लग्न जमत नाही.? वय निघून चालले आहे.? तर करा हा उपाय, लग्न लगेच जमेल.!

लग्न जमत नाही.? वय निघून चालले आहे.? तर करा हा उपाय, लग्न लगेच जमेल.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या काळामध्ये आपल्या आवडीनुसार वर-वधू मिळणे खूप कठीण झालेले आहे. आपल्या मनाप्रमाणे स्थळ प्राप्त होत नाही आणि अनेक समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते. बऱ्याचवेळा लग्नाचे वय सुद्धा निघून जाते. तरीही आपले विवाह जमत नाही आणि यामुळे अनेकदा आपण चिंता सुद्धा करू लागतो. घरच्यांकडून सुद्धा लग्न करण्यासाठी प्रेशर दिला जातो व समाजामध्ये सुद्धा आपण कधी लग्न करणार आहोत अशी विचारणा सुद्धा नातेवाईक मंडळींकडून करून केली जाते.

आपले लग्न लवकर जमावे अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि जर लग्न जमत नसेल तर यासाठी ज्योतिशास्त्र मध्ये सुद्धा वेगवेगळे उपाय सांगण्यात आलेले आहे. हा एक उपाय जर आपण मनोभावे व श्रद्धेने केल्यास आपले लग्न लवकर जुळण्यास मदत होणार आहे. दर गुरुवारी पाण्यामध्ये एक चतुर्थांश हळद टाकून अंघोळ केल्याने आपल्याला फायदा मिळतो तसेच या गुरुवारच्या दिवशी गाईला साखर टाकून बनवलेली पोळी सुद्धा खायला द्यायला हवी.

आणि भिजवलेली चणाडाळ,गूळ खायला द्यावे यामुळे तुमचा लवकर विवाह होईल. वास्तू आणि ज्योतिष शास्त्रानुसार विवाहेच्छुक मुला-मुलींनी काळया रंगाचे कपडे प्रामुख्याने घालायला नाही पाहिजे कारण की काळे रंगाचे प्रतिनिधित्व प्रामुख्याने शनिदेव राहू व केतू करत असतात. जे आपल्या विवाहामध्ये बाधक असतात. जर तुम्ही प्रेमविवाह करत असाल किंवा पारंपारिक पद्धतीने विवाह करत असाल तरी आपल्याला या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

अविवाहित मुले मुली जे आपल्या घरापासून दूर राहून नोकरी किंवा शिक्षण घेत असतील जास्त करून रूम शेअर करतात किंवा भाड्याने रूम घेऊन मित्रांसोबत राहतात. अशावेळी जर तुम्हाला वाटत असेल की आपले विवाह लवकर व्हावे तर अशावेळी आपला बेड दाराजवळच लावायला हवा. हे लक्षात ठेवायला पाहिजे की लग्नाची बोलणी करण्यासाठी आलेल्या लोकांना अशा प्रकारे बसवायला पाहिजे की त्यांचे तोंड घराच्या आतल्या बाजूस असावे, त्यांना लग्नात अडचणी येत असतील त्यांनी या गोष्टींकडे नक्की लक्ष द्यायला हवे.

व्यक्तीने झोपताना आपले पाय उत्तरेकडे आणि डोके दक्षिण दिशेकडे ठेवायला हवे मनाप्रमाणे जोडीदार आणि लवकर लग्न जमण्यासाठी तरुणांना अशा खोलीत झोपायला हवे तेथे एकापेक्षा जास्त दार नसतील .विज्ञानानुसार विवाह इच्छुक लोकांना आतल्या खोलीत गुलाबी हलका पिवळा रंग मारायला हवा. आपल्या घराच्या दक्षिण-पश्चिम भागात लाल रंगाची फ्रेम लावायला हवी तसेच एखाद्या मुलीचे विवाहाची बोलणी होणार आहे तर अशा वेळी दोन दिवस आधी तिच्यावरून तुरटी उतरवून तव्यावर टाकायला हवी. जर कुणाची नजर लागलेली असेल किंवा दृष्टिदोष निर्माण झालेला असल्यामुळे सुद्धा विवाह लवकर ठरत नसेल तर यामुळे सगळ्या बाधा नष्ट होतील.

मंगल दोष मुळे विवाह जमण्यास अडथळा येत असल्याने मंगल चंडिका स्तोत्र नित्य पठण करावे. उमामहेश्वर स्तोत्र, पार्वती स्तुती अविवाहित मुलींनी जरूर पठण करावी. अविवाहित मुला-मुलींनी त्रिपुरारी पौर्णिमेला रात्री कार्तिक स्वामींचे दर्शन घ्यावे. विवाह साठी इच्छुक असणाऱ्या मुलींनी शुक्रवारी देवीला वेणी किंवा गजरा अर्पण करावे असे पाच शुक्रवार न चुकता करावे. या सगळ्या गोष्टी जर आपण मनापासून केला तर आपले लग्न लवकर जमेल म्हणून या गोष्टी अवश्य करा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *