1 घोट घ्या ताप पटकन गायब; शरीरातील उष्णता होईल एका झट्क्यातच कमी.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हा उपाय लहान पासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वच जण करू शकतात. अनेकदा आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे आपल्याला सर्दी खोकला ताप येऊ लागतो. सध्याच्या काळामध्ये रोगप्रतिकारशक्ती चांगली ठेवणे अतिशय गरजेचे आहे की सध्या जो विषाणू आहे तो आपल्या शरीरावर खूप मोठ्या प्रमाणावर वार करत आहे ,हल्ला करत आहे आणि या हल्ल्यापासून आपल्या शरीराचे संरक्षण करायचे असेल तर आपल्याला आपली रोगप्रतिकारक शक्ती अतिशय मजबूत बनवायला हवी.
अनेकदा बदललेल्या वातावरणामुळे सुद्धा आपल्या शरीराचे तापमान बदलत असते जर आपल्या शरीराचे तापमान 37 अंश पेक्षा जास्त झाली तर आपल्या ताप येण्याची शक्यता असते आणि जर जास्त ताप आला तर त्याचे वेळेवरच निदान करणे अतिशय गरजेचे आहे अन्यथा त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात.
आपण आजारी पडल्यानंतर आपल्या शरीरामध्ये अशक्तपणा निर्माण होतो तोंडाची चव पूर्णपणे निघून जाते. अतिशय थकवा जाणवत असतो, मन बेचैन होत असतात अशावेळी हा उपाय केल्याने आपल्या शरीराला ऊर्जा मिळणार आहे आणि त्याच बरोबर शरीरामध्ये निर्माण झालेला थकवा सुद्धा दूर होणार आहे, असा हा साधा सोपा घरगुती उपाय आहे.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला खजूर वापरायचा आहे. खजुराला आयुर्वेदिक शास्त्रामध्ये खूप मोठे स्थान देण्यात आलेले आहे. खजुराच्या अंगी पित्तवर्धक, बलवर्धक, धातुवर्धक, उष्णता निर्माण करणारा असा उपयुक्त त्याचबरोबर विटामीन ए, विटामीन बी विटामीन सी यांनी भरपूर प्रमाणात उपयुक्त असलेला असा हा महत्त्वाचा एक घटक आहे.
खजूर यामध्ये लोहाचे प्रमाण अधिक असल्यामुळे आपल्या शरीराला भरपूर प्रमाणामध्ये हिमोग्लोबिन मिळत असते आणि त्यामुळे आपल्या शरीरातील रक्ताची पातळी सुद्धा भरून निघते त्याचबरोबर आपल्या भूक वाढीसाठी खजूर महत्त्वाची भूमिका बजावतात करण्यासाठी आपल्याला काही खजूर घ्यायचे आहेत.
त्यानंतर आपल्याला या खजूर मधील बिया बाजूला काढून त्यातील फक्त गर घ्यायचा आहे त्यानंतर एका वाटीमध्ये थोडे पाणी टाकून या खजुरचा जो मगज आहे तो आपल्याला अतिशय बारीक करायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला जिरे मिक्स करायचे आहे. जिरे हे आपल्या शरीरासाठी अतिशय उपयुक्त आहे त्यामुळे आपल्या शरीरातील पचनशक्ती प्रमाणामध्ये चांगले राहते आणि पोटातील गॅस सुद्धा दूर होतो.
आपल्याला ह्याची पावडर बनवायची आहे आणि त्यानंतर दुसरा पदार्थ आपल्या लागणार आहे तो म्हणजे खडी साखर. खडीसाखर यामध्ये शितलचा गुणधर्म असतात यामुळे आपल्या शरीरातील उष्णता कमी होते म्हणून आपल्याला हा उपाय करण्यासाठी खडीसाखर पावडर एक चमचा टाकायचे आहे.
त्यानंतर हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून दिवसभरातून दोन वेळा तरी आपण हे मिश्रण खाल्ले तर आपले शरीर पूर्णपणे सदृढ राहील त्याचबरोबर आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहील आणि जर तुम्हाला त्रास असेल तर तो कमी होऊन जाईल हे आपल्या शरीरातील पोषक घटकांच्या कमतरतेमुळे सुद्धा आपल्याला होत असते आणि खजूर यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटामिन असल्यामुळे हा उपाय आवश्यक आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.