हातातून वेळ जाण्यापूर्वी हा उपाय एकदा नक्की करा; 100% झुरळे मरून खल्लास होतील.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. फक्त या स्प्रे च वापर करा आणि कितीही घरात झुरळ असतील तरीदेखील 100% झुरळ पासून घरच्या घरी लगेच सुटका करा. हा उपाय केल्याने पुढच्या पाच वर्षापर्यंत तुमच्या घरात एकही कॉकरोज म्हणजे झुरळ दिसणार नाही. झुरळांचा अंत करण्यासाठी हा उपाय खूपच गुणकारी आणि अत्यंत प्रभावी देखील आहे. हा उपाय इतका प्रभावी उपाय आहे की या पासून आम्हाला कुठलाही त्रास होत नाही.
झुरळ घरात झाले तर त्यासाठी वेगवेगळ्या औषधांचा वापर करतो परंतु त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रासायनिक पदस्थ किंवा वि’ष असते आणि त्यावर असे स्पष्टपणे लिहिलेले असते.बाजारातून आपण औषधे आणत असतो त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वि’ष व रासायनिक पदार्थांचा समावेश केलेला असतो आणि अशा औषधांवर स्पष्टपणे लिहिले सुद्धा असते की लहान मुलांपासून लांब ठेवा कारण की यामध्ये वि’षारी घटकांचा समावेश असतो.
हे वि’ष आहे हे हानिकारक असते. रासायनिक पदार्थांचा भरपूर प्रमाणामध्ये वापर केल्याने आपल्या घरातील सदस्यांना त्याचा विपरीत परिणाम सुद्धा होतो आणि त्याचबरोबर तुमच्या घरा मध्ये लहान मुले असतील तर त्यांच्या स्मृती वर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता असते म्हणूनच आज आपण उपाय जाणून घेणार आहोत तो अत्यंत सोपा साधा व घरगुती आहे. हा उपाय केल्याने तुम्हाला कोणत्याच प्रकारचा दुष्परिणाम होणार नाही ,चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..
हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक चमचा गव्हाचे पीठ लागणार आहे आणि गव्हाचे पीठ आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध असते. दुसरा पदार्थ आपल्याला लागणार आहे तो म्हणजे एक चमचा बोरिक पावडर. ही बोरिक पावडर आपल्याला मेडिकल स्टोअरमध्ये सहज उपलब्ध होऊन जाते. दोन्ही पदार्थ आपल्याला समप्रमाणामध्ये एक चमचा घ्यायचा आहे.
बोरिक पावडर मुळे झुरळांना त्रास होतो आणि त्याच्या गंधमुळे झुरळ आपल्या घरामध्ये जास्त काळ वास्तव्य करत नाही त्यानंतर आपल्या तिसरा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे खडी साखर. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक चमचा खडी साखर घ्यायची आहे नंतर थोडेसे पाणी टाकून तिन्ही पदार्थ एकत्र करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्याचे बारीक बारीक गोळे करायचे आहे. या गोळ्यांमध्ये आपण खडी साखर टाकल्यामुळे झुरळ याकडे आकर्षित होतात एक गोळी खाण्यासाठी पुढे येतात.
जेव्हा ही गोळी खातात तेव्हा बोरिक पावडर त्यांच्या पोटामध्ये जाते आणि तेव्हाच त्यांचा मृत्यू होतो. या गोळ्या ना जर लहान मुलांनी स्पर्श केला तरी त्याचा दुष्परिणाम त्यांच्यावर होत नाही कारण की आपण यामध्ये कोणत्याही प्रकारचे वि’ष मिसळले नाही आणि त्यानंतर आपल्याला या गोळ्या वेगवेगळ्या ठिकाणी घरांमध्ये ठेवायचे आहेत. ज्या ज्या ठिकाणी झुरळे जास्त प्रमाणात येतात अशा ठिकाणी आपल्याला या गोळ्या ठेवायच्या आहेत.
तसे तर तुमच्या घरा मध्ये झुरळांची अंडी असतील तर अशा वेळी एका बॉटलमध्ये बोरिक पावडर टाकून त्यामुळे थोडेसे पाणी मिक्स करून आपल्याला स्प्रे करायचा आहे आणि ज्या ठिकाणी झुरळाची अंडी भरपूर प्रमाणामध्ये अर्थात अशा ठिकाणी हा स्प्रे आपल्याला मारायचा आहे यामुळे झुरळाची अंडी पुन्हा त्या ठिकाणी येणार नाही अशा प्रकारे आपण आपल्या घरातील झुरळ बाहेर काढण्यासाठी हा उपाय करू शकतो.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.