कोरोना व्हायरस पासून वाचण्यासाठी या 3 गोष्टींची काळजी नक्की घ्या..!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. कोरोना व्हायरस जगभर पसरलाय, भारतातही या व्हायरस चे रुग्ण आढळले आहे. या कोरोना व्हायरस ची लागण होऊ नये म्हणून आपण काय खबरदारी घेऊ शकतो हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण माहिती वाचा.

who.int
कोरोना व्हायरस एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे कसा जातो याची पूर्ण माहिती आतापर्यंत मिळालेली नाही. पण यांच्यासारखे जे विषाणू आहेत  व्यक्ती शिंकली किंवा खोकल्यावर जे तुषार उडतात त्यातून एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित होतात. हा संसर्ग आपल्याला होऊ नये म्हणून आपण या काही  गोष्टी नक्की करू शकतो. 

कोणत्याही विषाणूची लागण होऊ नये यासाठी वारंवार हात धुणं  हा सर्वोत्तम उपाय असल्याचं संपूर्ण जगभरातल्या तज्ज्ञांनी म्हटलं आहे. पण हो घाईघाईने हात धुवून चालणार नाही, योग्य रीतीने हात धुतले तरच तुमच्या हातावर असलेले विषाणू निघून जातील. सगळ्यात आधी हात ओले करा, हातात साबण घ्या आणि हात चोळून  फेस काढा. पूर्ण हात स्वच्छ पणे साफ करून घ्या. नख आणि तळहात देखील स्वच्छ करा. 
people.com
हात स्वच्छ करण्यासाठीचा आणखीन एक पर्याय तो म्हणजे हॅन्ड सॅनिटायझर चा वापर करणं. पण सॅनिटायझर ची उपयुक्तता मर्यादित आहे त्यामुळे हात धुणं हा सर्वोत्तम पर्याय आहे. 

हा विषाणू शिरकाव करू शकतो ते तुमच्या चेहर्या मार्फत म्हणजेच तोंड, नाक, डोळे आणि कान यांच्या मार्फतच आपल्याला इन्फेक्शन्स होत असतात. म्हणून चेहऱ्याला वांरवार हात लावणं टाळले पाहिजे. शिंकताना किंवा खोकताना तोंड झाका आणि मग हात इतर कुठेही लागू देऊ नका. शिंकताना किंवा खोकताना हाताचा वापर केल्यास लगेच हात धुणं महत्वाचं आहे.टिशूपपेर वापरणं कधीही चांगलं कारण तो एकदा वापरल्यानंतर आपण तो फेकून देतो.
➧ आता आपण जाणून घेऊयात मास्क कोणता वापरायचा ते..!

cnbc.com
मास्क चा वापर केल्याने संसर्ग किती टाळता येतो याविषयी जगभरातले तज्ञ् साशंक आहेत पण तरी सुद्धा काही प्रमाणात संरक्षण हे मास्क आपल्याला देऊ शकतात. सध्या जगभरातील लोकं २ प्रकारचे मास्क वापरताना दिसत आहेत. यामध्ये पहिला मास्क आहे तो म्हणजे सर्जिकल मास्क. हा मास्क डॉक्टर किंवा हॉस्पिटल मध्ये वापरला जातो. हा मास्क अतिशय पातळ आहे आणि वापरयाला सुद्धा सोप्पा आहे आणि किमतीने सुद्धा कमी आहे. पण याची दुसरी गोष्ट म्हणजे हा मास्क तुम्हाला जास्त संरक्षण देणार नाही. शिंकल्यानांतर येणारे कां हा मास्क रोखू शकतो पण बारीक सुष्मकण या मास्क मधून आरपार जाऊ शकतात. 

khaleejtimes.com
दुसऱ्या प्रकारचा मास्क आहे तो म्हणजे N९५ मास्क. या मास्कला N ९५ म्हणतात कारण ९५% हा मास्क कण रोखू शकतो, म्हणून या मास्क च नाव N ९५ आहे. या मास्कला पुढे एक फिल्टर असतो जेणेकरून तुम्ही श्वास घेताना सगळ्या गोष्टी गळाल्या जाऊ शकतात. हा मास्क तुलनेने तुम्हाला जास्त संरक्षण देऊ शकतो कारण हा मास्क तुमचं नाक आणि तोंड पूर्णपणे कव्हर होत. शिवाय यातून श्वास घेणंही सोप्प जाते आणि अडथळाही येत नाही. 
याशिवाय काही बेसिक गोष्टी ज्या रोजच्या आयुष्यात एरवी देखील पाळल्या जाऊ शकतात. म्हणजे तुम्ही जर मांसाहार करत असाल अंडी किंवा मासे, मांस पूर्णपणे शिजवून खा. एखादी व्यक्ती जर आजारी असेल तर तिच्यापासून थोडंसं अंतर ठेवा. आणि रोजच्या आयुष्यामध्ये एक निरोगी लाइफस्टाइल जगण्याचा प्रयत्न करा. 


टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

तुम्हाला हि सर्व माहिती आवडली असेल तर सगळ्यांना शेअर करायला विसरू नका. 

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *