1 वेळ लावा केसातील कोंडा २ तासात गायब; केसातील कोंडा घालवण्यासाठी भन्नाट उपाय.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. फक्त एक वेळा करा हा उपाय केसातील कोंडा दोन तासांमध्ये पूर्णपणे नाहीसा होईल. केसांमधील कोंडा होणं अधिक चिकट समस्या आहे.आपले सौंदर्य वाढविण्यासाठी केस आपल्याला मदत करतात. केसात कोंडा झाला असेल अशावेळी केस गळायला लागतात, केसांमध्ये उवा ,लीखा होतात, डोक्यात खाज सुटते, केसात कोंडा झाल्यावर आपण वेगवेगळे प्रोडक्ट वापरतो त्यामध्ये अनेक प्रकारचे केमिकल्स असतात त्यामुळे केस अजून खराब होतात.
कोंडा हा कोणत्या प्रकारचा आहे हे समजून घेतले पाहिजे. सर्वसाधारण कोंडाचे प्रमाण थंडी च्या दिवसांत वाढते त्यानंतर दुसरा प्रकार चा कोंडा तेलकट व घाम त्यामुळे निर्माण होणाऱ्या कोंडा असतो.अनेकदा आपली त्वचा तेलकट होते आणि अशा वेळेस सुद्धा आपल्या केसांमध्ये कोंडा निर्माण होऊ लागतो. अनेकदा आपण जे तेल लावतो आणि आपल्या शरीरावर घाम निर्माण होतो यामुळेसुद्धा केसांमध्ये घाण साचते आणि ही घाण कालांतराने कोंडाच्या रूपामध्ये बाहेर निघते.
तिसरा प्रकार म्हणजे आपली संवेदनशील असणारी त्वचा. बहुतेक वेळा आपण जे रंग लावतो, अनेक जण केसांना कलर लावतात, केमिकल प्रॉडक्ट वापरतो यामुळेसुद्धा केसांमध्ये कोंडा निर्माण होण्याची शक्यता असते. यातील चौथा प्रकार म्हणजे अनेकांना वेगवेगळ्या प्रकारचे त्वचाविकारही आता त्याच्यामध्ये ए”क्झि*मा, सोय”रा”सिस यामुळेसुद्धा केसांमध्ये कोंडा निर्माण होण्याची शक्यता जास्त असते.
आजच्या लेखामध्ये आपण जे उपाय जाणून घेणार आहोत तो आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला गेलेला आहे आणि हा उपाय करत असताना आपण जे पदार्थ वापरणारा होते अगदी उत्तम पद्धतीचे असल्याने त्याचा आपल्या शरीरावर कोणत्याही प्रकारचा विपरीत परिणाम सुद्धा होत नाही. हा उपाय करण्यासाठी आपल्याला सीताफळाचे पाने लागणार आहेत.
सुरुवातीला आपल्याला सीताफळाची पाने स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत तसे पाहायला गेले तर सिताफळाच्या पानामध्ये अँन्टिऑक्सिडंट गुणधर्म भरपूर प्रमाणामध्ये असतात आणि त्यामुळे आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यासाठी ही पाने आपल्याला मदत करतात. त्याचबरोबर या पानांमध्ये एंटीऑक्सीडेंट,अँटी फंगल हे गुणधर्म सुद्धा असतात आणि म्हणूनच या पानांचा आपल्या शरीरासाठी महत्त्वाचा उपयोग केला जातो.
आपल्या केसातील उवा लिखा काढण्यासाठी तसेच डोक्यातील कोंडा दूर करण्यासाठी या पानांचा उपयोग केला जातो. ही पाने वापरल्याने आपल्या केसांचे आरोग्य चांगले राहते. जर तुमचे केस पातळ असतील वारंवार मिळत असतील तर अशा वेळी सीताफळाची पानं तुमच्या केसांना मजबूत व घनदाट बनवण्यासाठी मदत करतात. हा उपाय करण्यासाठी आपल्याला सीताफळाची पानांची पेस्ट बनवायची आहे त्यानंतर आपल्याला पेरूची पाने लागणार आहेत. पेरूची पाने आपल्याला आजूबाजूला सहज उपलब्ध होतात आणि या पानांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटामिन सी उपलब्ध असते.
वरील दोन्ही पानांची आपल्याला खलबत्त्या च्या साह्याने बारीक पेस्ट बनवायची आहे जेणेकरून आपल्याला रस मिळू शकेल. हा उपाय करण्यासाठी आपल्याला या दोन्ही पानांचा रस लागणार आहे. आताही पेस्ट सुती कापडाच्या सहाय्याने चांगल्या पद्धतीने गाळून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला रस मिळू शकेल. आता आपण जो रस काढलेला आहे त्या रसामध्ये आपल्याला अर्धा लिंबू पिळायचे आहे.
लिंबू मध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटामिन सी असते आणि यामुळे आपल्या केसांचे आरोग्य चांगले राहते तसेच लिंबू मध्ये अनेक औषधी गुणधर्म असल्याने आपल्या केसांमध्ये कोंडा निर्माण झालेला असेल जो कोंडा निर्माण झालेला आहे तो कोंडा दूर करण्यासाठी लिंबू अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. आता हे मिश्रण एकजीव आपल्याला करायचे आहे आणि रोज सकाळी उठल्यावर आंघोळीच्या पुर्वी केसांच्या मुळाशी हे मिश्रण आपल्याला लावायचे आहे ,असे जर आपण काही दिवस सातत्याने केले तर तर तुमच्या डोक्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कोंडा असेल तर तो कोंडा लवकरच दूर होऊन जाईल आणि त्याच बरोबर तुमच्या केसांचे आरोग्य सुद्धा चांगले राहील.
हा उपाय आठवड्यातून तुम्ही एक वेळेस सुद्धा करू शकता पण जर तुमच्याकडे वेळ असेल तर अशावेळी तुम्ही जास्त वेळ जरी हा उपाय केला तरी तुम्हाला या उपायाने फायदाच होणार आहे. हा उपाय आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचा सांगितल्यामुळे या उपायाचा आपल्या शरीरावर कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम जाणवत नाही म्हणून हा उपाय अवश्य करा आणि आपल्या केसांचे आरोग्य चांगले ठेवा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.