संसर्गाची शंका येताच करा हा सोप्पा उपाय; फुफ्फुस साफ होऊन श्वास देखील होईल मोकळा.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. फक्त हा उपाय करा आणि आपल्या फुफ्फुसाच्या सर्व समस्यांपासून मुक्तता मिळवा. आपल्या शरीरातील फुप्फुस हे अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. आपल्या शरीराला ऑक्सिजन या फुप्फुसेपासूनच मिळत असतो. जर हे अवयव खराब झाले तर आपल्याला श्वास घेण्यास त्रास होतो आणि अनेकदा आपला जीव गमावून मृत्यूसुद्धा ओढवतो. सध्याच्या काळामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा नसल्याने अनेक गोष्टी आजूबाजूला घडत आहेत.
या गोष्टी अत्यंत भयानक आहे म्हणून आपल्याला आपले आरोग्य सुद्धा जपणे तेवढेच गरजेचे आहे. जर आपले फुफ्फुस व्यवस्थित कार्य करत असेल तर आपले ऑक्सीजन सुद्धा नियंत्रण राहते. 95 पेक्षा जास्त ऑक्सिजनची पातळी असेल तर ती आपल्या शरीरासाठी चांगले ठरते. 95 जर कमी असेल तर आपल्या शरीराला धोक्याची घंटा आहे असेच समजावे म्हणूनच जर आपल्याला खूप चांगले ठेवायचे असेल तर काही पथ्ये सुद्धा पाळणे गरजेचे आहे व आरोग्य जपणे गरजेचे आहे.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला जे पदार्थ लागणार आहे, ते पदार्थ आपल्या स्वयंपाक घरामध्ये सहज उपलब्ध होतात. त्यातील पहिला पदार्थ आहे म्हणजे धने. धने हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहे. आपल्याला एक चमचा धने लागणार आहे त्यानंतर दुसरा पदार्थ म्हणजे जिरे.
जिरे हे आपल्या पचनशक्ती साठी अत्यंत महत्त्वाचे ठरते. जर आपल्या पोटामध्ये गॅस निर्माण झाला असेल तर तो गॅस बाहेर काढण्यासाठी सुद्धा उपयोगी ठरतो त्याचबरोबर छातीमध्ये कफ असेल घशामध्ये चिटकलेला असेल तर अशावेळी कफ बाहेर काढण्यासाठी जिरे महत्त्वाचे ठरते.
हे दोन्ही पदार्थ आपल्याला खलबत्त्यामध्ये टाकून बारीक वाटून घ्यायचे आहे आणि त्यानंतर एका पातेल्यामध्ये ग्लासभर पाणी घेऊन त्यामध्ये एक चमचा हे मिश्रण टाकायचे आहे त्यानंतर चांगले उकळून झाल्यावर गाळणी च्या सहाय्याने हे मिश्रण गाळायचे आहे,अशा पद्धतीने आपला हा उपाय तयार झालेला आहे. हे मिश्रण रोज सकाळी चहा प्रमाणे आपल्याला एक ग्लासभर प्यायचे आहे. असे केल्याने आपल्या शरीरातील संपूर्ण घाण बाहेर निघून जाणार आहे त्याच बरोबर शरीरामध्ये जे वाईट घटक निर्माण झालेले आहे ते पूर्णपणे बाहेर निघून जातात आपल्याला आठवडाभर तरी करायचा आहे असे केल्याने तुम्हाला लवकर फरक पडेल.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.