घरात या जागी कधीच बनवू नये स्वयंपाक घर; होऊ शकतात हे गं’भी’र परिणाम.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या शास्त्रात वास्तुशास्त्राचे विशेष महत्त्व आहे. आपल्या घरात कोणती वस्तू कोठे आहे .कोणत्या दिशेला काय असावे, काय असू नये? याविषयी वास्तुशास्त्रात खूप सुंदर वर्णन केलेले आहे.घरातील प्रत्येक वस्तू योग्य दिशेला व योग्य ठिकाणी असेल तर त्याचे खूप शुभ परिणाम आपल्या जीवनावर पडतात आणि जर याच वस्तू चुकीच्या दिशेला असतील तर त्याच्या दुष्परिणामांचा सामना आपल्याला करावा लागतो.
घरांत नेहमी भांडणे, वाद होत असतील, काही ना काही अडचणी येत असतील ,होणारे काम होता होता मध्येच बंद पडत असेल, कोणी आजारी पडत असेल, पैशाची नेहमीच चणचण जाणवत असेल तर हा घरातील वास्तु दोष असू शकतो. आपल्या घरातील प्रत्येक वस्तूची प्रत्येक गोष्टीचा संबंध आपल्या वास्तुशास्त्राची जोडलेला असतो.
आपल्या घरातील प्रत्येक गोष्टींची एक विशिष्ट दिशा ठरलेली असते आणि जर या वस्तू योग्य ठिकाणी नसतील तर त्याचे खूप अशुभ परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात.या लेखात हे आपण जाणून घेणार आहोत की स्वयंपाक घराची योग्य दिशा कोणती आणि गॅसची शेगडी कोणत्या दिशेला ठेवावे ते.. वास्तुशास्त्राला आपल्या जीवनात फार महत्त्व आहे.
स्वयंपाक घरात आपण जेवण बनवतो व त्याद्वारे घरातील सर्वांना पोषण तत्व मिळत असते. घरातील स्त्री चा जास्तीत जास्त वेळ स्वयंपाक घरात जात असतो म्हणून स्वयंपाक घर हे योग्य दिशेला असणे फार गरजेचे आहे. चला तर मग जाणून घेऊयात स्वयंपाक घराची योग्य दिशा कोणती असायला हवी त्याबद्दल. मस्वयंपाक घर हे नेहमी अग्ने दिशांमध्ये असायला हवे. अग्नेय दिशा ही अग्नीची देवता असल्यामुळे स्वयंपाक घर ही अग्नेय दिशेला असायला हवी.
या दिशेला घरातील अग्नी म्हणजेच गॅसची शेगडी ठेवणे योग्य आहे. जर या दिशेला स्वयंपाक घर असेल तर घरातील स्त्रियांना आगीपासून धोका पोहोचत नाही. जर चुकीच्या दिशेला स्वयंपाक घर असेल तर स्त्रियांना वरचेवर चटके बसने,भाजणे ,तळणे आणि चुकीच्या दिशेला स्वयंपाक घर असल्याने त्या घरामध्ये स्वयंपाक सुद्धा चांगला बनत नाही व स्वयंपाक घरामध्ये बनलेले जेवण चवीला सुद्धा चांगले लागत नाही.
जर योग्य दिशेला स्वयंपाघर असेल तर तेथे बनवलेले जेवण रुचकर व स्वादिष्ट तर बनतेच त्याशिवाय कधीही घरात जेवण कमी पडत नाही तसेच स्वयंपाक करताना घरातील स्त्री चे तोंड पूर्व दिशेला असणे आवश्यक आहे. जर तुमच्या घरात स्वयंपाक घर या दिशेला स्वयंपाक घर असेल तर खूपच उत्तम आणि जर आपल्या घरात चुकीच्या दिशेला स्वयंपाक घर असेल तर ती दिशा शक्य असेल तर बदलावी आणि जर हे शक्य नसेल तर घरात तोडफोड करू नये.
एखादा वास्तुदोष घालवण्यासाठी घरात तोडफोड केल्यास वास्तू भंगचा दोष लागू शकतो म्हणून घराच्या पुढील व मागील बाजूला तुळस लावावी. असे म्हणतात की ज्या घरामध्ये तुळस असते, त्या घरातील वास्तुदोष नष्ट होतो म्हणून पूर्वीपासूनच आपल्या घरांच्या अंगणात तुळस लावलेली असायची कारण की आपल्या घरामध्ये असल्याने आपल्या घरातील जे काही वास्तू दोष असतात ते बाहेर निघून जातात आणि तुळशीमुळेच आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.