खाज,खरूज,नायटा घालवण्यासाठी करा हा उपाय.. ३ वर्षापासूनचे गचकर्ण होईन नष्ट..!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. खाज,खरूज,नायटा,गचकरण असं कोणतेही इन्फेक्शन मुळापासून नष्ट करतो हा घरगुती उपाय. मित्रांनो तुम्ही जर अशा त्वचेच्या फंगल इन्फेक्शन पासून त्रस्त असाल तर आजची हि माहिती तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. कारण आजचा हा उपाय तुमच्या त्वचेवरील फंगल इन्फेक्शन पूर्णपणे नाहीसे करेल.
त्वचेवरील फंगल इन्फेक्शन जाण्यासाठी वेळ हा निश्चित लागतो, गरज असते फक्त कोणताही उपाय नियमित करण्याची. चला तर पाहूया या उपायांबद्दल.
खाज-खरूज घालवण्यासाठी आपल्याला पूजेसाठी वापरला जाणारा कापूर घायचा आहे. या कापूरच्या २ गोळ्या घेऊन बोटांच्या मदतीने बारीक पावडर करायची आहे. त्यानंतर एक चमचा आवळा तेल घेऊन ते त्यात मिसळायचे आहे. हे दोन्ही घटक चांगले मिक्स करायचे आहे.
कापूर हा अँटीबॅक्टेरिअल व अँटीफंगल गुणधर्मांनी परिपूर्ण असतो, ज्यामुळे त्वचेवरील फंगल इन्फेक्शन नष्ट होण्यास मदत होते. तसेच आवळा तेल त्वचेचे नोरिशमेंट करतो. यामधील व्हिटॅमिन सी आणि हीलिंग प्रॉपर्टीज खाजेच संक्रमण थांबवण्यासाठी मदत करतात.
हे दोन्ही घटक व्यवस्थितपणे मिक्स झाल्यानंतर एक कापसाचा गोळा घेऊन ते मिश्रण त्वचेवर लावायचं आहे. या मिश्रणाने त्वचेवर १ ते २ मिनिटे व्यवस्थित मालिश करायची आहे. त्यानंतर ते किमान २ तास त्वचेवर राहू देऊन ते नंतर सध्या पाण्याने स्वच्छ धुवून फडक्याने पुसावे. लक्षात ठेवा त्वचा धुण्यासाठी केमिकलयुक्त प्रोडक्स अथवा साबणाचा वापर करू नये.
दिवसातून २ वेळा नियमित १५ दिवस तुम्हाला हा उपाय करावा लागेल. यादरम्यान रक्त शुद्धीसाठी एक चमचा त्रिफळा चूर्ण एक ग्लास कोमट पाण्यातून रोज सकाळी घ्यायचे आहे. यादरम्यान, खरात, तेलकट, मांसाहार पदार्थ खायचे टाळायचं आहे.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.