चुकीच्या दिशेला लावलेला आरसा आपल्याला बनवतो दुर्भाग्यशाली, ठेवा या गोष्टींचे लक्ष.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तुमच्या घरात लावलेल्या आरशा मुळे अनेक गोष्टी आपल्या जीवनात घडत असतात कारण जर आरसा आपल्या घरामध्ये योग्य दिशेला असल्यास त्यामुळे तुमची प्रगती होऊ शकते त्याबरोबरच आरसा चुकीच्या दिशेला असल्यास तुमची अधोगती ही होऊ शकते. सौभाग्य वैभव आणि आनंदाला आकर्षित करण्याची ताकद आरसा मध्ये असते परंतु जर तुम्ही ज्या ठिकाणी आरसा लावला असेल ती जागा वास्तुशास्त्रानुसार योग्य नसेल तर त्याचे वाईट परिणामही घरातील सदस्यांना होऊ शकतो.
जर आपल्या घरातील असा हा चुकीच्या पद्धतीने लावला असल्याने त्यामुळे आपल्या घरातील आणि सदस्यांना त्याची गंभीर परिणाम सुद्धा भोगावे लागू शकतील म्हणूनच या लेखामध्ये आपण आपल्या घरामध्ये अशा कोणत्या जागेवर आरसा लावायला हवा .आरसा लावण्याची दिशा नेमकी कोणती असेल याबद्दलची सविस्तर माहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
आरसा नेहमी नेहमी उत्तर व पूर्व दिशेला व ईशान्य कोपऱ्याला लावायला हवा. आरसा कधीच पश्चिम व दक्षिण दिशेला लावू नये. आरशामध्ये किरण परावर्तित करण्याचे गुणधर्म असतात म्हणून जर तुम्ही उत्तर व पूर्व या दिशांना आरसा लावला तर दक्षिण व पश्चिम या दिशांकडून येणारी उर्जा त्यातुन परावर्तीत होते आणि जर तुम्ही आरसा दक्षिण व पश्चिम उत्तर व पूर्वेकडून येणारी कोणती उर्जा त्यातुन परावर्तीत होईल त्यामुळे घरात निघून जाईल अश्या वेळी लक्ष ठेवणे खूप आवश्यक आहे उत्तर व पूर्वेला जर आरसा लावला तर यामुळे तुमच्या घरात धन ऐश्वर्य प्रतिष्ठा येईल, तुमची आर्थिक उन्नती होईल.
दक्षिण दिशेला आरसा लावला तुम्हाला गंभीर आजार यासारख्या कितीतरी समस्या तुमच्या पुढे आणू शकतो. दक्षिण दिशेला आरसा लावल्याने तुम्ही राहू केतू च्या प्रभावाखाली येऊ शकता तसेच पश्चिम दिशेला आरसा लावल्याने तुमच्या घरा मध्ये कटकटी निर्माण होत असतात. कोणताही कामामध्ये मन न लागणे, नेहमी अशक्तपणा वाटणे, मन उदास असणे या सारख्या अनेक समस्या तुम्हाला उद्भवत असतात.
या सगळ्या गोष्टींमुळे तुमच्या जीवनात सुद्धा वेगवेगळ्या समस्या सतावत असतात तसेच नोकरी संदर्भातील अडचणी सुद्धा निर्माण होतात या चुकीच्या दिशेला आरसा लावल्यामुळे नातेवाईकांमध्ये भांडण निर्माण होतात तसेच कामामध्ये अपयश निर्माण होतात. जर आपण नको त्या दिशेला आरसा लावल्यास घरातील सदस्यांना घरामध्ये थांबण्याची इच्छा होणार नाही. घरातील मुख्य सदस्यांचे घराबाहेर पडला तर तो घरात लवकर पुन्हा परत येणार नाही. नको असलेला अनावश्यक खर्च नेहमी करत राहील.
स्वतःला आपल्या घरातून बाहेर जास्तीत जास्त व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करत राहील आणि नको असलेला खर्च स्वतः चा जास्त प्रमाणात करत राहील. या सगळ्या गोष्टींमुळे अनावश्यक खर्च दर वाढणार आहे पण त्याचबरोबर एका मागोमाग एक संकटे येत राहतील आणि या सगळ्या गोष्टी कशामुळे घडत आहेत याची जाणीव तुम्हाला लवकर होणार नाही.
आरसा कधी अंधार असणाऱ्या खोलीमध्ये लावू नये, भुरकट असलेला आरसा आपले जीवन सुद्धा अंधारमय करुन टाकतो. म्हणून आरसा नेहमी स्वच्छ असायला हवा. आरसा फुटला तर आपले भाग्य फुटले असेसुद्धा म्हटले जाते. जर आपल्या घरातील आरसा फुटला असेल तर तो त्वरित बदलून नवीन लावायला हवा. रात्री झोपताना आरशामध्ये आपला बेड दिसत असेल तर यामुळे आपल्या घरातील मुख्य सदस्य नेहमी ताण तणावामध्ये राहील.
जर बेडवर पती पत्नी सोबत असतील तर या दोघांचेही वैवाहिक जीवन नेहमी ताणतणवाने ग्रस्त राहील व या दोघांमध्ये नेहमी भांडण होत राहतील. जेव्हा आपण बेडवर झोपतो तेव्हा आपल्या शरीरातून नकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते आणि अशावेळी जर आपल्या बेड समोर आरसा असेल तर ती ऊर्जा आरशातून पुन्हा आपल्याकडे परावर्तित होते आणि पुन्हा आपल्या शरीराकडे नकारात्मक ऊर्जा येते आणि यामुळे आपल्या शरीरांमध्ये ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्यामुळे नको तो परिणाम सुद्धा होतो.
त्यामुळे तुमच्या शरीरात लवकर निगेटिव्ह एनर्जी आकर्षित करेल व सकाळी उठल्यानंतर तुम्हाला थकवा जाणवेल आणि जर वर्ष सहा महिने तुम्ही आरशासमोरच रात्रभर झोपत असाल तर तुमच्या शरीराचा एखादा अवयव प्रभावित होऊन तुम्हाला खूप गंभीर रोगाला सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण होईल यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे अगदी आरसा समोर असेल तर रात्री पडदा टाकून द्यावा,जर आरसा समोर असेल तर त्यामुळे घरात प्रवेश करताच तो तिला परावर्तित करतो त्यामुळे घर नेहमी दुःख आणि कष्टाने भरलेले राहते.
जर आपल्या घरासमोर असा असेल तर अशावेळी आपल्या घराचा उंबरठा आपल्याला उंच करावा लागेल त्याचबरोबर दारासमोर अष्टकोणी आठ दिशेला परावर्तित होणारा आरसा आपल्याला लावायला हवा.
जेवणाच्या खोलीमध्ये आरसा लावणे हे शुभ मानले जाते.ड्राइंग रूम म्हणजेच बैठकीच्या खोलीत ही आरसा लावणे चांगले असते बैठकीच्या खोलीत शक्यतो अष्टकोणी आरसा लावण्याचा प्रयत्न करावा कारण आठ दिशांचे प्रतिक असल्याने त्याचा खूप चांगला फायदा आपल्याला होतो. जर चुकीच्या ठिकाणी आरसा लावला असेल तर त्याला तेथून काढून टाक ने सर्वात चांगला उपाय आहे ,यासारखे छोटे छोटे उपाय करून तुम्ही आरशाचे खूप फायदे मिळू शकतात तुम्हाला दुसरे काही करण्याची काहीच गरज नाही.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.