या नंबरची नोट कधीच सोडू नका; हि नोट असल्यावर पैशाची कधीच कमी भासणार नाही.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो आज आपण तंत्र-मंत्र शास्त्रातील पैशाला आकर्षित करणारा एक अत्यंत प्रभावकारी उपाय पाहणार आहोत. हा उपाय चलना संबंधी आहे. भारतीय चलन दोन प्रकारचे आहे काही नोटा असतात काही नाणी असतात. हा उपाय नोटे संबंधी आहे. आपण लकी नोट आपल्यासाठी निवडायची आहे आता लकी नोट कशी निवडायची ? हे पहा तुमची जी जन्म तारीख आहे त्या जन्म तारखेला अनुरूप ही नोट असणार आहे. ज्यांना स्वतःची जन्म तारीख माहित नाही ते हा उपाय कसा करु शकतात ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
मित्रांनो ही नोट तुमच्यासाठी नशीबवान असेल ती एखाद्या चुंबकासारखी काम करेल आणि पैसा स्वत:कडे आकर्षित करेल. घरामध्ये गरिबी पैशांमध्ये तंगी आहे पैशांमध्ये जे उतार चढाव होतात मात्र ही लकी नोट तुमच्या घराची तुमच्या वास्तूची बरकत घडवून आणेल. मित्रांनो जर नोट आपण नीट पाहिली तर त्या मध्ये शेवटचे सहा अंक आहेत हे सहा अंक आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत.
उदाहरण द्यायचे झाले तर जन्म तारीख कर पंधरा असेल तर यामध्ये दोन अंक येतात एक आणि पाच. एक आणि पाचची बेरीज होते सहा तर तुम्ही अशी नोट शोधायची आहे ज्यामध्ये शेवटच्या सहा अंकाची बेरीज सहा यायला हवी. आता ज्यांना स्वत:ची जन्म तारीख माहित नाही त्यांच्या करीत सुद्धा एक मार्ग आहे तो म्हणजे अश्या व्यक्ती आपल्या ओळख पत्रावर अथवा आधार कार्ड शिवाय शाळेच्या दाखल्यावर जी तारीख नमूद आहे ती वापरु शकता ती जरी खोटी असली तरी ही तुम्ही वारंवार तीच वापर करत आला आहात ही तारीख तुमच्यासाठी लकी आहे हे लक्षात घ्या.
मित्रांनो अशी ही नोट शोधल्यानंतर दुसरी पायरी म्हणजे तुम्हाला एक सफेद रंगाचा कागद घ्यायचा आहे त्यावर कोणत्या ही रेषा नसाव्यात तो अगदी कोरा असावा आणि या कगदावर आपण एक मंत्र तयार करायचे आहे ‘ओम नमो नारायणाय नम:’ हा मंत्र आपण सफेद चंदनाच्या मदतीने कोर्या कागदावर काढायचा आहे आणि सुर्यप्रकशात सुकू द्यायचा आहे.
एकदा हा मंत्र सुकला की तुम्ही तुमची लकी नोट या कागदावर ठेवा आणि ह्या कागदाची नोटे सहित गुंडाळणी करा आणि एका लाल रंगाच्या धाग्याने ही गुंडाळणी नीट बांधून घ्या जेणे करुन ही उघडू नये. त्या नंतर मित्रांनो ज्या देवावर तुमची श्रद्धा आहे जे तुमचे कुल दैवत आहे त्याला मनापासून प्रार्थना करायची आहे. मनातल्या मनात बोलयचं आहे की ‘ हा जो नोटेचा उपाय आपण केलेला आहे त्यामुळे घरात भरभराट येवूदे यश प्राप्ती होवुदे.
मित्रांनो आता जे यंत्र आपण तयार केलेले आहे ते आपल्या पाकिटात अथवा तिजोरीत ठेवा. घरातील जी कमवती व्यक्ती आहे तिने हा उपाय अगदी आवर्जून करावा. तसेच हा उपाय करण्यासाठी जो सर्वोत्तम दिवस आहे तो म्हणजे शुक्रवारचा.
शुक्रवार माता लक्ष्मीचा वार आहे म्हणूनच शुक्रवारी आपण उपाय करायचा आहे. हा उपाय केल्यानंतर तीन महिन्यानी आपण ही गुंडाळणी उघडायची आहे आणि त्या नोटेतून काही तरी वस्तू खरेदी करा व एखाद्या गरजूला अथवा गोर-गरिबाला या वस्तूचे दान करा मित्रांनो हे करणे जर तुम्हाला शक्य नसेल तर कोणत्याही मंदिरात जा व दानपेटीमध्ये ही नोट दान करा.
मित्रांनो या नंतर परत अशीच एक लकी नोट शोधा व पुन्हा एकदा या नोटेवर हा उपाय करुन पहा जे यंत्र तुम्ही बनवून ठेवले आहे त्याचा वापर तुम्ही परत एकदा करु शकता अश्या या यंत्राच्या मदतीने तुम्ही तुमच्या आयुष्यात पैशाची भरभराट होतच राहिल तुमच्या आयुष्यातली पैशाची तंगी सदासाठीच नाहीशी होईल त्याच बरोबर मानसीक-आर्थिक दोन्हीकडे तुम्हाला शांती व सफलता लाभेल.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.