घराच्या मुख्य द्वारासमोर चुकून सुद्धा या वस्तू ठेवू नये अन्यथा दारिद्रता करेल घरात प्रवेश.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. वास्तूशास्त्र हे हिंदू धर्मशास्त्रानुसार अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहे. या वास्तुशास्त्रामध्ये आपल्या घरामध्ये काही वस्तू यांचा आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम होतो तर काही वस्तूंमुळे नकारात्मक परिणाम सुद्धा जाणवत असतो आणि या सर्वांबद्दल या वास्तुशास्त्रामध्ये अनेक वेळा सांगण्यात आलेले आहेत. या वास्तुशास्त्राचा उपयोग आतूनच आपण आपले जीवन आनंदमय करू शकतो आणि म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण वास्तुशास्त्रातील अशा काही महत्त्वाच्या गोष्टी सुद्धा जाणून घेणार आहोत.
तसे पाहायला गेले तर आपल्या घराचे मुख्य द्वार अत्यंत शुभ मानले जाते. या मुख्य द्वारातून प्रत्येक व्यक्ती घरामध्ये प्रवेश करत असते व घरातून बाहेर सुद्धा जात असते आणि अशा वेळी आपल्या जीवनावर सर्वात जास्त प्रभाव कोणत्या गोष्टीचा होत असेल तर ते आहे आपले मुख्य द्वार आणि म्हणूनच अशा वेळी आपल्या घराच्या मुख्य द्वारा बद्दल काही गोष्टी आपल्याला जाणून घेणे गरजेचे आहे.
जेव्हा आपण एखादे घर बांधतो तेव्हा त्या घराची निर्मिती वास्तुशास्त्रानुसार झाल्यास तर घरांमध्ये राहणाऱ्या सदस्यांना त्याचे चांगले फळ सुद्धा प्राप्त होते परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये व जागेचा अभाव असल्याने अनेकांना वास्तुशास्त्रानुसार घराची बांधणी करता येत नाही परंतु काही आपण छोटे-छोटे उपाय करून सुद्धा आपल्या घरातील वातावरण सकारात्मक येऊ शकतो व वास्तुशास्त्रामध्ये जे काही नियम सांगण्यात आले आहेत.
या नियमांचे पालन केले तर आपल्या जीवनातील नकारात्मक ऊर्जा सुद्धा आपण दूर करणार आहोत. जेव्हा आपण आपल्या घरातील प्रवेश द्वाराबद्दल चर्चा करतो तेव्हा आपले घरातील प्रवेशद्वार हे नेहमी स्वच्छ असायला हवे कारण की या प्रवेशद्वारातून आपल्या घरामध्ये सकारात्मक उर्जा प्रवेश करत असते व नकारात्मक ऊर्जा बाहेर जात असते आणि म्हणूनच घरासमोर काही वस्तू असणे याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या सुद्धा आपल्या जीवनावर परिणाम होत असतो. अनेकांच्या घरासमोर काटेरी झाड असते.निवडुंग, बोराचे झाड असते.
हे अत्यंत अशुभ मानले गेलेले आहे कारण आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर जर कोणतेही काटेरी झाड असेल तर यामुळे आपल्या घरावर नकारात्मक उर्जेचा प्रभाव पडतो आणि त्याचा विपरीत परिणाम आपल्या घरातील सदस्य होतो म्हणूनच हिंदू धर्मशास्त्रानुसार आपल्या घराच्या समोर, अंगणामध्ये तुळशीचे रोप असणे गरजेचे आहे. तुळशीमुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक उर्जा प्रवेश करते व त्याचबरोबर तुळशी ही पवित्र असल्याने आपल्याला तसे अनेक औषधी गुणधर्म सुद्धा प्राप्त होतात. आपल्या घरातील कचऱ्याचा डबा उत्तर दिशेला चुकूनसुद्धा ठेवू नये.
उत्तर दिशा ही कुबेराची दिशा व माता महालक्ष्मी यांची दिशा मानली जाते आणि जर अशा वेळी आपण या दिशेला कचऱ्याचा डबा ठेवत असाल तर यामुळे माता महालक्ष्मी आपल्यावर रागावते आणि आपल्या घरातून निघून जाते त्याचबरोबर आपल्या घराच्या समोर विजेचा खांब सुद्धा नसावा. यामुळे सुद्धा नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करते.
जेव्हा आपल्या घराच्या समोर विजेचा खांब असतो यामुळे आपल्या घरातील सदस्यांच्या प्रगतीमध्ये बाधा निर्माण होते व त्याच बरोबर हा विजेचा खांब आपल्या घरासमोर असणे हानिकारक सुद्धा असते कारण की जर विजेचा खांबची वायर तुटली तर याचा शॉक सुद्धा आपल्याला बसू शकतो तसेच आपल्या घराच्या अंगणात समोर गडद झाड नसावे म्हणजे मोठे मोठे झाड नसावे त्यामुळे सूर्यप्रकाश झाकला जातो आणि ज्या घरामध्ये सूर्यप्रकाश येत नाही.
अशा घरांमध्ये नकारात्मक ऊर्जा खूप मोठ्या प्रमाणावर वास्तव्य करते आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये सूर्याचे किरण येतात तेव्हा आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा निघून सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि यामुळे आपल्याला नेहमी ताजेतवाने व उत्साही सुद्धा वाटू लागते. वास्तुशास्त्रानुसार ज्या झाडाच्या मधून पांढ-या रंगाचा पदार्थ बाहेर पडतो अशा प्रकारची झाडेझुडपे आपल्या अंगात अजिबात लावू नये त्याचबरोबर आपल्या घराचे प्रवेशद्वार हे कधीही रस्त्याच्या वरती नसावे.
आपल्या घराच्या प्रवेशद्वारासमोर कोणत्याच प्रकारचे गटार खड्डा व घाण असू नये. हे असणे अत्यंत अशुभ मानले जाते. आपल्या घराच्या मुख्य द्वारासमोर सुद्धा कोणत्याही प्रकारचे मंदिर असू नये. एखादे मंदिर असणे याचा अर्थ आपल्या घरामध्ये नेहमी अशांती व अनेक संकटांचा प्रवेश होत असतो असे मानले जाते. घराचे मुख्य प्रवेशद्वारासमोर पायरी अजिबात असून यामुळे घरातील सदस्यांच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात. जर आपल्या घराच्या वर अजून एक दरवाजा असेल व दोन्ही दरवाजे एका रेषेमध्ये असतील तर तेसुद्धा अशुभ मानले जाते तसेच आपल्या घरावर घराची छाया पडणे हे सुद्धा अशुभ मानले जाते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.