दूध उतू गेल्यास घरात काय घडते..? नेमके काय आहेत याचे संकेत..?

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या आसपास कितीतरी सध्या गोष्टी घडतात. जसे हातातून एखादे भांडे खाली पडणे, काचेची वस्तू फुटणे, दूध तापत असताना ते उतू जाणे परंतु त्याचा आपल्या भविष्याशी किंवा येणाऱ्या काळाशी काही संबंध असेल असे आपल्या मनातही कधी येत नाही.

परंतु ज्योतिषशास्त्र मानल्यास दूध उतू जाणे यातही खूप मोठा अर्थ सामावलेला आहे. जर तुम्ही कितीही लक्षपूर्वक काम केले तरी दूध तापवताना थोडे तरी दूध जात असेल, फरशीवर सांडत असेल किंवा गॅसवर पडत असेल तर हा एक शुभ संकेत आहे. याचाच अर्थ तुम्हाला काहीतरी चांगली बातमी मिळणार आहे.

दूध उतू जाणे याचाच अर्थ तुमचे घर दूध दुभत्याने भरलेलं आहे. श्री कृष्णाची नगरी वृंदावनात प्रत्येकाकडे गायी असत. म्हणून सर्वांच्या घरी दही,तूप,दूध याचे माठ भरलेले असत. गोकुळात जणू दही दूध उतू जात असे. त्यामुळेच दूध उतू जाणे म्हणजे आपले घरही भरल्या गोकुळाप्रमाणे असते. आजकालची पिढी हे मानणार नाही, ते म्हणतील कि हि अंधश्रद्धा आहे असे कधी होते का.?

परंतु आपले ज्योतिषशास्त्र व आयुर्वेद खूप प्राचीन आहे. आपल्या ऋषीमुनींनी अभ्यास करून व सर्व गोष्टींचा सारासार विचार करूनच आपली मते प्रगत केली आहे. जे भविष्य मानतात ते हि गोष्ट नक्कीच मानतील. दूध उतू गेल्यास सुख समृद्धी मिळते मान सन्मान प्राप्त होतो. जर एखाद्या कामात जर अडचण निर्माण होऊन ते बंद पडले असेल तर ते कामही सुरळीत पार पडते. आणि लाभदायक घटना घडत असतात.

परंतु जर दूध एखाद्या भांड्यात ठेवले असेल आणि ते आपल्या हातून खाली पडले किंवा धक्का लागून दूध सांडले तर ते एखाद्या दुर्घटनेचे प्रतीक असते. दुर्घटना कशीही असू शकते. ती लहान असेल किंवा मोठी असेलं किंवा ती शारीरिक न राहता मानसिक किंवा आर्थिकही असेल परंतु दुर्घटना नक्की घडते.

काही व्यक्ती दूध उतू जाणे शुभ आहे असू म्हणून मुद्दाम दूध गॅसवर ठेऊन उतू जाऊ देतात. परंतु हे चुकीचे आहे, यामुळे अपशकुन घडतो. घरात भांडण तंटे व कलहाच वातावरण निर्माण होत. दूध तापत असताना आपल्या लक्ष नसताना अचानक उतू जाणे खूप शुभ आहे. म्हणून मुद्दाम दूध उतू जाऊ देऊ नये.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *