणि सकाळी लवकर उठतो त्याचा संपूर्ण दिवस चांगला जातो. संपूर्ण दिवसांमध्ये अनेक कार्य त्याच्या हातातून चांगले करीत असतात हे म्हणणे जरी खरे असले तरी आपल्या जीवनासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे. जेव्हा आपण सकाळी लवकर उठतो तेव्हा आपल्याकडे वेळ सुद्धा जास्त प्रमाणामध्ये असतो आणि जी व्यक्ती सकाळी लवकर उठते त्या व्यक्तीवर सूर्य देवाची कृपा सुद्धा लवकर होते.

जी व्यक्ती सकाळी लवकर उठत नाही, उशिरा उठते अशा व्यक्तीकडे दिवस सुद्धा पूर्णपणे मिळत नाही आणि त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अनेक संकटे अडचणी कटकटी निर्माण होत असतात. अनेक नकारात्मक ऊर्जा त्यांच्या जीवनामध्ये वास्तव्य करत असते. जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या जीवनामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा वास्तव्य करायला हवी सकाळी लवकर उठायला हवे त्याचबरोबर सकाळी ब्राह्ममुहूर्तावर स्नान केल्याने आपल्याला दैवी शक्ती प्राप्त होत असतात कारण की या ब्रह्म मुहूर्ताच्या दरम्यान आपल्या आजूबाजूला अनेक सकारात्मक ऊर्जा वास्तव्य करत असतात.

हिंदू धर्म शास्त्रामध्ये सकाळी उठल्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करण्याची प्रथा आहे परंतु हे जर आपण योग्य रीतीने अर्पण केले तर आपल्याला तसे फळ सुद्धा प्राप्त होते आणि सूर्य देवांच्या आशीर्वादाने आपल्या जीवनामध्ये नेहमी तेज निर्माण होत असते. जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमचे विवाह लवकर जमायला हवे त्याचबरोबर तुम्हाला चांगल्या पगाराची नोकरी मिळायला हवी. जीवनामध्ये अनेक वाईट गोष्टी लवकर दूर व्हायला पाहिजेत यासाठी तुम्हाला तुमच्या कुंडलीतील सूर्य ग्रहाची स्थिती उत्तम असणे गरजेचे आहे.

जर तुमच्या कुंडली मधील सूर्यदेवाची स्थिती चांगली असेल तर तुम्हाला अनेक चांगले फायदे पाहायला मिळतात जर नसेल तर अशावेळी आपल्याला काही उपाय करणे गरजेचे आहे. रविवारच्या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करून एका तांब्याच्या कलशामध्ये पाणी घ्यायचे आहे आणि हे पाणी आपल्याला सुर्यदेवांना अर्पण करायचे आहे.

सूर्यदेव यांना जल अर्पण करत असताना ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. हा जप केल्याने आपल्या वर सूर्य देवाची कृपा होते अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक रविवारी हा उपाय करायचा आहे. आजच्या लेखामध्ये आपण जे उपाय जाणून घेणार आहोत तो अत्यंत महत्त्वाचा आहे. रविवारच्या दिवशी आपल्याला एका तांब्याच्या कलशामध्ये पाणी घ्यायचे आहे आणि हे पाणी घेण्यापूर्वी आपल्याला आदित्याय नमः ,ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर या कलशामध्ये यमुनेचे पाणी भरायचे आहे.

यमुना नदी ही सूर्य देवाची पुत्री आहे तसेच देवाची बहिण आहे आणि म्हणूनच आपण कलशामध्ये यमुना नदीचे पाणी भरल्याने व हे जल देवाला अर्पण केल्याने आपल्याला विशेष फळ प्राप्त होते तसेच सूर्य देवाची कृपा तर आपल्याला होते पण त्याचबरोबर देवाची कृपा दृष्टी सुद्धा आपल्या होते आणि म्हणूनच कधीही अकाली मृत्यू आपल्यावर ओढवत नाही.

तुमच्या जीवनामध्ये अशांती असेल तर ती दूर होऊन जाईल ,कोर्टकचेरीच्या कामांमध्ये तुम्हाला यश प्राप्त होईल तसेच तुमच्या जीवनामध्ये येणारा काळ सुद्धा सकारात्मक दृष्टीने भरलेला असेल म्हणूनच आपल्याला हा उपाय अवश्य करायचा आहे.

जर तुम्हाला असे वाटत असेल की आपल्या जीवनामध्ये धन संपत्ती वाढवी तर यासाठी आपल्याला रात्री झोपताना तांब्याच्या कलशामध्ये पाणी ठेवायचे आहे आणि हा कलश आपल्याला रात्रभर आपल्या उशाशी ठेवायचा आहे आणि सकाळी उठल्यावर सूर्यदेवाला जल अर्पण करताना ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप करायचा आहे व त्याचबरोबर या कलशामध्ये आपल्याला सकाळी लाल रंगाचे फूल सुद्धा टाकायचे आहे कारण लाल रंग हा माता महालक्ष्मी चा आवडता रंग असतो आणि कोणत्याही लाल रंगाचे फूल आपल्याला हा उपाय करण्यासाठी वापरायचा आहे.

असे जर आपण एकवीस वेळा केले तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये माता महालक्ष्मी चा प्रवेश होऊ लागेल व धन तुमच्याकडे आकर्षित होईल अशाप्रकारे सूर्यदेवाला जल अर्पण करत असताना या सगळ्या गोष्टींचा उपयोग अवश्य करायचा आहे आणि आपले जीवन समृद्ध बनवायचे आहे म्हणून हा उपाय अवश्य करा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *