अशाप्रकारे घराच्या दारावर लावा घोड्याची नाळ.. नशीब लवकरच बदलून जाईल..!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो आपण अनेकदा खूप लोकांच्या घराच्या दरवाजावर घोड्याची नाळ लावलेली पाहिली असेल. प्राचीन काळांपासून किल्ल्यांच्या मुख्य दरवाजांवर सुद्धा नाळ ठोकलेली असायची. असे करण्यामागचे कारण आज आपण जाणून घेणार आहोत.

सर्वात उत्तम नाळ म्हणजे काळ्या घोड्याची नाळ. काळ्या घोड्याची नाळ विशेष मानली जाते, त्याने दृष्टही लागत नाही. घोड्याची नाळ नकारात्मक ऊर्जा खेचून घेते. घोड्याची नाळ म्हणजेच विशेषतः काळ्या घोड्याची नाळ फक्त अंगठी बनवून अनेकजण घालतात असे नाही तर प्राचीन काळापासून याचा वापर आपल्या घराच्या दरवाजावर लावूनही केला जातो.

घोड्याच्या घासलेल्या नाळेत असं काय असत जे लोक आपल्या घरावरती लावतात. तर शनीच्या उद्रेकापासून बचाव करण्यासाठी हातात अंगठी करून पण नाळ घालतात. वास्तुशास्त्रानुसार घोड्याची नाळ दुर्भाग्य हारणारी आहे. विशेषतः काळ्या घोड्याची नाळ नकारात्मक शक्ती खेचून घेणारी आहे. कारण हि नाळ लोखंडाची असते म्हणून ती शनीच्या वाईट प्रभावापासुन बचाव करते.

शनिदेवांचा आवडता रंग काळा आहे म्हणून काळ्या घोड्याची नाळ शोधली जात असते. घोड्याची नाळ असली कि दृष्टविरोधी मानली जाते असे म्हणतात. म्हणजेच जर कोणाला दृष्ट लागली तर घोड्याची नाळ शत्रूंपासून रक्षणही करते. जाणून घ्या वास्तुशास्त्रानुसार घराबाहेर घोड्याची नाळ ठोकली तर त्याचे नेमके काय फायदे होतात.

वास्तुशास्त्रानुसार ज्यांच्या घराचं दार उत्तर-पश्चिम किंवा पश्चिमेला असतं त्यांनी आपल्या घराच्या प्रवेश द्वारावर काळ्या घोड्याची नाळ अवश्य लावावी. असे मानले जाते कि या घरांना दृष्ट लागण्याची किंवा नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेष करण्याची शक्यता खूप असते. घोड्यांची नाळ या शक्तींना घरात प्रवेश करू देत नाही.

ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेवांना प्रिय लोखंड मानले जाते. ज्यांना शनिदेवाची साडेसाती सुरु आहे त्यांनी काळ्या घोड्याची घासलेली नाळ घ्यावी आणि त्याची अंगठी घालावी असा सल्ला दिला जातो. याने शनिदेवांचा वाईट प्रभाव संपून जातो. पर आपल्या घरात प्रगती होत नसेल तर आपण घराच्या मुख्य द्वारावर घोड्याची नाळ लावावी. सोबतच एका काळ्या कपड्यामध्ये बांधून जिथे धान्य ठेवतात तिथेही ठेवावे. यामुळे आपल्या घराच्या प्रगतीत कधीही कमतरता पडत नाही.

धन येत नसेल किंवा घरात आलेलं धन टिकत नाही तर आपण काळ्या घोड्याची नाळ लावावी. सोबतच ज्यांच्यावर नोकरीचे संकट येते त्यांनी आपल्या घराच्या तिजोरीत काळ्या कपड्यांमध्ये घालून घोड्याची नाळ ठेवावी. वास्तुशास्त्रानुसार ज्या घोड्याची नाळ धावता धावता पडते ती खूप चांगली मानली जाते. अशी नाळ जर मिळाली तर आपल्या इतकं नशीबवान कोणीही नसेल.

दुर्भाग्यापासून रक्षण हि नाळ करते, दुकानाबाहेर काळ्या घोड्याची नाळ ठोकून ठेवल्याने व्यवसायात प्रगती होते आणि लोकांची दृष्टही लागत नाही. घोड्याची नाळ लावल्याने आपले घर सुरक्षित राहते मात्र त्यापूर्वी ज्योतिषाचा सल्ला अवश्य घ्यावा.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती नक्कीच आवडली असेल. माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये. 

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *