काळे कपडे घालत असाल तर नक्की पहा; तुमच्यासोबत पण घडू शकते असे काही.!

काळे कपडे घालत असाल तर नक्की पहा; तुमच्यासोबत पण घडू शकते असे काही.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. व्यक्तीची ओळख त्यांच्या राहणीमान वरून होत असते. कोणते आणि कसे कपडे परिधान करावे ज्याच्या त्याच्या वैयक्तीक प्रश्न असतो. परिस्थिती नुसार प्रत्येक जण कपडे परिधान करत असतो. प्रत्येक व्यक्तीची ओळख ही त्याच्या स्वभावावरून राहणीमान व ती व्यक्ती कशा पद्धतीचे कपडे परिधान करते यावरून सुद्धा ओळखले जाते. कपडे घालण्याची पद्धत वेगवेगळी असते आणि कोणाला वेगवेगळे रंग आवड असते.

भारतामध्ये विविध धर्म जाती पंथ लोक राहत असतात आणि प्रत्येकाचे कपडे परिधान करण्याची पद्धत वेगळी आहेत. प्रत्येक जण आपल्या आवडीनुसार व परिस्थितीनुसार आणि माणूस कपडे परिधान करत असतो. प्रत्येक रंगाचे कपडे प्रत्येकासाठी शुभ परिणाम देत नाहीत.अनेकदा कपड्या सोबत व्यक्तीचे भाग्य सुद्धा जोडले गेलेले असते.

अनेकदा आपल्या जीवनामध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी घडत असतात त्या कपड्यांमुळे सुद्धा घडण्याची शक्यता असते. चला तर जाणून घेऊयात ज्योतिष शास्त्रानुसार कोणत्या कपड्यांचा आपल्यावर कसा प्रभाव पडतो त्याबद्दल..

सर्वात पहिली गोष्ट म्हणजे कधीही फाटलेले कपडे घालू नये.काही व्यक्तींना आपले जुने फाटलेले कपडे आवडतात म्हणून ते कपडे टाकून सुद्धा देत नाही आणि म्हणून अशा वेळी जर आपण फाटलेले कपडे घालत असू तर त्या सगळ्या गोष्टींचा आपल्या आरोग्यावर सुद्धा परिणाम होतो. फाटलेले कपडे घातल्याने आपण आजारी पडतो. आणि आपले आरोग्य ढासळते म्हणून कधीही फाटलेले कपडे घालू नये त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कधीही आंघोळ केल्यावर नवीन कपडे घालू नये.

अशी व्यक्ती जो करतो प्रामुख्याने एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो आणि स्मशानभूमीमध्ये त्या व्यक्तीला अग्निडाग दिला जातो तेव्हा जी व्यक्ती हे सर्व कार्य करत असते तेव्हा ती व्यक्ती सर्व कपडे त्याग करत असते आणि आंघोळीनंतर नवीन कपडे घालते तसेच अनेकदा जेव्हा मृत व्यक्ती अंतिम प्रवासाला स्मशानामध्ये जात असते तेव्हा सुद्धा त्या व्यक्तीच्या अंगावर नवीन कपडे चढवले जातात.

म्हणून जर तुम्ही नवीन कपडे आणले असतील तर आधी ट्राय करून पहा आणि मगच घाला परंतु आंघोळ केल्या केल्या लगेच नवीन कपडे अजिबात घालू नका त्यानंतरची तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कधीही काळे रंगाचे कपडे वापरू नका. काळा रंग हा नकारात्मक ऊर्जेचा प्रतीक मानला गेलेला आहे. शनिवारचा दिवस सोडून अन्य कोणत्याही दिवशी काळे रंग असणारे कपडे अजिबात घालू नका.

जर तुम्हाला शनि दोष असेल तर अशा वेळी त्या दिवशीसुद्धा काळया रंगाचे कपडे घालू शकता. जर तुम्हाला शनी दोष नसेल तर अशावेळी शनिवारच्या दिवशी सुद्धा काळया रंगाचे कपडे अजिबात घालू नका त्यानंतरची महत्त्वाची गोष्ट म्हणजे कधीच दुसऱ्यांचे कपडे वापरू नका, असे केल्याने सुद्धा आपल्या जीवनामध्ये नकारात्मक ऊर्जा येते जेव्हा आपण दुसऱ्यांच्या वापरलेले कपडे वापरतो तेव्हा जर एखाद्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा आजार असेल किंवा त्वचेचे विकार असेल तर अशा वेळी कपड्यांच्या मार्फत तो विकार तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो.

जर एखाद्या व्यक्तीचे कपडे कितीही महाग असेल, स्वच्छ असतील व दिसायला चांगले असतील तरी त्या व्यक्तीचे कपडे अजिबात परिधान करू नका कारण की प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव व भाग्य हे वेगवेगळे असते आणि अशावेळी आपण दुसऱ्याचे कपडे घातल्याने त्या व्यक्तीचे भाग्य सुद्धा आपल्या भाग्याशी निगडित होते आणि जर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अनेक अडचणी येत असेल तर त्या अडचणी आपल्या जीवनामध्ये सुद्धा येऊ लागतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जळालेले कपडे अजिबात वापरू नये.

आपल्यापैकी अनेक जण कपड्यांची इस्त्री करत असतात किंवा किचन जवळ उभे असल्याने सुद्धा एखादी ठिणगी उडाल्यामुळे आपले कपडे जळतात परंतु एखादा शर्ट, एखाद्या ड्रेस आपल्या आवडीचा असला तरी जळालेले कपडे अजिबात घालू नये असे प्रकारचे कपडे घातल्याने आपल्या जीवनामध्ये नकारात्मक उर्जा प्रवेश करू लागते आणि आपले सुख सुद्धा त्या कपड्या प्रमाणे जळू लागते आणि म्हणून अशा प्रकारचे कपडे अजिबात परिधान करू नका.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *