यावेळी आरशात पाहिल्यास घडेल असे काही… जाणून घ्या काय आहेत संकेत..!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जर तुम्हालाही आरशासमोर तासंतास उभे राहून स्वतःचे रूप पाहत बसण्याची सवय असेल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. हि माहिती वाचल्यानंतर तुम्ही नक्कीच असे करणे सोडून द्याल. आपले वास्तुशास्त्र हे एक असे शास्त्र आहे जेथे आपण आपल्या प्रत्येक समस्यांचे समाधान शोधू शकतो. आपल्याला माहितीच आहे कि घराची सजावट करताना आरशाचा वापर फार पूर्वीपासून केला जातो. आणि आपल्या घराच्या आकर्षतेत वाढ केली जाते.
बेडरूम असेल किंवा लिविंग रूम आरसा लावला कि त्या जागेचे सौंदर्य वाढते. आरसा आपल्या जीवनातील एक खूप महत्वाची गोष्ट आहे. आपण आरशात बघून स्वतःचे रूप न्याहाळतो व शृंगार करतो. परंतु तुम्हाला हे माहिती आहे का कि चुकीच्या पद्धतीने आरसा बघितला तर नकारात्मक, दुर्घटना, वाईट घटना इत्यादींचे कारणही ठरू शकते. चला तर पाहुयात कि आरसा कशा पद्धतीने बघू नयेत.
वास्तुशास्त्रानुसार जास्त वेळ आरशात बघत बसू नये. यामुळे आपल्यामध्ये नकारात्मकता भरली जाते व हळूहळू स्वतःच आपण आपल्या नुकसानीचे कारण बनतो. रात्रीच्या वेळीही कोणी आसपास नसताना आरशात बघू नये. कारण आरसा आपले रूप तर दाखवतोच परंतु रात्रीच्या वेळी आरशात नाकारत्मकता प्रवेष करते व तीच ऊर्जा रात्रीच्या वेळी आरसा पाहिल्यास आपल्यामध्ये प्रवेश करते. यामुळे वाईट शक्तीचे जास्त वास्तव्य असल्याने आपल्याला त्या वाईट शक्ती प्रभावित करू शकतात. म्हणून रात्रीच्या वेळी कधीही आरसा पाहू नये.
वस्तू शास्त्र असे सांगते कि आरसा आपले रूप उठावदार करण्याबरोबरच आपले भाग्य दुर्भाग्यात बदलण्याचे काम करतो. आर्ष संबंधी एखादी चूक झाल्यास आरोग्य,धन व प्रगतीत अडथळे निर्माण होतात. आजकाल आरसे सगळीकडे लावणे फॅशन बनले आहे. आपल्या प्रत्येक रूममध्ये आरसा लावलेला असतो. परंतु बेडरूममध्ये आरसा कधीही लावू नये. आणि जर लावायचाच असेल तर अशा ठिकाणी लावावा कि सकाळी उठल्या उठल्या आपला चेहरा त्यात दिसू नये.म्हणजेच आपण झोपलेलो असताना आरशात दिसणे खूप अशुभ असते.
असे म्हणतात कि बिछान्याच्या समोर येणाऱ्या अशुभ शक्ती आपल्याला बघत असतात. आणि ते आपल्याला प्रभावितही करू शकतात. आणि तुमच्या आसपास वाईट शक्ती असण्याचा तुम्हाला आभासही होऊ शकतो. जे आपल्यासाठी खूपच घातक ठरू शकते. म्हणून वास्तुशास्त्रानुसार बेडरूममध्ये आरसा असेल तर त्याला रात्री पडदा बसवून तो झाकावा. यामुळे नकारात्मक ऊर्जेची भीती राहणार नाही.
फुटलेला व तडा गेलेला आरसाही घरात ठेऊ नये नाहीतर तुमच्या नुकसानीचे कारण तुम्ही स्वतःच होऊ शकता. फुटलेला आरसा घरात ठेवल्यास एखाद्या भयंकर दुर्घटनेचे तुम्ही शिकार होऊ शकता. म्हणून फुटलेला आरसा कितीही सुंदर व कितीही महाग असला तरीही तो लगेचच फेकून द्यावा. जर तुम्हाला तुमचे भाग्य चमकवायचे असेल तर सकाळी उठल्या उठल्या कधीही आरसा बघू नये. देवाचे नामस्मरण करीत आपल्या दिवसाची सुरुवात करावी. यामुळे आपल्याला सकारत्मक ऊर्जा मिळते.
आरसा लावताना कधीही उत्तर दिशा,पूर्व दिशा किंवा ईशान्य दिशेला लावणे खूप शुभ असते. यामुळे आपल्या घरात सकारत्मक ऊर्जेचा संचार होतो. वस्तू शास्त्रानुसार गोल किंवा अंडगोल अशा गोलाकारातील आरसा अशुभ मानला जातो. म्हणून चौकोनी किंवा आयताकृती आरशाचाच वापर करावा. घरातील दक्षिण व पश्चिम दिशेला कधीही आरसा लावू नये, यामुळे आपल्या जीवनात दुःख,त्रास व अडचणी येतात. आरशावर कधीही धूळ माती जमा होऊ देऊ नये. जर घराच्या दक्षिण-पश्चिम दिशेला टॉयलेट वा बाथरूम बनवलेले असेल तर एक चौकोनी आरसा तेथील पूर्व भिंतीवर लावल्यास सर्व प्रकारचे वास्तू दोष दूर होतात.
मित्रांनो तुम्हाला हि माहिती नक्कीच आवडली असेल. आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा जरूर शेअर करा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.