या बिया सफेद केस करतील पूर्णपणे काळे; पुन्हा कधीच केसांची समस्या होणारच नाही.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो आजकालच्या या धावत्या जगात आपण जास्त विचार करतो तो फक्त पैशाचा. माणूस हा दिवसरात्र पैसे कमवण्यासाठी अतोनात परिश्रम करतो. पण यामुळे त्याचे आपल्या शरिराकडे किंवा आपल्या आरोग्याकडे अजिबात लक्ष नसते. परिसरात वाढत्या प्रदूषणामुळे मानवाच्या शरिरावर व आरोग्यावर अनेक वाईट परिमाण होताना दिसत आहेत.
मात्र आपल्याकडे अश्या बरीक-सारीक गोष्टींकडे लक्ष देण्यासाठी वेळ सुद्धा नसतो जर काही मोठी समस्या उद्भवली तरच आपण गोळ्या-औषधांचे सेवन करतो किंवा डॉक्टरांकडे जातो व योग्य ती ट्री’ट’में’ट घेतो. प्रत्येक घरात आता एक सामान्य समस्या समोर येत आहे व ती गंभीर नसून देखील आपण तिच्याकडे लक्ष्य द्यायला हवे. होय आम्ही बोलत आहोत केस गळतीच्या समस्ये बद्दल बोलत आहोत. ही समस्या आता सगळी सामान्य झाली आहे.
मित्रांनो तुम्ही प्राचीन काळी अथवा आपल्या आजी-पणजी यांचे केस तुम्ही पाहिले असतील ते काळे भोर असायचे लांब सडक व तजेदार असायचे मात्र आज कालच्या वाढत्या प्रदूषणामुळे व दूषित पाण्यामुळे आपले केस खराब होत चालले आहेत. केस गळती, केस वया आधिच पिकणे इत्यादी अश्या अनेक समस्या आपल्याला आपल्या आजुबाजूला दिसून येतात. आम्ही तुमच्यासाठी असा एक घरगुती उपाय घेऊन आलो आहे जो केस गळती थांबवण्यासाठी अगदी रामबाण उपाय आहे आयुर्वेदात सुद्धा या उपाय बद्दल लिहून ठेवले आहे. हा उपाय नक्की काय आहे हे पाहण्यासाठी आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.
हा उपाय करण्यासाठी सर्व प्रथम तुम्हाला लागेल एक ग्लास पाणी व कलोंजीच्या बिया. कलोंजीच्या बिया या आपल्या केसांच्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक आणि फायदेशीर आहेत. सुर्यफुलाच्या बिया जश्या त्याच्या फुलांमध्ये असतात त्या प्रकारेच कलोंजीच्या बिया देखील फुलांच्या आत मध्ये असतात. या कलोंजीच्या बिया तुम्हाला कोणत्या ही आयुर्वेदीक उत्पादने मिळणार्या दुकानात अगदी सहज मिळतील.
या कलोंजीच्या बिया एक ग्लास पाण्यामध्ये एका लोखंडाच्या पात्रात चांगल्या उकडून घ्यायच्या आहेत. या कलोंजीच्या बियांमध्ये अनेक घटक उपलब्ध असतात. कॅरेटेन, कॅल्शियम व जीवनसत्व ब आणि क घटक मुबलक प्रमाणात या कलोंजीच्या बियांमध्ये उपलब्ध असतात म्हणूनच या बिया केसांसाठी खूप उपयुक्त ठरतात. त्या सोबतच पोटाचे विकार जर औषधे गोळ्या खाऊन देखील कमी होत नसतील तर कलोंजीच्या बियांच्या मदतीने तुम्ही ते चुटकीत सोडवू शकता.
या बिया नीट उकडून घेतल्या नंतर या कलोंजीच्या बिया मिक्सर मध्ये वाटून घ्या त्या मध्ये हळद घाला. हळद देखील आपल्या केसांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. नंतर ती कलोंजीची पावडर व हळद राईच्या तेलात टाका. राईचे तेल हे तुमच्या केसांना नैसर्गिक काळा रंग देते. तुमच्या केसांच्या मुळांना मजबूत बनवण्याचे काम राईचे तेल करते. हे मिश्रण तुमच्या केसांसाठी खूप उपयुक्त आहे. या मिश्रणाच्या वापराने तुमच्या केसातील कोंडा देखील कमी होईल व तुमचे केस सुद्धा काळेभोर व घनदाट बनतील.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.