मा’सि’क धर्मात काय करावे.? काय करू नये.? मा’सि’क धर्मात पूजा करू शकता का.?

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो आपल्या घरातील स्त्री म्हणजे आई असेल बहीण असेल अथवा बायको असेल ही आपल्या घरची खरी लक्ष्मी असते. सकाळी झोपून उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत ती फक्त कामे करत असते. ती कधीच सुट्टी घेत नाही. स्त्री ही जननी असते निसर्गाने तिला बाळाला जन्म देण्याची देणगी दिली आहे आणि म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीत स्त्रीयांना ला विशेष मान दिला जातो.
स्त्री ही आपल्या घरची अब्रू असते. स्त्रीयांना भगवंताने मासिक धर्म येण्याचे देखील सौभाग्य दिले आहे. स्त्रीयांची मासिक पाळी म्हटले की अनेकांच्या अंगावर काटा येतो. अनेक भारतीय घरात मासिक पाळीच्या दिवसातून स्त्रीयांना वेगळे ठेवले जाते त्यांच्या सगळ्या वस्तू या दिवसात वेगळ्या असतात. शिवाय त्यांना घरातील कोणते ही काम करण्याची परवानगी नसते. पण मित्रांनो मासिक धर्म का सुरु झाला या मागे नक्की काय कथा आहे ह्या बद्दल खूप कमी जणांना माहित आहे. आमच्या या लेखात आम्ही अश्याच काही गोष्टींचा उलगडा करणार आहोत.
मित्रांनो पुराणांनुसार मासिक पाळी यासाठी सुरु करण्यात आली घरातील स्त्री जी बारा महिने राबत असते तिला थोडे दिवस आराम. एकदा माता पर्वती व महादेव शिव शंकर यांमध्ये घरच्या कामावरुन वाद विवाद झाले. तेव्हा रागामध्ये येवून माता पार्वतीने मासिक धर्माची स्थपना केली आणि त्या दिवसापासून आजपर्यंत ही प्रथा चालत आली आहे.
मासिक पाळीच्या दिवसांमध्ये घरातील स्त्रीला थोडे दिवस आराम मिळतो तिला घरात कोणते ही काम दिले जात नाही. सोबतच भारतीय धर्मग्रंथाच्या अनुसार अशी एक कथा प्रचलित आहे देव राज इंद्रांमुळे मासिक धर्माची उत्पत्ती झाली होती. एकदा देवराज इंद्रांदेवांद्वारे देव दानव सभेमध्ये दानवांचे कुलगुरु यांचा अपमान झाला होता त्याच वेळी त्यांनी देवां विरुद्ध युद्धाची घोषणा केली मात्र इंद्र देवांनी दानवांच्या कुल गुरुंची हत्या केली वध केला.
पण एका कुल गुरुचा वध केल्याने देव राज इंद्रांवर महापाप चढले. या पापातून मुक्तता करुन घेण्यासाठी इंद्र देवांनी श्री हरी विष्णूंकडे धावा केला त्यांची कठोर तपस्या केली प्रसन्न होवून भगवंत नारायण यांनी देव राज इंद्रांचे महापाप चार भागांमध्ये विभाजित केले पाहिले दिले धरतीला भेगांच्या स्वरूपात दुसरे दिले झाडांना चिकाच्या स्वरूपात तिसरे दिले पाण्याला फेसाच्या स्वरूपात आणि चौथे दिले बाई ला मासिक पाळीच्या स्वरूपात आणि अश्या प्रकारे मासिक धर्माची उत्पत्ती झाली.
मित्रांनो मासिक पाळी हा शरीर चक्रातीलच एक भाग आहे त्याला चुकीच्या दृष्टीकोणातून पाहू नये. स्त्री ही आपली जननी आहे तिने आपल्याला जन्म दिला आहे आणि हे तेव्हाच संपन्न होते जेव्हा तिला मासिक धर्म येतो. शिवाय स्त्री जेव्हा मासिक धर्मामध्ये असते तेव्हा तिला रक्त स्त्राव होतो असंख्य वेदना होतात म्हणून आपण तिला या काळात योग्य वागणूक दिली पाहिजे तिच्या खाण्या पिण्याची नीट काळजी घेतली पाहिजे. त्या सुद्धा आपल्या सुदृढ समाजाच्या एक अविभाजित भाग आहेत. आपण जसे माता लक्ष्मी आणि माता सरस्वती यांना आपल्या मातेचे स्थान देतो त्यांची पूजा अर्चना करतो तसेच आपण इतर महिलांचा देखील आदर केला पाहिजे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.