एका झट्क्यातच गुडघेदुखी आणि सूज होईल कमी, त्यासाठी करा कांद्याचा हा घरगुती उपाय.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो माणूस म्हटलं की त्याला काही ना काही त्रास हा आलाच आणि आज-कालच्या या धावपळीच्या जीवनात माणसाचे आपल्या आरोग्यावर लक्ष राहत नाही तो फक्त प्रगतीपथवर अग्रेसर असतो. मात्र दिवसेंदिवस वृद्ध तथा तरुणांमध्ये समांतर असा आजार म्हणजे गुढग्यांचे दुखणे.
आपण आपल्या आजुबाजूला अनेकांना या आजाराने ग्रस्त असलेले पाहतो पण मित्रांनो याला आपण आजार न म्हणता त्रास अथवा पीडा म्हटलं पाहिजे आणि पुढील लेखात आम्ही तुम्हाला हा त्रास का सुरु होतो तसेच यापासून आपण कसे मुक्त होवू शकता या बद्दल थोडी माहिती सांगणार आहोत.
मित्रांनो, सर्व प्रथम आपण जाणून घेवूया की सांधे दुखी आणि हाडांचा त्रास व गुढघ्यांचा त्रास शरीरात कसा निर्माण होतो. मानवी शरीरात जेव्हा calcium आणि फोस्फेटची कमतरता होते तसेच हाडांवर अतिदाब पडून त्यांची झिज झाल्यास अश्या प्रकारच्या त्रासाला आपल्याला समोरे जावे लागते.
पण मित्रांनो आत्ता घाबरण्याची काहीच गरज नाही आहे कारण आज आम्ही आपणास असा एक उपाय सांगणार आहोत जो केल्यावर तुमचा आजार किती ही जुना किंवा बळकट असुदे तो काहीच दिवसात समूळ-नष्ट होईल आणि तुम्ही सुद्धा एक सामन्य पीडा मुक्त आणि सुखी-समाधानी आयुष्य जगू शकाल. उपाय पुढिल प्रमाणे आहे,
कांदा आपल्या रोजच्या आहारातील एक घटक आहे आणि कांदा आपल्या आरोग्यासाठी तथा सौंदर्यासाठी अतिशय अनुकूल मानला जातो.
सौंदर्य म्हणालात तर केस गळती रोखण्यासाठी कांदा खूप फायदेशीर आहे कांद्याचा रस नियमित लावल्यास केस गळती त्वरित थांबेल आणि नवीन केस उगवण्यास सुरवात होईल. तसेच आरोग्यसाठी ही कांदा खूप फायदेशीर आहे. कांद्याचे सेवन केल्यास शरीराला ऊर्जा मिळते त्याच बरोबर रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सुद्धा कांदा फायदेशीर आहे.
सर्व प्रथम कांदा घ्या त्याला मिक्सर मध्ये घालून त्याची चांगली पेस्ट बनवून घ्या सोबतच हळद आणि मोहरीचे तेल घ्या. हळद आणि मोहरीचे तेल हा दुखणे कमी करण्यासाठी अतिशय गुणकारक आहे. कांदा, हळद आणि मोहरीचे तेल एका भांड्यात एकत्र करुन घ्या आणि मंद वाफेवर शिजवून घ्या. या तीनही घटकांचे मिश्रण उत्तम वेदनाशामक आहे.
दुखणे अगदी कमरेचे असो किंवा मणक्याचे अथवा गुढघ्यांचे त्वरीत नष्ट होईल. हे मिश्रण शिजल्यास तुम्हाला ते तुमच्या गुढघ्यावर कपड्याच्या मदतीने घट्ट बांधून घ्यायचे आहे दोन-तीन तासाच्या कालावधीने तुम्हाला फरक जाणवेल. अश्या प्रकारे घरच्या-घरी तुम्ही गंभीर होत चाललेल्या या गुढघे दुखीच्या त्रासाला संपवू शकता.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.