फेविक्विक डोळ्यात गेल्यास त्वरित करा हि गोष्ट; डोळा चिकटणे ,निकामी ,ऑपरेशन करायची वेळ येणार नाही.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या लेखामध्ये फेविक्विक बद्दल जाणून घेणार आहोत. फेविक्विक हे आपण सर्वसाधारण प्रमाणे एखादी वस्तू फुटल्यावर ती जोडण्यासाठी तिचा वापर करत असतो म्हणूनच फेविक्विक हे असे एक माध्यम आहे की जर वस्तू कितीही प्रमाणामध्ये तुटली असेल तर ती काही सेकंदांमध्ये आपल्याला जोडतात येते.
आणि हे सगळं फेविकिक मुळे शक्य होत असते परंतु बहुतेक वेळा हे फेविक्विक वापरताना आपल्याला काळजी घ्यावी लागते अन्यथा त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. जर समजा फेविक्विक चा वापर करत असताना चुकून एखादी वस्तू जोडत असताना त्या फेविक्विकचा लहानसा थेंब जर आपल्या डोळ्यांमध्ये गेला तर आपला डोळा कायमस्वरूपी निकामी होऊ शकतो.
त्याच बरोबर तुमचा डोळा योग्य पद्धतीने कार्य करण्यास अपयशी ठरू शकतो. त्याचे परिणाम म्हणून तुम्हाला ऑपरेशन सुद्धा करावे लागेल म्हणूनच जर याचा उपयोग करत असताना जर चुकून डोळ्यात थेंब गेल्यास अशा वेळी आपण नेमके काय केले पाहिजे किंवा त्यांची क्षमता कशा पद्धतीने कमी करता येईल याचा विचार व या बद्दलची माहिती आज आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.
तुटलेली वस्तू जोडताना अशावेळी आपण फेविक्विकचा उपयोग करत असतो. जेव्हा आपण बाजारामधून फेविक्विक आणतो तेव्हा त्याचे कव्हर काढताना किंवा ते पॅकेट फोडताना चुकून एखादा थेंब आपल्या डोळ्यात जातो तेव्हा नैसर्गिकपणे आपण आपला डोळा ही लगेच बंद करणार आहोत आणि शक्य होईल तेवढा लगेच डोळे उघडायचा आहे व हाताच्या साह्याने डोळा मोठा करून ठेवायचा आहे म्हणजेच तुमच्या डोळ्याच्या ज्या काही पापण्या आहे,
त्या बोटांच्या सहाय्याने लांबवून भुवयांच्या जवळ त्यांना न्यायचे आहेत. ज्या ठिकाणी तो थेंब लागलेला आहे ,अशा ठिकाणी आपला बोट पाण्यामध्ये बुडवून मग ते बूट डोळ्याच्या आजूबाजूला थेंब लागलेला आहे अशा ठिकाणी फिरवायचा आहे. ही कृती करत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा कि, हे सर्व करत असताना आपला डोळा चुकूनही बंद होता कामा नये. तो सदैव उघडाच असायला हवा.
शक्य होईल तेवढी लवकरात लवकर वैद्यकीय डॉक्टरांची मदत घ्यायची आहे व त्यांना हा झालेला त्रास सांगायचा आहे. जेणेकरून डॉक्टर डोळा वाचवण्यासाठी आवश्यक जे प्रयत्न करतील. जर तुम्हाला डोळा नीट उघडता आला तर या थेंबा मुळे जे काही वाईट परिणाम तुमच्यावर होणार आहेत त्या परिणाम पासून वाचता येईल. या लेखामध्ये सांगितलेली जी काही कृती आहे ती काही सेकंदांमध्ये घडायला हवी. जर तुम्ही जास्त वेळ लावला तर त्याकरिता वाईट परिणाम सुद्धा भोगावे लागतील.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.