संक्रमणापासून मुलांना वाचवायचे असेल तर या 3 पदार्थांपैकी किमान 1 पदार्थ नक्कीच खायला द्या.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्याच्या संक्रमणाच्या काळामध्ये प्रत्येक जण आजाराने व्यतीत झालेला आहे, चिंतित झालेला आहे. प्रत्येक जण आपल्या शरीराची काळजी घेत आहे त्याचबरोबर सध्याच्या दिवसांमध्ये टीव्हीवरील बातम्यांमध्ये आपल्याला वेगवेगळ्या घटना घडलेल्या पाहायला मिळत आहे त्याचबरोबर काही तज्ञ असे सुद्धा म्हणत आहे की तिसरी लाट येणार आहे.
ही तिसरी लाट लहान मुलांना त्रासदायक ठरणार आहे म्हणून अनेक पालक चिंता व्यक्त करत आहे पण आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत जेणेकरून संक्रमणाच्या काळामध्ये लहान मुलांना कोणकोणते पदार्थ द्यायचे आहेत त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढून त्यांचे शरीर व आरोग्य कसे चांगले राहील याबद्दल सविस्तर चर्चा आज आपण या लेखांमध्ये करणार आहोत,चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..
सध्याच्या काळामध्ये सर्दी, खोकला,ताप या समस्या अनेकांना होत आहेत, त्या समस्या मुलांना सुद्धा त्रास देत आहे म्हणून अशा परिस्थितीमध्ये मुलांना जास्त प्रमाणात फळ खायला देऊ नका. त्याचबरोबर सर्दी झाली असेल तर अशावेळी केळी खाण्यास अजिबात देऊ नका कारण की बहुतेक मुलांना केळी खाल्ल्यामुळे सर्दी होते व छातीमध्ये कफ सुद्धा होत असतो आणि यामुळेच त्यांना श्वास घेण्यासाठी सुद्धा समस्या निर्माण होऊ शकते.
त्याच बरोबर मुलांना बिस्किटे ही जास्त प्रमाणात खायला देऊ नका कारण की बिस्किटे हे मैद्यापासून बनलेली असतात आणि मैदा हा पचायला जड असतो यामुळे लहान मुलांना पचनासंबंधित अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आयुर्वेदिक शास्त्रामध्ये एक महत्त्वाचे चूर्ण सांगण्यात आलेले आहेत, त्या चुर्णचे नाव आहे वावडिंग चूर्ण.
अनेक लहान मुलांना दात येताना त्रास होत असतो, जुलाब होत असतात अशावेळी जर आपण मुलांना वावडिंग चूर्ण दिले तर त्यांचे दात व्यवस्थित येतात व त्यांना कोणत्याच प्रकारचा त्रास सुद्धा होत नाही. वावडिंग चूर्ण हे लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती तर वाढवतेच पण त्याचबरोबर जर लहान मुलांच्या पोटामध्ये कृमी झाले असेल तर ते कृमी नष्ट करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असतात.
लहान मुलांना शरीरामध्ये सर्व पोषक तत्व मिळण्यासाठी त्यांना आवर्जून भुईमुगाच्या शेंगा म्हणजेच गावठी शेंगदाणे अवश्य द्या कारण की गावठी शेंगदाणे मध्ये अनेक पोषक तत्व उपलब्ध असतात ,जी आपल्या शरीराच्या बांधणीसाठी अत्यंत चांगले असतात. लहान मुलांना जास्त टीव्ही पाहायला देऊ नका, मोबाईल वर गेम खेळू देऊ नका कारण की सध्याच्या परिस्थितीमध्ये लहान मुलांचा योग्य तो व्यायाम होणे अत्यंत गरजेचे आहे त्यांना मैदानी खेळ खेळू द्या. घरामध्ये बाळगू द्या.या सगळ्या गोष्टींमुळे त्यांचा शारीरिक व्यायाम सुद्धा होणार आहे आणि त्यांचा आरोग्य सुद्धा जपले जाणार आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.