याप्रकारे करा संकष्टी चतुर्थी पूजा; तुमच्या सर्व इच्छा होतील ताबडतोब पूर्ण.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हिंदू धर्म शास्त्रामध्ये श्री गणेश यांना प्रथम पूजनीय मानले जाते. श्री गणेश यांना विद्येचा देवता असे सुद्धा संबोधले जाते. त्याचबरोबर श्री गणेश संकटांना दूर करणारा विघ्न हरणारा म्हणून सुद्धा ओळखला जातो म्हणूनच अनेक जण श्री गणेशाची आराधना करण्यासाठी वेगवेगळे उपवास व्रत करत असतात त्यापैकी एक म्हणजे संकष्टी चतुर्थी.
आपल्यापैकी अनेक जण संकष्टी चतुर्थीचा उपवास धरतात परंतु अनेकदा संकष्टी चतुर्थीला काही नियम पाळणे गरजेचे ठरते. चंद्रोदय कधी होणार आहे ?गणेशाची सेवा कशी करायची? पूजा विधी कशी करायची? याबद्दलची अनेकांना माहिती नसते त्यामुळे या व्रताचे पाहिजे तसे फळ अनेकांना मिळत नाही म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी संकष्टी चतुर्थी बद्दल महत्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत. चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..
संकष्टी चतुर्थीचा उपवास संतान सुख, समृद्धी,वैभव, समाधान लाभावी याकरिता केला जातो. श्री गणेश यांची जी व्यक्ती मनापासून पूजा करते त्यांना श्री गणेश कृपा आशीर्वाद मिळतात, मनोकामना पूर्ण होतात. आता आपण श्री गणेशाचे विधिवत पूजा कशी करायची या बद्दल जाणून घेणार आहोत.
संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे आणि त्यानंतर आपल्या ज्या काही प्राथमिक विधी आहेत त्या लवकर उरकून घ्याव्यात. सध्याचा पर्व हा माघ तिथी आहे म्हणून सकाळी स्नान करताना गंगाजल अवश्य टाका.जर तुमच्याकडे काळे तीळ असतील तर त्याचे उटणे बनवून अंगाला जरूर लावा. त्यानंतर सूर्याला अर्ध द्यायचे आहे. सूर्याला जल अर्पण केल्यानंतर उजव्या हातामध्ये फुल,हळद,कुंकू व अक्षता घेऊन या संकष्टी चतुर्थी चा संकल्प करायचा आहे.
हे सिद्ध गणेशा आज मी संकष्टी चतुर्थीचा उपवास करत आहे.तो उपवास तुम्ही माझ्याकडून हा उपवास करून घ्या. असा संकल्प आपल्याला श्री गणेश चरणी करायचा आहे. हा उपास करत असताना तुम्हाला दिवसभर फलाहार घ्यायचा आहे त्याचबरोबर या उपवास दरम्यान तुम्ही दूध पिऊ शकता तसेच फळांचे सेवन सुद्धा करू शकता. संध्याकाळी श्री गणेशाची मनोभावे पूजा करा. हे पूजा करण्याआधी तुम्हाला स्नान करायचे आहे.
हे व्रत अतिशय शुभ फलदायी असे मानले गेले आहे म्हणून यात कोणतीही चूक शक्यतो करू नका. ही पूजा करताना आपल्याला काही साहित्य सुद्धा लागणार आहे ,ते साहित्य म्हणजे हळद-कुंकू तीळ तीळ काळे तिळाचे लाडू गंगाजल आणि कलश इत्यादी सामग्री आपल्याला लागणार आहे. पूजा करण्याआधी आपल्याला त्या जागेवर गंगा जल शिंपडायचे आहे व त्यानंतर आपल्याला पाट मांडायचा आहे.
पाट मांडून झाल्यानंतर त्यावर एक स्वच्छ कपडा अंथरायचा आहे मग कपड्यावर गहू किंवा तांदूळ टाकून त्यावर श्रीगणेशाची मूर्ती किंवा फोटो ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला कलश स्थापना करायची आहे. तांदूळ पसरून त्यावर कलश ठेवावा या कशामध्ये पाणी भरून पाणी भरून आजूबाजूला पाच अशोकाची किंवा नागिनी ची पाने लावावीत. या पानांना हळद-कुंकू वहावे तसेच कलशा मधील पाण्यात हळकुंड,सुपारी, शिक्के टाकावीत.
त्याचबरोबर पाण्यामध्ये हळद-कुंकू वहावेत कलशाला सुद्धा हळदीकुंकू लावावा तसेच कलशावर हळद तांदूळ आणि भरलेली प्लेट ठेवावी आणि त्यावर दिवा ठेवावा तसेच धूप अगरबत्ती लावावी त्यानंतर कलशाची मनोभावे पूजा करायची आहे मग आपल्याला फुलं गंगा जलामध्ये मिसळून संपूर्ण तू जेवण वर शिंपडायचे आहे त्यानंतर हात जोडून आपल्याला संकल्प करायचा आहे की हे श्री गणेशा ही जी पुजा मांडली आहे तुझ्यासमोर ती स्वीकार कर. अशा पद्धतीने आपल्याला आपल्याला संकल्प करायचा आहे.
त्याचबरोबर ही पूजा करत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्या की दुर्वा हे गणेशाला प्रिय आहे म्हणून ही पूजा करत असताना २१ दूर्वा अवश्य अर्पण करा त्याचबरोबर पूजेमध्ये काळे तीळ व काळे तिळाचे लाडू नक्की ठेवा असे केल्याने तुमची पूजा शिग्र स्वीकारली जाते त्याच बरोबर नंतर श्री गणेशा यांना नैवेद्य अर्पण करायचा आहे त्यात काळे तिळाचे लाडू आपल्याला गणेशाला द्यायचे आहेत. श्री गणेशाची पूजा करत असताना ओम गं ओम गं गणपतये नमः या मंत्राचा एकवीस वेळा जप करायचा आहे त्यानंतर आपल्याला चंद्राची पूजा करायचे आहे.
चंद्रोदयाची वेळ तुम्ही कॅलेंडर मध्ये पाहू शकता व त्या प्रमाणे चंद्राची पूजा आपल्याला करायची आहे. भगवान चंद्राची पूजा करत असताना आपल्याला सुरुवातीला कलशा मध्ये दूध घेऊन चंद्र यांना अर्पण करायचे आहे त्यानंतर हे दूध अर्पण करताना ओम सोम सोम नमः या मंत्राचा सुद्धा जप करायचा आहे तसेच चंद्र यांना हळद-कुंकू,फूल वाहायचे ,अशा पद्धतीने आपल्याला श्रीगणेशाची पूजा करायची आहे.
एकदा ही पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी स्थान विधी उरकून झाल्यानंतर उत्तरपूजा करून आपल्याला ही पूजा हलवायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही संकष्टी चतुर्थीचा उपवास व्रत करू शकता. ही पूजा मनोभावाने केल्यास सिद्धगणेश तुमच्या सर्व मनोभावना इच्छा आशा अपेक्षा पूर्ण करतील.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.