वास्तुशास्त्रानुसार फरशी पुसताना पाण्यात टाका ही एक वस्तू; घरात मातालक्ष्मी दीर्घकाळ वास करेल.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जेथे हात फिरे तिथे लक्ष्मी वसे जेथे स्वच्छता असते ही म्हण आपण सर्वांनी ऐकली असेल. जेथे स्वच्छता असते तेथे लक्ष्मी आपले वास्तव्य करते. आपण आपले घर स्वच्छ व सुंदर दिसावे यासाठी किती प्रयत्न करतो. आपण आपले घर झाडून स्वच्छ करतो. घरातील घान , जळमटे बाहेर काढतो अश्या विविध प्रकारे आपण आपल्या घराची स्वच्छता करीत असतो परंतु फरशी पुसताना आपल्याला काही गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
आपण फरशी पुसताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे. फरशी पुसताना काय करावे? फरशी पुसण्याचा पाण्यात काय टाकावे व घरात सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी काय करावे? यांबद्दल ची सगळी माहित आज आपण जाणून घेणार आहे. फरशी पुसताना एक गोष्टी कडे लक्ष द्यावे.जसे आपण संध्याकाळी झाडू करत नाही त्याच पद्धतीने ही फरशी संध्याकाळच्या वेळी कधीही पुसत बसू नये.
सूर्यास्ताच्या वेळी झाडू मारुन आहेत हे तर आपण ऐकलेली असेल परंतु संध्याकाळी फरशी पूसू नये नाहीतर आपल्या घरात नकारात्मक येते. आपल्या घरातील संपन्नता नष्ट होते. आपण ज्या कपड्याने फरशी पुसणार आहोत तो कपडा कुणाच्या दृष्टीस पडणार नाही अशा प्रकारे ठेवावा. जर तुमच्या कडे मोब असेल तर तो मोब कुणाला दिसणार नाही अशा प्रकारे ठेवावा.
यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा व खराब वास्तू दोष उत्पन्न होतो. फरशी पुसताना खाली बसूनच पुसावी यामुळे लक्ष्मी स्थिर राहते. अनेक जण फरशी पुसण्या साठी मोब चा उभ्याने वापर करत असल्याने लक्ष्मी अस्थिर होऊन जाते.फरशी स्वच्छ करण्यासाठी पाण्यात आपल्या रोजच्या वापरातील एक मूठभर मीठ टाकावे त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन जाते त्याचरोबरीने सूक्ष्म जीव जंतू सुद्धा नष्ट होतात.
आता आपल्याला शक्य असेल तर तुरटीच्या पाण्याने ही आपण फरशी स्वच्छ करू शकतो त्यामुळे घरात सकारात्मकता येऊ शकते. घरात सुख समाधान व आनंद राहतो. घर दररोज स्वच्छ करणे खूप चांगले असते म्हणून दररोज फरशी जरूर पुसावी परंतु तुम्ही गुरुवारी फरशी पुसण्याचे टाळा कारण गुरुवारी हा गुरू ग्रहाचा वाराने असल्याने गुरू हा ग्रह तसा जड आहे आणि या दिवशी फरशी पुसून त्याला हलका करू नये तसेच गुरुवारी कोणतेही एक्स्ट्रा साफसफाईचे काम करून गुरू ग्रहाला हलके करू नये.
गुरुवारी घरातील जाळे जळमटे काढू नये. साफ सफाई करू नये. असेही म्हटले जाते जर गुरुवारी फरशी पुसणे अतिशय आवश्यक असेल तर त्या पाण्यात चिमूटभर मीठ व हळद टाकून त्या पाण्याने फरशी पुसा असे केल्याने गुरू दोष लागणार नाही व तुमच्या जीवनात कोणतेही संकट येणार नाही. म्हणून फरशी पुसताना या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा आणि आपले घर सुंदर आणि स्वच्छ ठेवा कारण स्वच्छ घरातच माता लक्ष्मी दीर्घकाळ वास्तव्य करत असते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.