शनिवारी करा फक्त हे १ काम..प्रत्येक कामात यश मिळेल आणि यशस्वी व्हाल..!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो आपल्याला नेहमी वाटते कि आपले प्रत्येक कार्य चांगले व्हावे. प्रत्येक काम आपले विना अडचणीचे व्हावे परंतु तसे काही होत नाही. तर त्यासाठी आम्ही शनिवारी करायचे काही उपाय आज सांगणार आहोत. चला तर पाहुयात कि शनिवारी कोणते कार्य केल्यास आपण त्या कामात यशस्वी होतो.

प्रत्येक शनिवारी काळे तीळ,कणिक आणि साखर मिसळून हे मिश्रण मुंग्यांना खाऊ घालावे. यामुळे आपल्याला प्रत्येक कार्यात यश मिळते. शनी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळवायची असेल तर काळ्या घोड्याची नाळ किंवा नाळेचा खिळा घेऊन त्यापासून एक अंगठी तयार करावी आणि हि अंगठी शनिवारी सुर्यास्थाच्या वेळी आपल्या मधल्या बोटात धारण करावी. यामुळे आपल्याला सर्व समस्यांपासून मुक्ती मिळेल.

शनिदोषापासून मुक्ती मिळवायची असेल तर शनिदेवांच्या १० नावांचा जप करावा, त्यामुळे आपल्या कामात नक्कीच यश मिळते, शनिदेवांची नावे १०८ वेळा तरी जपावीत. हि नावे खालील प्रमाणे आहेत.

  1. शनैश्चर
  2. शान्त
  3. सर्वाभीष्टप्रदायिन्
  4. शरण्य
  5. वरेण्य
  6. सर्वेश
  7. सौम्य
  8. सुरवन्द्य
  9. सुरलोकविहारिण्
  10. सुखासनोपविष्ट

हि १० नावे आहेत, या १० नावांचा १०८ वेळा जप करावा.शनिवारी दान केल्याने पुण्याची प्राप्ती होते. म्हणून सामर्थ्यानुसार काळे तीळ, काळा कपडा, कांबळ, लोखंड, लोखंडी भांडे, उडीद डाळ इत्यादी वस्तूंचे दान करावे. यामुळे शनिदेव प्रसन्न होऊन आपल्याला शुभफले प्रदान करतात.

माकडांना गूळ व चणे खाऊ घातल्याने हनुमान प्रसन्न होतात. प्रत्येक शनिवारी हनुमान चालिसाचा पाठ करावा. हनुमानाचे पूजन केल्याने व्यक्तीला व्यक्तीला शनिदोषांचा सामना करावा लागत नाही. शनिदेवांची पूजा करून त्यांना निळ्या रंगाचे फुल अर्पित करावे. या सोबतच रुद्राक्षाची माळ घेऊन ” ॐ शं शनैश्चराय नम: ” या मंत्राचा किमान १०८ वेळा जप करावा. 

प्रत्येक शनिवारी असे केल्याने साडेसातीपासून मुक्ती मिळते. सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर एका वाटीत तेल घेऊन आपला चेहरा बघावा. या नंतर ते तेल गरजू व्यक्तींना दान करावे. यामुळे शनिदेव प्रसन्न होतात आणि आपल्या भाग्यासंबंधी अडचणी दूर होतात. 

सकाळी उठल्यानंतर पिंपळाला पाणी घालावे, ७ प्रदक्षिणा घालाव्यात. सूर्यास्तानंतर सुनसान जागी असलेल्या पिंपळाच्या झाडाजवळ दिवा लावावा. असे शक्य नसल्यास मंदिर जवळ असलेल्या पिंपळाच्या झाडाखाली देखील दिवा लावू शकता. तांब्याच्या लोट्यात पाणी घेऊन त्यात तीळ मिसळावे. नंतर हे पाणी शुवलिंगावर अर्पित करावे. असे केल्याने व्यक्तीला सर्व आजारांपासून मुक्ती मिळते आणि आर्थिक अडचणी देखील दूर होतात.

तर मित्रांनो हे आहेत काही साधे आणि सोप्पे उपाय जे आपल्याला शनिवारी करायचे आहेत. तुम्हाला हि माहिती नक्कीच आवडली असेल. आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा जरूर शेअर करा. 

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *