श्रावण महिन्यातील गुरुवारी अशी करा स्वामींची पूजा; मनातील सर्व इच्छा होतील पूर्ण.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो धर्मग्रंथानुसार पावन समजला जाणारा महिना श्रावण सुरु झाला आहे आणि सोबतच अनेक सण उत्सव तथा अनेक देवांच्या पूजा ही सुरु झाल्या आहेत. धर्म ग्रंथानुसार ह्या महिन्यात मनोभावे केलेली पूजा अर्चना कधी असफल ठरत नाही. देव आपली दिव्य दृष्टी आशिर्वाद आपल्यावर बरसवण्यास सुरवात करतात. मित्रांनो श्रावणाचे सोमवार आणि गुरुवार अतिशय शुभ मानले जातात.
गुरुवार हा स्वामी समर्थ महाराजांचा दिवस मानला जातो. तुम्ही श्रावणाच्या गुरुवारी स्वामींची पूजा करुन असा एक मंत्र बोलवा अश्याने तुमच्या आयुष्यातील सगळे नैराश्य दूर होईल. तुम्ही दु:ख-दरिद्र विसरुन जाल तुमच्या घरी फक्त सुख आणि समृद्धी नांदू लागेल दु:खाची काळी रात्र सरून सुखाची मंगलमय सकाळ होईल. काय आहे हा मंत्र चला तर पुढिल लेखात पाहूया.
मित्रांनो श्री स्वामी समर्थ ही एक जागृक देवता आहे. त्यांची मनोभावे पूजा केल्यास ते तुमच्या पाठीशी कायम उभे राहतील. श्रावणाच्या गुरुवारी तुम्हाला एक पूजा करायची आहे ही पूजा करताच तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे आणि हा मंत्र बोलतच स्वामी महाराज तुमच्यावर प्रसन्न होतील आणि पावन श्रावणमासी तुम्हाला चांगले फळ देतील.
मित्रांनो सर्व प्रथम सकाळी स्वामींच्या फोटोला अथवा मुर्ती असल्यास दुधाचा अभिषेक अथवा फोटोला पाण्याने पुसून घ्यावे. नंतर त्याला अष्टगंधाने अथवा हिना अत्तर असेल तर स्वामींना लावायचे आहे त्यानंतर स्वामींच्या फोटोला अथवा मूर्तीला पुष्प हार घाला. त्यानंतर स्वामींना धूप आणि अगरबत्ती दाखवा त्यांची पूजा करुन घ्या तसेच त्यांना गोड नैवेध्य दाखवा.
काहीच नसेल तर साखर आणि दूध नैवेध्य म्हणून दाखवावा. हे सगळे विधी पुर्ण झाल्यास स्वामींच्या एका मंत्राचा जाप करावा ह स्वामींचा मंत्र स्वामींच्या अष्ट नमावली मधला मंत्र आहे. हा शक्तीशाली तथा चमत्कारिक मंत्र आहे. हा मंत्र पुढिल प्रमाणे आहे ‘ओम दिगमबराय नमाह ‘ ह्या मंत्राचा जप तुम्हाला 108 वेळा म्हणजेच एक माळ करायचा आहे आणि हे सगळ सकाळीच करायच आहे.
तसेच पूजा आणि मंत्र जाप झाल्यावर स्वामींना तुमच्या मनातील सगळ्या मनोकामना सांगायची असे केल्यास स्वामी तुमच्यावर त्यांचे आशिर्वाद ठेवतिल आणि तुमच्या सर्व इच्छा पुर्ण करतील. मित्रांनो ही पूजा करुन आणि मंत्राचा जाप करुन तुम्ही तुमच्या आयुष्यातील समस्या दूर करु शकता.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.