जुन्या कपड्यांचे काय करावे.? फेकावे कि दान करावे.? जाणून घेण्यासाठी हि माहिती अवश्य वाचा.!

जुन्या कपड्यांचे काय करावे.? फेकावे कि दान करावे.? जाणून घेण्यासाठी हि माहिती अवश्य वाचा.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो माणसाची ओळख होते ती त्याच्या कपड्यातून परंतू जर आपल्याकडे व्यर्थ असे ढीगभर कपडे असतील तर त्यांच काय करायचं ? ते कोणाला द्यायचे ? कधी द्यायचे ? ह्या सगळ्याचा विचार तुम्ही केला आहात का ? या सगळ्या मागे सुद्धा शास्त्र आहे मित्रांनो होय ही कार्ये सुद्धा तुम्ही योग्यरित्या नाही पार पाडलीत तर तुमच्या आयुष्यात अनेक संकटे येवू शकतात चला तर पुढील लेखातून या विषयाचा खोलवर आढावा घेऊया.

मित्रांनो नव-नवीन कपडे घालयला सगळ्यांना आवडतात आपल्याला असे वाटते की सगळ्या प्रकारचे कपडे आपल्या कपाटात असावेत ते ही विविध रंगांमध्ये विविध पैटर्न मध्ये मात्र जेव्हा हे कपडे पडून राहतात आपण त्यांचा वापर करणे बंद करतो तेव्हा मात्र त्यांच काय करायच ? ह्या प्रश्नाचे उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत होय जर एखादी वस्तू तीन महिन्याहून अधिक मानवी स्पर्शापासून वंचित राहिली असेल तर त्यामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करते.

म्हणून असे कपडे घालू नये शिवाय फाटके कपडे घालणे बंद करा आपल्याला एखादा शर्ट आवडतो म्हणून आपण तो वर्षानु-वर्षे वापरतो मात्र तो फटका नसावा कारण फाटके कपडे दरिद्रयाची लक्षणे आहेत असे कपडे घातल्याने तुमच्या नशिबी नेहमी अपयश येत राहिल. जर तो फाटलेला असेल तर शिवून मगच वापरावा. जे कपडे आपण वापरत नाही त्या कपड्यांची कधी गाठोडी बांधून ठेवू नये असे कपडे निट धुवून व घडी घालून कपाटात ठेवून द्यावे.

त्याच बरोबर जर फाटलेली अंतरवस्त्रे परिधान केल्याने आपल्यावर शनिची वाईट दृष्टी पडते आणि आपल्या आयुष्यात संकटे येण्यास सुरवात होते. तसेच वापरता नसलेल व जुने झालेल तसेच फाटलेल कापडे कधीच कोणाला देवू नये असे कपडे एकत्र करुन जाळून टाकावे अथवा कचराकुंडीत टाकून द्यावेत मित्रांनो त्याच बरोबर तुम्ही स्वत: चे कपडे दुसर्यांना देताना तसेच माळकटलेले कपडे तसेच देवू नयेत अशाने तुम्ही ज्या व्यक्तीला कपडे द्याल त्या व्यक्तीच्या मागे साडेसाती लागेल आपण जेव्हा ही आपले कपडे दुसर्यांना द्याल तेव्हा नेहमी ते निट धुवून द्या.

सोबतच कपडे देताना नेहमी महिन्याच्या पंधरा तारखे नंतरच द्यावेत आणि शुक्रवार आणि शनिवारी जर तुम्ही कपडे देत असाल तर अति उत्तम अशाने तुमच्या ग्रहमानाची दशा चांगल्या स्थानी जाईल आणि तुमच्या आयुष्यात सुखाचे दिवस येतील मंगल कार्ये घडण्यास सुरवात होईल. तसेच तुम्हाला नकारात्मक शक्ती बद्दल सांगायचे झाले तर जुने फाटके कपडे लगेच नकारात्मक गोष्टींच्या संपर्कात येतात आणि मग आपल्या आयुष्यात काही चांगले घडत नाही नेहमीच आपल्या कामात अडथले येत राहतात अश्या नकारात्मक शक्तीला दूर ठेवण्यासाठी कपडे वेळच्या वेळी धुवून सुर्यप्रकाशात चांगले वाळत घाला. हिवाळ्यात वापरले जाणारे कपडे सुद्धा वेळच्या वेळी धुवून सुर्य किरणांमध्ये सुकवून घ्यावेत.

मित्रांनो त्याच बरोबर आत्ता थंडीचा ऋतू हिवाळा सुरु झाला आहे आपण आजकाल आपण पाहतो रस्त्यावर अनेक गरीब माणसे लहान- मुलेबाळे फाटक्या कपड्यांमध्ये रात्रभर कुडकुडत असतात अश्या लोकांना मदत करा तुम्ही जे कपडे वापरत नाहीत ते योग्य पध्दतीने या गरिबांना दान करा जर तुम्हाला देवाने खूप दिले आहे तर त्याचा भाग गरिबांमध्ये वाटा अश्याने तुम्हाला पुण्यप्राप्ती होईल आणि तुमचे आयुष्य सार्थकी लागेल. आपण माणूस म्हणून जन्माला आलो आहे आपण परोपकार केले पहिजेत गरजवंताना नेहमी मदत करत रहा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *