नवरात्रीचे 9 दिवस घरात करा अशाप्रकारे कलश स्थापना; महालक्ष्मी घरात येईल, पैसा सुख मिळेल.!

नवरात्रीचे 9 दिवस घरात करा अशाप्रकारे कलश स्थापना; महालक्ष्मी घरात येईल, पैसा सुख मिळेल.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नवरात्रीचे नऊ दिवस घरात करा कलश स्थापना.. महालक्ष्मी आपल्या घरात येईल यामुळें घरातील पैसा, सुख शांती वाढेल. तुम्हाला भरभरून धन मिळेल. कोणत्याही गोष्टीची तुमच्या घरात कमी राहणार नाही. अशी मान्यता आहे की नवरात्रीचे नऊ दिवस म्हणजे नवरात्रीचा पहिला दिवस 7 ऑक्टोबर गुरूवारच्या दिवशी येत आहे आणि या दिवशी घटस्थापना होणार आहे म्हणजे घटाची स्थापना केली जाते.

प्रत्येक जण आपल्या घरात घटाची स्थापना करतात.ज्यांच्या घरात घटाची स्थापना होणार आहे त्यांनी एका गोष्टीची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. अशी मान्यता आहे की नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत देवी अंबा माता व लक्ष्मी माता घरोघरी जाऊन भक्तांना आशीर्वाद देते. जर आपल्याला देवीला प्रसन्न करायचे असेल,माता महालक्ष्मी यांना प्रसन्न करायचे असेल, तुमच्या कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला सुद्धा आपल्या घरामध्ये कलश स्थापना अवश्य करायची आहे.

अनेक जण या दिवसात घटाची स्थापना करत असतात काही जण अखंड दिवा लावत असतात परंतु जर तुम्ही ह्या गोष्टी करत असेल तर उत्तमच आहे आणि जर करत नसाल तर काही चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही जास्त विचार करू नका. तुम्ही तुमच्या घरात घटाची स्थापना केली असेल तरी तुम्ही कलश स्थापना अवश्य करा.

अशावेळी कलश स्थापना कशी करायची याबद्दल अनेकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत असतात म्हणूनच नवरात्राच्या पहिल्या दिवशी जेव्हा आपण घट बसवतो अशा वेळेस आपल्याला कलश स्थापना करायची असते.नवरात्र ही 7 ऑक्टोबर गुरुवार पासून सुरू होणार आहे. जर तुम्हाला कलश स्थापन करायची असेल तर आपल्याला यासाठी एक नारळ लागेल.

तांब्या लागेल त्यामध्ये शुद्ध पाणी विड्याचे पाने किंवा आंब्याचे पान त्यामध्ये पाण्यामध्ये टाकायचे आहे. एक नवीन कोरी सुपारी, एक रुपयाचे नाणे आणि त्यानंतर फुलहार जे तुम्ही करू शकतात. त्यानंतर तांब्याच्या कलश मध्ये शुद्ध पाणी घ्यायचे आणि त्यामध्ये पाच विड्याची पाने किंवा आंब्याची पाने लावायची त्यामध्ये एक सुपारी टाकायचे व मग पैसे टाकायचे त्यानंतर कुंकू हळद अक्षता टाकून त्या कलशाच्या पानांची पूजा करायची त्यानंतर नारळ त्या कलशमध्ये ठेवायचा आणि कलश तयार करायचा आहे.

कलशावर आपल्याला कुंकवाने स्वस्तिक काढायचे आहे आणि त्यानंतर त्या नारळाला तुम्ही सफेद रंगाचा धागा दोरा बांधू शकता. तो तुम्ही तीन वेळेस किंवा सात वेळेस नारळाच्या अवती भोवती बंधू शकता त्यानंतर तांब्याला सुद्धा तुम्ही दोरा बांधायला विसरू नका. त्यानंतर तो तांब्या खाली काही तांदूळ ठेवून तुम्ही तुमच्या घरात किंवा बाजूला एक पाठ लावून ठेवा त्यावर नऊ दिवसापर्यंत तुम्ही या कलशाची पूजा करा. आरती करा.

कुलदेवीची आरती माहिती असेल तर आरती पूजा करा. नैवेद्य दाखवा. सकाळ संध्याकाळ आपल्याला भोग दाखवायचा आहे फक्त कलश स्थापन केल्यानंतर तुम्ही नेहमी रोजच्या रोज कलशाची पूजा होईल याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर दसऱ्याच्या दिवशी तुम्ही या कलशातले पाणी तुम्हाला तिथून उचलून घ्यायचे आहे याचे विसर्जन आपल्याला करायचे आहे.

दसऱ्याच्या दिवशी तुम्ही सगळे हार काढून घ्यायचे आहे. सगळ्यात आधी दोन्ही हात लावून त्या कल कलशाला हलवायचे आणि त्यानंतर त्यातले जे पाणी आहे व तांब्या नारळ बाजूला काढून ठेवून आपल्या हाताने ते पाणी सगळ्या रूम मध्ये आपल्याला शिंपडायचे आहे त्या नंतर उरलेले पाणी आपण तुळशीमध्ये टाकून द्यायचे आहे आणि आपण जो पैसा सुपारी टाकली होती ती आपण आपल्या तिजोरीमध्ये ,गल्ल्यांमध्ये ठेवायचे आहे आणि नारळ आणि आंब्याची पाने लावले होते ते सगळं आपण वाहत्या पाण्यात विसर्जन करायचे आहे अश्या पद्धतीने आपण कलश स्थापन करून त्याची विधिवत पूजा करून आपल्याला कलश विसर्जन सुद्धा करायचे आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *