3 झाडू आणि एक उपाय, महालक्ष्मीची होईल प्रचंड कृपा; आयुष्यभर पैशाची चिंताच भासणार नाही.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. झाडू एक सामान्य वस्तू आहे परंतु वास्तुशास्त्रामध्ये या वस्तूचा संबंध माता महालक्ष्मीची असल्याचा सांगण्यात आलेला आहे.झाडू आपल्या घरातील कचरा रूपाने असलेले दरिद्रता दूर करते आणि साफसफाई मुळे महालक्ष्मीची कृपा आपल्यावर करते. ज्या घरामध्ये साफसफाई स्वच्छता असते त्या घरामध्ये माता महालक्ष्मी चा सहवास असतो.
माता महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घराजवळील एका मंदिरा मध्ये तीन झाडू ठेवून या. प्राचीन काळापासून सुरू असलेली प्रथा आहे. प्राचीन काळी लोक मंदिरांमध्ये झाडू दान करत असेल. सकाळी ब्रह्म मुहूर्तावर मंदिरामध्ये झाडू ठेवावे. हे काम एखाद्या विशेष दिवशी करण्यात यावे.
हा विशेष दिवस म्हणजे एखादा सण असेल, ज्योतिष शास्त्र मधील एखादा महत्त्वाचा मुहूर्त असेल किंवा शुक्रवार या दिवशी आपल्याला मंदिरामध्ये घालून ठेवायचा आहे. हे काम कोणालाही न सांगता गुप्त स्वरूपामध्ये करायचे आहे. शास्त्रामध्ये गुप्तदानाचे विशेष महत्त्व सांगण्यात आलेले आहेत.
ज्या दिवशी आपल्याला हे कार्य करायचे आहे त्या एक दिवस अगोदर तीन झाडू बाजारातून विकत घेऊन या. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. जर घरातील घाण, धूळ ,जाळे योग्य पद्धतीने स्वच्छ केले नाही तर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. झाडू मुळे घरातील नकारात्मक दूर केली जाते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
नकारात्मक घरांमध्ये राहणारे लोकांचे विचारसुद्धा नकारात्मकच होऊन जातात. त्याचा वाईट प्रभाव घरातील आर्थिक स्थितीवर पडु शकतो. साफसफाई व स्वच्छता ठेवल्यास या समस्येला सामोरे जावे लागत नाही तसेच देवी-देवतांची कृपा सुद्धा प्राप्त होते. शास्त्रामध्ये झाडूला देवी महालक्ष्मीचे रूप मानण्यात आलेले आहे. त्यामुळे कोणत्याही पद्धतीने झाडूचा अनादर करू नये.
झाडू दरवाजामागे ठेवणे अधिक शुभ असते. झाडू कधीही उभा ठेवू नये. हा अपशकून मानला जातो. आज सुद्धा अनेक जण झाडू लात लागल्यास प्रणाम करतात कारण कि झाडूला माता महालक्ष्मीचे रूप मानले गेलेले आहे. जेव्हा तुम्ही नवीन घरामध्ये जाणार असाल तेव्हा नवीन झाडू घेऊनच घरामध्ये प्रवेश करावा.
हा शुभशकुन मानला जातो. यामुळे देवी-देवतांची कृपा प्राप्त होते नवीन घरामध्ये सुख शांती लागते एखादी लहान मुलगी /मुलगा घर झाडू लागले तर एखादा पाहुणा आपल्या घरात येणार आहे असे सुद्धा मानले जाते. लक्षात ठेवा सूर्यास्ताच्या वेळी घर झाडू नये. असे केल्याने घरामध्ये दरिद्रता येते.
सूर्यास्तापूर्वी घराची साफसफाई करून घ्यावी कारण सूर्यास्ताच्या वेळी माता महालक्ष्मी पृथ्वी भ्रमण करत असते. जेव्हा झाडूचे कार्य संपते तेव्हा तो कोणाच्याही दृष्टीस पडणार नाही अशा ठिकाणी ठेवा. झाडू इतरांच्या दृष्टीस पडल्यास घरामध्ये कलह निर्माण होतात असे सुद्धा म्हटले जाते.
झाडु ला लात लागणे म्हणजे अपमान करणे म्हणून जेव्हा कधीही झाडूला चुकून तुमची लात लागेल तेव्हा प्रणाम करुन माफी मागा कारण झाडूला माता महालक्ष्मीचे रूप मानले गेले आहे म्हणूनच या लेखांमध्ये सांगितलेल्या तीन झाडून चा उपाय तुम्ही केल्यास तुमच्या घरामध्ये सुख शांती वैभव व बरकत नेहमी लाभेल.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.