डायबेटीज असलेल्या रुग्णांनी हे 5 पदार्थ खाणे टाळले पाहिजे..!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कि डायबिटीज रुग्णांनी कोणत्या ५ अशा वस्तू आहे कि ज्यांचे त्यांनी मुळीच सेवन करू नये. बहुतेक लोकं डायबिटीज चे शिकार झालेले आहेत. आजकाल हा सामान्य रोग झालेला आहे, कारण पत्येक घरात किमान १ व्यक्ती डायबिटीज च्या समस्येबाबत लढा देत असतो. व्यक्तींच्या जीवनशैलीमुळे डायबिटीज ची समस्या वाढत आहे.
हा आजार ऐकण्यास साधारण जरी वाटत असला तरी खतरनाक स्वरूपाचा आहे. डायबिटीजने पीडित व्यक्तींच्या ब्लड शुगरच्या आधारावर या आजाराचा अनुमान लावला जाऊ शकतो. तस तर हा आजार पूर्णतः संपवण्यासाठी कोणताही सोप्पं उपाय नाही आहे. पण जर आपण आहारामध्ये काही परिवर्तन केले तर बऱ्याच प्रमाणावर आपण कंट्रोल आणू शकतो. जर व्यक्तीच्या ब्लड शुगरचे स्तर वाढला आहे तर ज्या वास्तूमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते त्या वस्तूंचे सेवन करणे फायदेशीर असते.
असे अनेक संतुलित आहार आहेत ज्यांच्यामध्ये डायबिटीजने पीडित व्यक्तींना नुकसान पोहोचू शकते. यामुळे ब्लड शुगर लेव्हल वर वाईट प्रभाव पडत असतो. येथे आपण अशा खाद्यपदार्थांविषयी जाणून घेऊ जे सामान्य व्यक्तींसाठी फायदेशीर असतात. परंतु डायबिटीज रुग्णांनी या व्यक्तींपासून दूर राहिले पाहिजे अन्यथा त्यांची समस्या अजून वाढू शकते. जे व्यक्ती डायबिटीज च्या समस्यांनी पीडित आहेत त्यांनी डायफ्रुटस पासून दूर राहिले पाहिजे. कारण ते ताज्या फळांपासून बनवलेले असतात ज्यामुळे यांच्यात फ्रुटस चे गुण अधिक प्रमाणात असतात.
एक कप द्राक्षांमध्ये २७ ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असते तर एक कप किसमिस जे आहे ज्यांना आपण मनुके म्हणतो त्यामध्ये कार्बोहायड्रेट्स चे प्रमाण ११५ ग्राम असते. त्यामुळे डायबिटीज च्या रुग्णांनी किसमिस चे सेवन अजिबात करू नये.
डायबिटीज च्या रुग्णांनी टरबूज चे सेवन करणे टाळले पाहिजे. अन्यथा आरोग्यासाठी हि गोष्ट खूप धोकादायक ठरू शकते. रक्तामध्ये शुगर चे प्रमाण वाढण्याची शक्यता अधिक राहते. त्यामुळे हायब्लडप्रेशर ची समस्या होऊ शकते. त्यामुळे जेवढे शक्य असेल तेवढे डायबिटीज च्या रुग्णांनी टरबूज चे सेवन करणे टाळले पाहिजे.
जसं कि तुम्हाला माहिती आहेच बटाटा सर्व भाज्यांमध्ये मिक्स करून लोकं शिजवतात. शाकाहारी असो वा मांसाहारी अनेक लोकं मांसाहारी भाजीमध्ये देखील बटाटा वापरतात. बटाट्यामध्ये व्हिटॅमिन सी , व्हिटॅमिन बी, कॉपर, मॅगनीज अधिक प्रमाणामध्ये असते. बटाट्यामध्ये एवढे गुण असून सुद्धा डायबिटीज रुग्णांसाठी हे हानिकारक ठरते. यामुळे जेवढे शक्य असेल तेवढे बटाटे खाणे कमी केले पाहिजे.
डायबिटीज रुग्णांनी चिकू सेवन करणे टाळले पाहिजे. कारण हे अत्यंत गोड असते, यामध्ये क्लायसिमीक इंडेक्स सुद्धा जास्त असते. त्यामुळे शुगर च्या रुग्णांनी याचे सेवन करू नये.
सामान्य लोकांसाठी नियमित दूध सेवन करणे फायदेशीर असते कारण दुधामध्ये भरपूर पोषक तत्वे असतात. जे आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात. त्यामुळे आपल्या हाडांना मजबुती मिळते कारण यामध्ये कॅल्शियम अधिक प्रमाणात असते. परंतु डायबिटीज रुग्णांनी हाय फॅट मिल्क सेवन करणे टाळले पाहिजे. ज्या दुधामध्ये लो फॅट असेल तेच दूध आपण वापरले पाहिजे. तर अशाप्रकारे दुधाचे सेवन करणे डायबिटीज च्या रुग्णांनी टाळावे.
मित्रांनो अशाप्रकारे या ५ वस्तू आहेत ज्यांचे डायबिटीज रुग्णांनी सेवन करू नये. आणि तुमची जी डायबिटीज ची समस्या आहे ती सुहा कमी होऊ शकते. तर मित्रांनो हि माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रमत्रिणींना शेअर करायला विसरू नका.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.
टरबूज च्या जागी कलिंगड चे चित्र टाकले आहे..