सॅनिटाइजर वापरताय तर हि माहिती एकदा नक्की वाचा; नाहीतर होईल खूप मोठा पच्छाताप.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्याच्या या संकटाच्या काळामध्ये आपण दोन वस्तू आपल्या जवळ ठेवतो त्यापैकी एक आहे सॅनीटायझर आणि दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे फेस मास्क. सर्वांना हात जोडून आणि कळकळीची विनंती आहे की या दोन वस्तू तुमच्याजवळ अवश्य सोबत ठेवा पण हे सॅनीटायझर निवडताना थोड सावधानपूर्वक निवडा कारण आपण त्याचा वापर हा जास्त करतोय आणि फेस मास्क सुद्धा गरजेचा आहे त्यामुळे त्याचा फायदा तसेच आपल्याला नुकसान होऊ नये याची काळजी नक्की वापरतना घ्यायला हवे.
सॅनीटायझर चा वापर केल्यानंतर त्यापासून होणाऱ्या समस्या पासून आपण लांब राहू शकतो त्यामुळे सर्वांना विनंती आहे की तुम्ही सॅनीटायझर आणि मास्क वापरा पण बऱ्याच वेळा अती वापरा मुळे आपली त्वचा कोरडी होऊ शकते ,त्वचा दमट होऊ शकते आणि थोडा त्रास सुद्धा आपल्या त्वचेला होऊ शकतो.जर आपल्या हाताची त्वचा चांगली ठेवायची असेल तर यावेळी आपल्याला काही उपाय करणे गरजेचे आहे.
बहुतेक वेळा सॅनीटायझर वापरल्याने आपले हात कोरडे बनतात किंवा हातांना खाज येऊ लागते अशा वेळी हातांची काळजी घेणे सुद्धा तेवढेच गरजेचे आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक तेल वापरायचे आहे आणि हे तेल आपल्या स्वयंपाक घरामध्ये सहज उपलब्ध होऊन जाते. या तेलाच्या वापरामुळे आपल्या हाताची त्वचा अगदी नरम व कोमल होते. हा उपाय करण्यासाठी आपल्याला मोहरी किंवा तिळाचे तेल वापरायचे आहे.
तिळाचे तेल बाजारामध्ये सहज उपलब्ध होऊन जाते आणि आपण अनेकदा स्वयंपाक बनवण्यासाठी सुद्धा तिळाचे तेल वापरत असतो. हे तेल आपल्याला थोडेसे हातावर घ्यायचे आहे आणि हलकासा मसाज करायचा आहे त्यानंतर आपल्याला दुसरा उपाय करायचा आहे. हा उपाय करताना आपल्याला काही घटक पदार्थ वापरायचे आहेत ते म्हणजे मोहरीचे तेल लागणार आहे.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन चमचे मोहरी तेल घ्यायचे आहे त्यानंतर मीठ टाकायचे आहे त्यानंतर पुन्हा मोहरीचे तेल टाकायचे आहे त्यामुळे मोहरीच्या तेलामध्ये मीठ व्यवस्थित मिक्स होऊन जाईल आणि त्यानंतर आपल्याला बेसन पीठ यामध्ये टाकायचे आहे आणि हे सगळे मिश्रण व्यवस्थित एकजीव करायचे आहे.
हा उपाय आपल्याला आठवड्यातून फक्त एक दिवस करायचा आहे. हे मिश्रण आपल्याला हाताच्या तळव्यावर ठेवून आपले दोन्ही हात एकमेकांना चिकटवायचे आहेत आणि आपण ज्या पद्धतीने अंगाला उटणे लावतो त्या पद्धतीने हात एकमेकांना घासून व्यवस्थित रगडायचे आहे, अशा प्रकारे हा उपाय तयार झालेला आहे. हा उपाय केल्याने तुमच्या हाता वरील जे काही त्वचा काळी झालेली जागा आहे, ती जागा पूर्णपणे व्यवस्थित होणार आहे आणि हाताची त्वचा सुद्धा नरम व कोमल होण्यास मदत होईल म्हणून हा उपाय अवश्य करा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.