घराचा मुख्य दरवाजा जर या रंगाचा असेल तर आयुष्यभर कर्जातच राहाल.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या घराचे मुख्य द्वार हे आपल्या घराचे आत्मा म्हणून ओळखले जाते. या प्रवेशद्वारा मधूनच आपल्या घरामध्ये सकारात्मक व नकारात्मक उर्जा प्रवेश करत असते. घराचे प्रवेशद्वार कसे यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. आजच्या लेखामध्ये आपण आपल्या घराचा मुख्य प्रवेशद्वार कसा असावा त्याबद्दलची महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत.
आपल्या घरातील सदस्यांमध्ये वारंवार चिडचिड भांडण होत असेल तर असे समजावे की आपल्या घरामध्ये वास्तुदोष आहे. कदाचित आपले प्रमुख द्वार सुद्धा यामुळे दोष निर्माण होऊ शकतो जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करते तेव्हा त्या व्यक्तीसोबत एखादी ऊर्जा सुद्धा आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते तर नकारात्मक असेल तर आपल्या घरातील वातावरण नकारात्मक राहते आणि सकारात्मक असेल तर आपल्या घरातील वातावरण सकारात्मक असते.
आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर रंग काळा अजिबात नसावा. जर आपल्या घराचे दार काळया रंगाचे असतील तर यामुळे वारंवार धन हानी होते. घरामध्ये कितीही पैसा आला तरी तो जास्त काळ टिकत नाही. पैसा या ना त्या कारणाने घराबाहेर जात राहतो आणि अनेकदा या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला आर्थिक समस्येला सुद्धा सामोरे जावे लागते आणि म्हणूनच आपल्या घराचा मुख्य प्रवेश द्वार काळया रंगाचा नसावा.
जर तुमच्या सुद्धा घराचे दार काळया रंगाचे असेल तर आजच रंग बदली करा. बहुतेक वेळा आपण अपार्टमेंट मध्ये राहतो तेव्हा सेफ्टी दरवाजा हा काळा रंगाचा असतो अशावेळी आपल्या दरवाजा दिशेनुसार असणे सुद्धा गरजेचे आहे आणि ज्या दिशेला तुमचा दरवाजा आहे त्या दिशा नुसार रंग असणे सुद्धा उत्तम ठरते. जर तुमचा प्रवेश द्वार उत्तर दिशेला असेल ,तर दरवाजाला निळा किंवा आकाशी रंग देऊ शकतात.
तुमच्या घराचे मुख्य प्रवेशद्वार पूर्व दिशेला असेल तर तुम्ही पिवळ्या आणि केशरी रंग देऊ शकता. जर आपल्या घराचे मुख्य प्रवेशद्वार दक्षिण दिशेला असेल तर अशा वेळी आपण दरवाजाला जांभळा रंग देऊ शकतो. तुमच्या घराचे मुख्य प्रवेशद्वार दक्षिण-पश्चिम दिशेला असेल तर अशावेळी तुम्ही दरवाजाला पांढरा किंवा पिवळा रंग देऊ शकता. या विविध रंगांमुळे आणि दिशा मुळे तुम्हाला नक्कीच भविष्यात फायदा होऊ शकतो त्याच बरोबर एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्या की, तुमच्या घराचा मुख्य प्रवेशद्वार हा नेहमी उंच असावा तसेच घरामध्ये ज्या काही खोली आहेत त्या खोलीपेक्षा आपल्या घराचा मुख्य प्रवेशद्वार हा नेहमी उंच असायला हवा.
आपल्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ कोणतीही अडचण असायला नाही पाहिजे त्याचबरोबर आपला मुख्य प्रवेशद्वार हा नेहमी स्वच्छ असायला हवा कारण की जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करते तेव्हा दरवाजामध्ये कोणतीही अडचण नसायला हवी.
जर आपल्या घरामध्ये नकारात्मक उर्जा प्रवेश करू नये असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमच्या धर्माप्रमाणे व पद्धतीनुसार एखादे शुभमंगल चिन्ह दरवाजाच्या ठिकाणी लावू शकता तसेच मुख्य प्रवेशद्वाराजवळ नेहमी एक दिवा संध्याकाळच्या वेळी लावायला हवा कारण की संध्याकाळच्या वेळेला माता महालक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते.
तसेच मुख्य प्रवेशद्वाराच्या आजूबाजूला दोन्ही बाजूस आपण स्वास्तिक किंवा रांगोळी अवश्य काढायला हवी यामुळे आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मक उर्जा प्रवेश करत असते आणि जर आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असेल तर ती निघून जाते तसेच आपल्या घरातील महिलेने सकाळी उठल्यावर आपल्या घराचे मुख्य प्रवेशद्वार हळद-कुंकू वाहायला हवे यामुळे आपल्या घरातील वातावरण मंगलदायक व शुभ असते.
तसेच सकाळी उठल्यानंतर दरवाजासमोर थोडेसे पाणी शिंपडून लादी पुसायला हवी कारण की रात्रभर या प्रवेश द्वार मध्ये काही नकारात्मक ऊर्जा असते ते आपल्या दारात स्थित असते अशावेळी जर आपण पाणी टाकल्यास नकारात्मक निघून जाते. जर आपल्या घराचे मुख्य प्रवेशद्वार मधून आतिल बाजूस दरवाज्याचा आवाज येत असेल तर ते अशुभ मानले जाते.
हा आवाज आपल्याला बंद करायला हवा त्यासाठी दरवाजाची देखभाल सुद्धा करायला हवी जेणेकरून भविष्यात दरवाज्याचा आवाज येणार नाही. घराचे मुख्य प्रवेशद्वाराजवळ चपला अस्ताव्यस्त पडलेल्या नसाव्यात त्यासाठी वेगळी जागा आपल्याला शोधायला हवी.रॅक आणून त्या ठिकाणी चपला ठेवायला हव्यात तुमच्या सुद्धा प्रवेशद्वारासमोर चपला अस्ताव्यस्त पडलेल्या असतील तर त्या उचलायला पाहिजे अन्यथा या सर्वांचा परिणाम आपल्या घरातील सदस्यांवर होतो.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.