गाईला अशी पोळी कधीच खायला घालू नये, नाहीतर भोगावे लागतील गंभीर परिणाम.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. ज्या गायीच्या देहात तेहतीस कोटी देव वास करतात तिला आपण आपली माता मानतो. गायीला अन्न घालणे पोळी घालणे अतिशय पुण्याचे कार्य समजले जाते. जर तुम्हाला सर्व देवी देवतांचा एकत्र आशिर्वाद मिळवायचा असेल तर गायीची योग्य प्रकारे पूजा करणे आवश्यक आहे. गायी मध्ये माता लक्ष्मी तसेच सरस्वतीचे देखील वास्तव्य असते जर तुम्ही योग्य रित्या गायीची पूजा कराल तर या सुद्धा तुमच्यावर प्रसन्न होतील व तुमच्या आयुष्यामध्ये यशाचे व धन दौलतीचे दरवाजे उघडतील.
गायीच्या मुखामध्ये चार ही वेदांचे वास्तव्य असते. गायीचे पूजन करताच त्रिदेव म्हणजेच महान ब्रह्मदेव श्रीविष्णू भगवंत आणि देवांचे देव महादेव तिघेही आपल्यावर प्रसन्न होतात. श्री कृष्णांना गोपाल असे म्हटले जाते कारण ते गायीचे पालन पोषण सेवा व पूजन करीत असत. गायीला पोळी खाऊ घालायची प्रथा आपल्याकडे खूप वर्षापासून चालत आली आहे.
आपण गायीला पोळी खायाला देतो म्हणजेच साक्षात भगवंताना नैवेद्य खायला देतो म्हणून गायीला पोळी जरूर खायला द्यावी परंतू गायीला पोळी खाऊ घालताना या चुका करु नका गायीला पोळी घालताना या चुका जर तुम्ही केलात तर तुम्हाला पुण्य फळ तर कदाफि मिळणार नाही परंतू या बदल्यात आपल्या आयुष्यात अनेक अडचणी व समस्या येतील चला तर पाहूया गायीला पोळी घालताना कोणत्या गोष्टी टाळाव्यात व कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे ?
गायीला कधीच शिळी पोळी खायला घालू नये आपण गायीला नेहमी नवीन भाजलेली पोळी खायला घातली पाहिजे परंतू आपल्याकडे वेळ नसल्या कारणाने आपण ही पोळी आपल्या सवडीनुसार गायीला खायला देतो पण तोपर्यंत ती पोळी शिळी होवून जाते अशी पोळी गायीला कधीच खायला घालू नये आपण पुण्य कमवण्यासाठी गायीला पोळी खायला घालतो परंतू गायीला शिळी पोळी खायला घालून आपण पापाचे भागीदार बनतो.
मित्रांनो आपण कधी देवांना शिळा नैवेद्य देतो का ? नाही ना मग देवी समान गायीला देखील ताजी पोळी खायला घाला. गायीला पोळी खायला घालताना दुसरी चूक आपण करतो ती म्हणजे आपण गायीला कोरडी पोळी खायला घालतो. मित्रांनो गायीला पोळी खायला घालताना त्या पोळीला नेहमी तूप अथवा गूळ किंवा चणाडाळ लावा. अशा प्रकारे जर गो मातेला आपण पोळी खायला दिली तर सर्व देवी-देवतांची कृपा आपल्यावर राहिल व आपण आपल्या जीवनात सुखी-समृद्ध आणि नेहमी आनंदी राहू.
त्याच बरोबर गायीला पोळी घालताना नेहमी दुसरी पोळी खायला द्यावी याच्या मागचे कारण असे आहे की पहिली पोळी कधी सरळ येत नाही तसेच पहिल्या पोळीवर नेहमी अग्निदेवतेचा अधिकार असतो म्हणून पहिली पोळी नेहमी अग्नि देवतेला समर्पित करावी. त्याच बरोबर गायीला कधी ही उष्टी किंवा ताटात उरलेली पोळी खावू घालू नये. हे खूप अशुभ असते यामुळे आपल्याला अनेक अडचणी व संकटांचा सामना करावा लागतो.
मित्रांनो गायीला पोळी घालताना नेहमी आपल्या हाताने खाऊ घाला कधी कधी आपल्याला गायीची भीती वाटते म्हणून आपण पोळी फेकून देतो मात्र हे चुकीचे आपल्याला गायीची भीती वाटत असेल तर ज्यांची गाय आहे त्यांना पोळी देऊन गायीला खाऊ घालवी गायीला पोळी फेकून पोळी घालणे हे खूप चुकीचे आहे यामुळे तुमच्यावर पाप चढू शकते.
गायीला भोजन घालताना नेहमी सात्विक भोजन खायला घालवे कांदा व लसूण असलेले अन्न गायीला कधीच खाऊ घालू नये तसेच हिरवा चारा गायीला खाऊ घालणे अतिशय शुभ असते. गायीला गूळ खाऊ घालणे ही शुभ मानले जाते यांमुळे गो पूजनाचे विशेष लाभ आपल्याला मिळतात आणि आपल्या मागची संकटे दूर पळून जातात. या सर्व नियमांचे पालन करुन जर आपण गायीला पोळी खाऊ घातली तर गो मातेचा आशिर्वाद आपल्यालावर कायम राहतो तेहतीस कोटी देव आपल्यावर प्रसन्न राहतात आपले जिवन चिंतामुक्त व्यतित होते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.