फ्लॅट विकत घेताय.? त्याअगोदर वास्तुशास्त्राच्या या गोष्टी नक्की जाणून घ्या.!

फ्लॅट विकत घेताय.? त्याअगोदर वास्तुशास्त्राच्या या गोष्टी नक्की जाणून घ्या.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज लोकसंख्या मध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाल्यामुळे प्रत्येकाला आपले घर व्हावे असे वाटत असले तरी ते शक्य नाही. या प्रचंड स्पर्धेच्या युगामध्ये मानवाला राहायला घर मिळणे ही एक महत्त्वाची बाब झालेली आहे. प्रत्येकाला जमिनीवरील प्लॉट मिळेलच असे नाही यासाठी अपार्टमेंटमधील फ्लॅट घेण्याचे प्रमाण वाढले आहे.

म्हणूनच आपल्या आर्थिक सोयीनुसार फ्लॅट हे अपार्टमेंट बांधणारे व्यवसायिक आपल्याला बांधून देत असतात .जर एका अपार्टमेंटमध्ये म्हणजेच एका घरामध्ये सगळे फ्लॅट वास्तुशास्त्रानुसार असतील असे नाही, त्यामुळे आपण असे म्हणू शकतो की फ्लॅटमध्ये वास्तुशास्त्रानुसार सगळ्या फ्लॅट मिळणे शक्य नाही. तरी पण बऱ्याच प्रमाणामध्ये हे शक्य आहे.

कोणताही फ्लॅट विकत घेत असताना त्याच्या आधी तो फ्लॅट वास्तुशास्त्रानुसार संमत आहे की नाही हे आपण पाहू शकतो. जर आपल्याला पाहिजे असलेल्या फ्लॅट मध्ये वास्तुशास्त्र नुसार वास्तूसाठी ७० टक्के नियम जर त्या फ्लॅटमध्ये असतील तर घर विकत घेण्यास कोणतीच समस्या नाही . जर फ्लॅट विकत घेत असताना मुख्य दरवाजा कोणत्याही अशुभ स्थानी उघडत असेल तर असा दरवाजा शक्यतो नेहमी बंद ठेवावा.

जेव्हा काम असेल तेव्हाच या दरवाजाचा उपयोग करावा. त्या दरवाजाच्या भिंतीवर विघ्नहर्ता श्रीगणेशाची मूर्ती किंवा फोटो अवश्य लावा जेणेकरून घरामध्ये प्रवेश करणाऱ्या व्यक्तीला सर्वप्रथम श्री गणेशाचे दर्शन होईल आणि जर त्या व्यक्तीबद्दल बरोबर एखादी नकारात्मक ऊर्जा असेल तर ती सकारात्मकतेने मध्ये रुपांतरीत होऊ शकते.

अशामुळे तुमच्या घरात कोणत्या प्रकारची बाधा प्रवेश करणार नाही. शक्यतो नैऋत्य व अग्नेय दिशेला स्नानघर असणारे फ्लॅट विकत घेण्याचे टाळावे. जर विकत घेतलाच असेल तर अशा बाथरूम मध्ये पाण्याचा साठा कमी करावा किंवा करूच नये. ईशान्य दिशेला गंगेचे पाणी भरून ठेवावे ,यामुळे नैऋत्य दिशेतील बाथरूमचा वास्तुदोष कमी होतो. आग्नेय दिशेला जर स्नान घर असेल तर लाल रंगाचा दिवा व लाल रंगाचा बल्ब अग्नेय दिशेला नेहमी चालू ठेवावा.

स्नान करताना पूर्व दिशेकडे तोंड करून बसावे,अशा द्वारे काही नियमाचे पालन करुन तुम्ही त्या घरात वास्तुदोष जर असेल तर ते आटोक्यात आणू शकता किंवा त्यांचा प्रभाव कमी करू शकता. त्याचबरोबर घरातील कोणतीही वस्तूंची तोडफोड न करता तुम्ही तुमच्या स्वप्नातील घर आनंदाने व समाधानाने विकत घेऊ शकता व तेथे वास्तव्य करू शकता.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *