जिम ला गेल्यानंतर खरंच आपली उंची वाढायची थांबते.? जिम करण्याचे योग्य वय काय असते.? हे आहे त्याचे खरे उत्तर.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्यापैकी अनेक जण शरीरयष्टी चांगली बनवण्यासाठी व पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करण्यासाठी म्हणजे व्यक्तिमत्व विकास करण्यासाठी सुद्धा अनेक जण जिमला जात असतात.आपल्यापैकी प्रत्येकाला असे वाटत असते की आपली बॉडी बिल्डर प्रमाणे असावी दिसायला आकर्षक असावी, जेणेकरून आपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये वाढ व्हावी म्हणून प्रत्येक जण जिम लावण्याचा प्रयत्न करत असतो परंतु अनेकदा जिम लावल्या वर काही परिणाम सुद्धा जाणवतात किंवा काही सकारात्मक दृष्टिकोन सुद्धा आपल्याला प्राप्त होत असतात परंतु जिमला जाण्यापूर्वी अनेक प्रश्न आपल्या मनाला सतावत असतात.
त्यातील काही प्रश्न म्हणजे जिम लावल्याने आपली उंची वाढायची थांबते का.? जिम नेमकं कोणत्या वयामध्ये करायला हवी? जिम केल्याने काही दुष्परिणाम होतात का? किंवा जिम केल्यानंतर जिम सोडल्यानंतर आपली बॉडी म्हणजे शरीर अजून बारीक होते का? असे विविध प्रश्न आपल्याला सतावत असतात. या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..
तसे तर जेव्हा आपल्या मनामध्ये अशा प्रश्नांची निर्मिती होत अस,ते तेव्हा या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आपण अनेकदा प्रयत्न करत असतो आणि तो आपल्याला या प्रश्नांची उत्तरं मध्ये काही सत्यता सतत जाणवते व काही असते ते सुद्धा जाणवते परंतु 100% अशा प्रकारचे उत्तर प्रश्नांची उत्तर देणे शक्य होत नाही. अनेकदा वैज्ञानिक प्रक्रियेनुसार जर आपण कमी वयामध्ये करण्यास गेलो होतो त्याचा विपरीत परिणाम सुद्धा आपल्या शरीरावर होऊ शकतो.
आपले शरीर व त्याच्या काही मर्यादा असतात, हे आपण जाणून घेणे गरजेचे आहे कारण की प्रत्येक वयामध्ये आपल्या शरीराचा विकास व त्याची वाढ होत असते आणि अशावेळी जर आपल्या शरीराची वाढ व विकास योग्य पद्धतीने झाली नाही तर त्याचा विपरीत परिणाम सुद्धा होऊ शकतो. शरीराची उंची ही अनेकदा हार्मोनल बदलांमुळे सुद्धा होत असते व अनुवंशिकतेमुळे सुद्धा होत असते तसेच शरीरातील हाडांची वाढ व तुमच्या मेंदूची सकारात्मकता यावर अवलंबून असते. या सगळ्या गोष्टी आपल्या आहारावर सुद्धा अवलंबून असतात.
अनेकदा जिम मध्ये व्यायाम केल्यानंतर आपल्या शरीरातील मसल म्हणजे ज्या पेशी असतात त्या ब्रेक होत असतात त्यांना पूर्ववत होण्यासाठी योग्य आहार आणि पुरेशी झोप आवश्यक असते. तसे पाहायला गेले तर व्यायामाचे वेगवेगळे प्रकार आहेत, त्यातील पहिला प्रकार म्हणजे कारडीओ. कारडिओ म्हणजे या प्रकारामध्ये जास्तीत जास्त धावणे किंवा खेळणे अशा प्रकारचा व्यायाम अपेक्षित असतो.
हा व्यायाम आपण केल्याने आपल्या शरीराची पूर्णपणे हालचाल होत असते आणि अशा प्रकारच्या व्यायाम करणारे आपल्या शरीराची वाढ सुद्धा होत असते आणि परिणामी उंची सुद्धा वाढते आणि अशा प्रकारचा वेळ व्यायाम आपण कोणत्याही वयामध्ये सहजरीत्या करू शकतो.
त्यानंतर दुसरा प्रकार आहे की पुल्स अप , पुश अप करणं हा अशा प्रकारचा व्यायाम आपण वयाच्या बाराव्या वर्षापासून करू शकतो परंतु हा व्यायाम करताना आपल्याला एका मार्गदर्शकाची गरज सुद्धा असते कारण की अशा वेळी चुका होतात आणि त्याचा परिणाम चुकीचा होऊ शकतो त्यानंतरचा वेटलिफ्टिंग केले जाणारे व्यायाम अशा प्रकारचा व्यवहार प्रामुख्याने जिममध्ये केला जातो.
या व्यायामामध्ये आपण वेगवेगळे प्रकारचे वजन उचलून आपले शरीर मजबूत बनवण्यासाठी प्रयत्न करत असतो. आपण साधारणतः व्यायाम करताना वयाच्या बाराव्या वर्षापासून सुद्धा करू शकतो परंतु या वयामध्ये आपल्या शरीरामध्ये अत्यंत वेगवेगळे बदल होत असतात. हार्मोनल बदल घडत असतात आणि म्हणूनच तर आपण लवकर व्यायाम केला तर जिम लावून व्यायाम केला तर त्याचा चुकीचा परिणाम सुद्धा होऊ शकतो.
सर्व साधारणपणे 20 वर्षापेक्षा लहान असणारे मुलं आणि 20 वर्षापेक्षा मोठे असणारे मुलं यांच्या शरीरातील अनेक अवयवांमध्ये खूप फरक असतो त्यांच्या शरीरातील हाडांची मजबुती म्हणावी तेवढी मजबूत नसते आणि अशा वेळी जर आपण मोठे मोठे वजन उचलून जर व्यायाम करायला लागलो तर यामुळे तुटण्याची शक्यता सुद्धा असते.
जेव्हा एखादा व्यक्ती तुमच्या वयातच असेल पण त्याचे मसल जास्त वाटत असेल तर अशावेळी आपल्याला त्याची तुलना करायची नाही कारण की अनेकदा वय जरी सारखे असले तरी शरीरामध्ये असणारा फरक हा महत्त्वाचा असतो. त्या व्यक्तीचे शरीरामधील हाडांची मजबुतीचे प्रमाण जास्त असेल, तुमच्या शरीरात हाडांची मजबुती प्रमाण कमी असेल तर अशा वेळी जास्त वजन उचलण्याचा हट्ट धरू नये व शरीराला झेपेल तेवढेच व्यायाम करणे अत्यंत गरजेचे आहे. नाहीतर अनेक दुष्परिणाम सुद्धा होऊ शकतात आणि त्याचबरोबर हाडांची ग्रोथ रेट सुद्धा थांबू शकते.
जेव्हा तुमचे वय 20 वर्षापेक्षा जास्त असते अशा वेळी तुम्हाला फक्त मसल वाढविण्याची आवश्यकता असते कारण की तुमच्या हाडांची वाढ झालेली असते परंतु जर तुमचं वय वीस वर्षांपेक्षा कमी असते अशा वेळी तुम्हाला तुमची मसल सुद्धा वाढवायची असते आणि हाडांची वाढ सुद्धा करायची असते आणि म्हणूनच योग्य ती काळजी आपल्याला घेणे गरजेचे आहे म्हणून तर तुम्ही स्वतः जिम लावू इच्छित असाल तर आधी तुमच्या शरीराची पूर्णपणे वाढ व विकास होऊ द्या आणि त्यानंतरच जिम अवश्य जॉईन करा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.