केस असलेले जेवण करावे कि नाही.? जेवणात केस मिळाल्यावर नेमके काय घडते.?

केस असलेले जेवण करावे कि नाही.? जेवणात केस मिळाल्यावर नेमके काय घडते.?

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्यापैकी अनेक जण खूप मेहनत करत असतात, काबाडकष्ट करत असतात आणि हे सगळे कष्ट दोन वेळेच्या जेवणासाठी करत असतात. आपल्यापैकी अनेक जण आपल्या सर्वांना चांगल्या सुविधा प्राप्त व्हायला हव्यात व पोट भरून दोन वेळचे जेवण मिळायला पाहिजे यासाठी खूप मेहनत करत असतो. अनेकदा आपण जेवण करत असताना आपल्या ताटामध्ये केस दिसतो अशावेळी आपण ताटातला केस काढून पुन्हा जेवण करू लागतो.

आपल्या घरामध्ये अनेकदा एखाद्या व्यक्तीने केस विंचरले असतील तर त्यातील एखादा केस जमिनीवर पडून आपल्या ताटामध्ये कधीतरी येतो परंतु जर असे वारंवार घडू लागले तर त्यामागे काहीतरी कारण नक्की असते. तुम्ही अनेकदा पाहिले असेल की आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीच्या ताटामध्ये आपल्याला केस पडलेला पाहायला मिळतो.

अन्य कोणत्याही व्यक्तीच्या ताटामध्ये केस दिसत नाही यामागे सुद्धा काही संकेत असतात. जर एखाद्या व्यक्तीच्या जेवणामध्ये वारंवार केस सापडत असेल तर याचा अर्थ ती व्यक्ती भविष्यात आजारी पडणार आहे असे मानले जाते. त्या व्यक्तीला आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतील याची शक्यता सुद्धा असते तसे तर जेवण सुद्धा अशुभ होण्याची वेगवेगळी कारणे सुद्धा असतात.

जर आपण जेवण करायला बसलेलो आहे आणि जर एखाद्या व्यक्तीचा पाय आपल्या ताटाला लागले तर अशा प्रकारचे अन्न दारिद्र्य निर्माण करणारे मानले जाते आणि अशा प्रकारचे अन्न जर एखाद्या व्यक्तीने सेवन केले तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये दारिद्रता हमखास प्रवेश करते. जर आपल्याला एखाद्या व्यक्तीने ताटाला ओलांडून गेले तर अशा प्रकारचे अन्न सुद्धा सेवन करू नये अशा प्रकारचे अन्न अशुद्ध मानले जाते आणि जर आपण हे जेवण सेवन केले तर आपले मन सुद्धा अशुद्ध होते.

जर पती पत्नी एका ताटामध्ये जेवण करत असतील तर ते अन्न मद्यपान प्रमाणे मानले जाते म्हणून पती पत्नी यांनी कधीही एकत्र जेवण करू नये असे प्रकारचे अन्न सेवन केल्याने भविष्यात अनेक संकटांचा सामना करावा लागतो तसेच जोपर्यंत मुलगी अविवाहित आहे तोपर्यंत तिने आपल्या वडिलांच्या ताटामध्ये जेवायला हवे. असे केल्याने वडिलांचे अकाली मृत्यू होत नाही तसेच आपल्या वडिलांचे अकाली मृत्यू पासून संरक्षण देण्याचे कार्य मुलगी करत असते.

कधी इतरांच्या वाट्याचे अन्न आपण कधी खाऊ नये ,ज्याच्या त्याच्या वाटायचे अन्न प्रत्येकाला खायला द्यायला हवे. जर आपण इतरांच्या वाटेचे अन्न खाल्ले तर आपल्या घरामध्ये दारिद्रता निर्माण होते. जर आपण प्रत्येकाला त्याच्या वाट्याचे अन्य दिल्यास आपल्या जीवनामध्ये माता महालक्ष्मी प्रत्यक्षरीत्या वास्तव्य करते तसेच चूकून सुद्धा तुटलेल्या, फुटलेल्या भांड्यामध्ये जेवण करू नये असे करणे सुद्धा चुकीचे मानले गेले आहे.

अशा प्रकारच्या ताटामध्ये जेवल्याने आपल्या जीवनामध्ये अनेक संकटांचा सामना आपल्याला करावा लागतो त्याचबरोबर कधीही ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये जेवण करू नये अशा प्रकारच्या भांड्यामध्ये जेवण केल्याने आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागते. आपण ज्या ताटामध्ये जेवणार आहोत ते ताठ नेहमी स्वच्छ असायला हवे.

अस्वच्छ ताटामध्ये कधीच जेवू नये असे केल्याने आपल्या जीवनामध्ये दुखांचे आगमन होते. आपण आपल्या ताटामध्ये घेतलेले अन्न पूर्णपणे संपायला हवे. आपल्यापैकी अनेक जण ताटा मध्ये उष्ट अन्न सोडत असतो असे करणे चुकीचे आहे. अन्नाची नासाडी अजिबात करू नये,असे केल्याने माता अन्नपूर्णा आपल्यावर क्रोधित होते आणि अन्नपूर्णा माता त्या घरातून निघून जाते.

जेव्हा आपण जेवायला सोबत एकत्र बसतो तेव्हा आपले जेवण झाले असेल तरी आपण सगळ्यांसोबत उठायला हवे जर आपण मध्येच पंगतीवरून उठलो तर असे केल्याने आपले पितर आपल्यावर नाराज होतात. यामुळे पितृदोष होत असतो. तसे तर ताटामध्ये हात धुणे सुद्धा चुकीचे मानले गेले आहे. अनेकदा वास्तुशास्त्रामध्ये असे सांगितले गेले आहे की ताटामध्ये जेवण झाल्यावर अजिबात हात धुऊ नये. असे करणे म्हणजे नीच योनी कीटक सूक्ष्मजीव यांच्या योनी मध्ये प्रवेश करण्यासारखे आहे तसेच ताटामध्ये जेवण झाल्यावर थोडेसे पाणी अर्पण करायचे परंतु ताटामध्ये हात अजिबात घेऊ नये असे केल्याने अन्नाचा अपमान होत असतो.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *